Maharashtra Breaking 1st July LIVE Updates: पुणे शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या पाचवर; एरंडवणे परिसरातील एका गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
LIVE

Background
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
BEED News: कृषिमंत्र्यांच्या बीड जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब शासकीय मदतीपासून वंचित
BEED News: कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब शासकीय मदतीपासून वंचित असल्याचं समोर आले आहे. याच कुटुंबीयांना शासकीय मदत मिळावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांच्या माध्यमातून आक्रोश आंदोलन करण्यात आलं. गेल्या सहा महिन्यात बीड जिल्ह्यात 103 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यापैकी केवळ आठ शेतकरी कुटुंबीयांनाच शासकीय मदत मिळाली आहे. इतर आत्महत्याग्रस्त कुटुंब शासकीय मदतीपासून वंचित आहेत. त्यामुळेच या कुटुंबीयांना मदत मिळावी या मागणी करिता हे आक्रोश आंदोलन करण्यात आले. कृषीमंत्र्यांचाच जिल्ह्यात ही बाब उघड झाल्याने तातडीने चौकशी करून प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.
Zika Virus : पुणे शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या पाचवर; एरंडवणे परिसरातील एका गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग
Zika Virus : पुणे शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या पाच वर
पुण्यातील एरंडवणे परिसरातील एका गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग, महिलेची प्रकृती स्थिर
रुग्णांच्या संपर्कात आलेले आणि तापाची लक्षणे असलेले त्यांचे कुटुंबीय आणि इतर व्यक्तींचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्थेकडे
झिकाचे रुग्ण आढळून आलेल्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू
पुण्यातील एरंडवणे आणि मुंढव्यात रुग्ण आढळलेल्या परिसरात प्रत्येकी १०० घरांच्या आतमध्ये धूर फवारणी
Jalgaoun News: जळगाव, एसआरपीएफ भरती दरम्यान तरुणाचा मृत्यू,प्रशासन जबाबदार, कुटुंबाचा आरोप
Jalgaoun News: मुंबई येथील बालेगाव कॅम्प परिसरात झालेल्या एसआरपीएफ भरती दरम्यान जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील अक्षय मिलिंद बिऱ्हाडे या तरुणाचा धावताना खाली कोसळून मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.
Akole News: अकोले दूध दराच्या मागणीसाठी शेतकरी पूत्रांचे आमरण उपोषण
Akole News: दूध दराच्या मागणीसाठी राज्यभर विविध ठिकाणी आंदोलन सुरू असताना अकोले तालुक्यातील गणोरे गावात आता शेतकरी पुत्रांनी आमरण उपोषण सुरू केल आहे. शुभम आंबरे आणि संदीप दराडे या दोघांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली असून गणोरे गावासह पंचक्रोशीतील अनेक गावांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दुधाला किमान 40 रुपये भाव मिळावा ही प्रमुख मागणी घेऊन हे आमरण उपोषण सुरू झाला असून पंचक्रोशीतील दूध उत्पादक देखील पाठिंबा देण्यासाठी उपोषण स्थळी गर्दी करत आहे.
Yavatmal News: पहिल्याच पावसात अडाण नदीला पूर; वाहतूक काही काळ बंद
Yavatmal News: यवतमाळ शहरासह जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस बरसला असून पावसात अडाण नदीला पूर आला. यामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
