Maharashtra Live Updates: धनंजय मुंडेंना मोठा झटका, कोर्टानं उचललं मोठं पाऊल, अडचणी वाढणार
Maharashtra Live blog updates: राज्यातील प्रमुख घडामोडी, महत्त्वाच्या बातम्या आणि ताज्या घडामोडींचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडणार?
LIVE

Background
आंबेगाव येथील शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे 19 फेब्रुवारीला लोकार्पण
पुणे : आंबेगाव येथे निर्माण होणाऱ्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण येत्या 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याप्रमाणे दुसरा टप्पा देखील भव्य असा निर्माण करण्यात आला आहे. यामध्ये रायगड, लोहगडाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. तर प्रतापगडावरील शिवाजी महाराजांचे कुलदैवत तुळजाभवानी मातेचे हुबेहूब मंदिर तयार करण्यात आलं आहे. नव्या पिढीला इतिहासाशी जोडण्यासाठी आणि शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा यासाठी शिवसृष्टी निर्माण करण्यात आली आहे. 19 फेब्रुवारीला लोकार्पण सोहळा झाल्यावर शिवसृष्टीचा दुसरा टप्पा शिवप्रेमींसाठी खुला केला जाणार आहे. 21 एकरवर असणाऱ्या शिवसृष्टीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याचे देखील काम सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम यांनी दिली आहे.
आदित्य ठाकरे यांनी घेतली शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांची बैठक, समन्वय राखण्याच्या सूचना
आदित्य ठाकरे आणि खासदारांमध्ये दिल्लीत एक तास बैठक पार पडली. खासदारांमध्ये समन्वय राखण्याच्या सूचना आदित्य ठाकरे यांनी दिल्या आहेत. प्रत्येक खासदारांनी आपापसात संवाद ठेवण्याचा सल्ला आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. तसेच बैठकीमध्ये सर्व खासदारांचे म्हणणे आदित्य ठाकरे यांनी ऐकून घेतले.
वैभव नाईकांचा उद्धव ठाकरेंना घरचा आहेर; म्हणाले...
Vaibhav Naik : माजी आमदार वैभव नाईक यांनी उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर दिलाय. 2019 ला महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली. त्यावेळी शरद पवारांची राजकीय पार्श्वभूमी पाहून महाविकास आघाडी करताना विचार केला पाहिजे होता. आता महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर शरद पवार सत्ताधाऱ्यांचा सत्कार करत असतील तर त्यावर बोलून काही उपयोग नाही, असा घराचा आहेर वैभव नाईक यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. शरद पवार हे मुत्सद्देगिरी राजकारणी आहेत, हे सर्वांना माहिती आहे. गेली 60 ते 70 वर्ष राजकारणात असून राज्यातील मोठं व्यक्तिमत्त्व आहे.
Eknath Shinde : जलसंधारण विभागाच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदेंची अनुपस्थिती, चर्चांना उधाण
Eknath Shinde : जलसंधारण विभागाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अनुपस्थिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत थोड्याच वेळात हा कार्यक्रम पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जलसंधारण विभागाचा नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनुपस्थित राहणार असल्याने ते नाराज असल्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. काल नगरविकास खात्याशी संबंधित बैठकांनाही एकनाथ शिंदे गैरहजर होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवारही आजच्या कार्यक्रमाला अनुपस्थित आहेत.
राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्याचा निषेध, धुळ्यात जोडे मारो आंदोलन
धुळे : व्याख्याते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा संपूर्ण राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे. राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा धुळ्यात शिंदे गटाच्या युवा सेनेने निषेध केला आहे. शहरातील झाशी राणी चौकात राहुल सोलापूरकर यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
