Eknath Shinde - Uddhav Thackeray पहिल्यांदाच समोरासमोर, एकमेकांकडे पाहिलंही नाही
Eknath Shinde - Uddhav Thackeray पहिल्यांदाच समोरासमोर, एकमेकांकडे पाहिलंही नाही
उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज (10 मार्च) राज्याचा (Maharashtra Budget 2025) अर्थसंकल्प सादर केला.अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहाबाहेर आले होते.ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे देखील विधानसभा परिसरात दाखल झाले होते. यावेळी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली.उद्धव ठाकरे समोर येताच देवेंद्र फडणवीसांनी हात जोडले.देवेंद्र फडणवीसांच्या मागे एकनाथ शिंदे देखील होते. मात्र उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी नजरानजरही केली नाही.देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी हसत-हसत हस्तांदोलन केलं.या भेटीदरम्यान अंबादास दानवे आणि मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित होते.























