एक्स्प्लोर

IIM Nagpur : 132 एकरवर आयआयएम नागपूरचे नवे कॅम्पस; राष्ट्रपतींच्या हस्ते आज लोकार्पण 

IIM Nagpur : नागपूरच्या मिहान परिसरात 132 एकर भूमीवर आयआयएम नागपूरचे भव्य कॅम्पस साकारण्यात आले असून पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.

IIM Nagpur : इंडियन इॅन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूरच्या (IIM Nagpur) नव्या इमारत आणि परिसराचे उद्घाटन व लोकार्पण आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath kovind) यांच्या उपस्थितीत होणार आहे. नागपूरच्या मिहान परिसरात 132 एकर भूमीवर आयआयएम नागपूरचे भव्यदिव्य कॅम्पस साकारण्यात आले असून पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. सध्या 665 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था असून पर्यावरणदृष्टया इमारतीची उभारणी करण्यात आली आहे.. 

132 एकरात विस्तारलेल्या इमारत व परिसरात 665 विद्यार्थी व्यवस्थापन विषयाच्या विविध शाखेमध्ये शिक्षण घेत असून या ठिकाणच्या वर्गखोल्या, त्यांची रचना, जागतिक स्तराच्या असून अद्यावत प्रशिक्षण यंत्रसामग्रीने सज्ज आहेत. विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या अन्य सुविधा देखील दर्जेदार आहे. 2015 ला सुरु झालेल्या या संस्थेला आता या नव्या कॅम्पसमुळे नवी झळाळी मिळाली आहे. 

अत्याधुनिक क्लास रूम्स :

आयआयएम नागपूर येथे 20 हायटेक क्लासरुम आणि 24 प्रशिक्षण केंद्रे आहेत. या शिवाय 400 आसन क्षमतेचे कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात आले आहे. या नव्या इमारतीच्या दर्शनी भागात धनुर्धारी अर्जुनाचा भव्य पुतळा उभारला असून त्याद्वारे ध्येय निश्चित करुन लक्ष्यवेध हा संदेश यातून देण्याचा प्रयत्न आहे.

आयआयएम नागपूरचे जगभरातील आघाडीच्या संस्थांशी सहकार्य करार करण्यात आले असून विदेशातून ऑनलाईन मार्गदर्शनाची सोय उपलब्ध आहे. समाजातील दुर्बल घटकांसाठी मेरिट स्कॉलरशिप आणि नीड कम मेरिट स्कॉलरशिप अशा दोन प्रकारच्या सोयी आहेत. 
 
जागतिक विद्यापीठांसोबत भागिदारी - 

देशाचे अगदी मध्यवर्ती शहर असणारे नागपूर आयआयएम या संस्थेमुळे व्यवसाय आणि व्यवस्थापन क्षेत्रातील अभ्यासक्रमाच्या नकाशावर आले आहे. इंग्लंड, अमेरीका, कॅनडा, जपान, डेन्मार्क, फ्रान्स या देशातील जागतिक स्तराच्या विद्यापीठांसोबत आयआयएमचे सहभागीत्व आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट युनिर्व्हसिटी ऑफ लिले फ्रान्स, वेस्ट मिनिस्टर बिझनेस स्कूल, युनिर्व्हसिटी ऑफ वेस्ट मिनिस्टर इग्लंड, युनिर्व्हसिटी ऑफ मेमफीस, अमेरिका,इन्स्टिट्यूट मांइन्स टेलिकॉम, फ्रॉन्स, कोफेनहेगन बिझनेस स्कुल डेनमार्क, स्कूल ऑफ स्टॅटेजिक मॅनेजमेंट जपान आदी विद्यापींठासोबत या संस्थेचा सामजस्य करार झाला आहे. 

2015 साली आयआयएम नागपुरात सुरु

जगभरात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या नागपूरचे पहिले सत्र जुलै 2015 पासून सुरु झाले होते. त्यावेळी स्वतःची इमारत नसल्याने विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थेच्या म्हणजेचं (व्हीएनआयटी) येथील कॅम्पसमध्ये आयआयएमचे क्लासेस सुरू करण्यात आले होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : चर्चगेट रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांचा श्वास गुदमरलाTeam India Victory Parade : विराट नाचला , रोहितने उड्या मारल्या, भरलेल्या बसमधील सेलिब्रेशन बघाचTeam India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूकTeam India Victory Parade : टीम इंडियाची विजयी मिरवणूक; लाखोंचा जनसमुदाय मरिन ड्राईव्हवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
महायुतीचा 'मुख्यमंत्री'पदाचा चेहरा कोण असेल?; विधानपरिषद मिळताच पंकजांचं आश्चर्यकारक उत्तर
महायुतीचा 'मुख्यमंत्री'पदाचा चेहरा कोण असेल?; विधानपरिषद मिळताच पंकजांचं आश्चर्यकारक उत्तर
Embed widget