संभाजी ब्रिगेडने त्यांचं नाव बदलावं, अन्यथा राज्यभर आंदोलन करु, शिवधर्म फाऊंडेशनचा इशारा
'संभाजी ब्रिगेड'ने नावात बदल करुन 'धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड' असे करावे किंवा संघटनेचे नाव बदलावे अन्यथा राज्यभर आंदोलन करु, असा इशारा शिवधर्म फाऊंडेशनकडून देण्यात आला आहे.
Sambhaji Brigade : महाराष्ट्रात 'संभाजी ब्रिगेड' (Sambhaji Brigade) या नावाने कार्यरत असलेल्या संघटना व पक्षाकडून वारंवार छत्रपती संभाजी महाराजांचा (Chhatrapati Sambhaji Maharaj) एकेरी उल्लेख केला जात आहे. 'संभाजी ब्रिगेड'ने नावात बदल करुन 'धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड' असे करावे किंवा संघटनेचे नाव बदलावे अन्यथा राज्यभर आंदोलन करु, असा इशारा शिवधर्म फाऊंडेशनकडून (Shivdharma Foundation) देण्यात आला आहे.
3 एप्रिलपासून राज्यभरात आंदोलन करणार
संभाजी ब्रिगेड छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करुन अवमान करत आहे. संघटनेने संभाजी ब्रिगेड'च्या नावात 'धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज' असे पूर्ण लिहावे. सरकारने सुद्धा या संघटनेची दखल घेऊन नाव बदलायला सांगावे, नाहीतर त्याची मान्यता रद्द करावी अशी सुद्धा मागणी यावेळी करण्यात आली आहे. जर वेळेत संघटनेने नाव बदलले नाही तर संभाजी ब्रिगेड'च्या विरोधात शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने येत्या 3 एप्रिलपासून राज्यभरात आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
संभाजी ब्रिगेडबाबत माहिती
मराठा सेवा संघाची युवक आघाडी म्हणून 1997 मध्ये संभाजी ब्रिगेडची स्थापना करण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर हे त्यावेळी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता होते. याच काळात मराठा सेवा संघाकडून म्हणजे 1995 मध्ये शिवराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली. मात्र त्याला 20 वर्षात अपेक्षित यश मिळालं नाही . 5 जानेवारी 2004 रोजी पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर हल्ला करुन संभाजी ब्रिगेड प्रकाशझोतात आली. वादग्रस्त लेखक जेम्स लेनला भांडारकर संस्थेने चुकीची माहिती पुरवल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडने भांडारकर संस्थेवर हल्ल्ला केला होता. * 2012 साली संभाजी ब्रिगेडने रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी फोडली. त्यावेळी देखील संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेत संघर्ष उभा राहिला. त्यावेळचे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्या पुढाकाराने संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर भात-शिवसेना युतीने बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेचा त्याला पाठिंबा होता . मात्र संभाजी ब्रिगेडने या निर्णयाच्या विरोधात आंदोलने केली. संभाजी ब्रिगेडकडून 1998 रोजी सनातन हिंदू धर्मापासून वेगळं होत शिवधर्माची स्थापना करण्यात आली. दहा वर्ष या धर्माचा प्रचार केल्यानंतर 2008 साली या धर्माचा प्रकटदिन सोहळा पुरोयषोत्तम खेडेकरांच्या उपस्थितीत साजरा झाला.
महत्वाच्या बातम्या:
Pune News: पुण्यात एमपीएससी क्लास चालकांकडून मागितली जातेय खंडणी? संभाजी ब्रिगेडचा मोठा दावा, धनंजय मुंडेंच सांगितलं कनेक्शन

























