एक्स्प्लोर

Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत (Maharashtra Local Body Elections) आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी होणार आहे.

Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत (Maharashtra Local Body Elections) आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका नेमक्या कधी होणार याचे भवितव्य या सुनावणीवर अवलंबून आहे. या प्रकरणाची सुनावणी आज नवे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पीठासमोर 21 व्या क्रमांकावर होणार आहे. राज्यातील 92 नगरपरिषदांमध्येसुद्धा ओबीसी राजकीय आरक्षण लागू होणार का? महानगरपालिकामधल्या प्रभाग पद्धतीच्या बदलांना मान्यता मिळणार का? या बाबतच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टातली सुनावणी सलग तिसऱ्यांदा लांबणीवर पडली होती. त्यानंतर दोन आठवड्यानंतर सुनावणी घेणार असल्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळं प्रशासक नेमून सहा महिने उलटले तरी निवडणुकांबाबत प्राथमिकता सुप्रीम कोर्टाच्या अजेंड्यावर नसल्याचं स्पष्ट झालं होतं. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत पहिल्यांदा पाच आठवड्याची स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण सुनावणीस आले नव्हते. 

प्रशासकांचीही सहा महिन्यांची मुदत संपली

राज्यातील महापालिका प्रभाग रचनेतील बदल, थेट नगराध्यक्ष निवडीला आव्हान आणि निवडणुकीला स्थगिती दिलेल्या 92 नगरपरिषदांमध्ये ओबीसी आरक्षण या मुद्यावर न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्यातील अनेक महापालिकांची मुदत संपल्यानंतर त्या ठिकाणी प्रशासक नेमण्यात आले आहेत. त्यांची सहा महिन्यांची मुदतही उलटून गेली आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भातला निकाल 92 नगरपरिषदांसाठीही लागू करण्यात यावा या मागणीसाठी राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या 92 नगर परिषदांमध्ये थेट नगराध्यक्ष पदाचे आरक्षण लागू करण्यात आलं आहे. मग केवळ ओबीसी आरक्षण लागू न होणं हे अन्यायकारी ठरेल. ओबीसी आरक्षण लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं मुभा दिली तोपर्यंत या नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी नोटिफिकेशन आलं नव्हतं, असा दावा सरकारच्या वतीनं करण्यात आला आहे.  

नेमकं काय आहे प्रकरण?

राज्य निवडणूक आयोगानं  92 नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. या नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या, तेव्हा सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाबाबत सुनावणी सुरू होती. या 92 नगरपरिषदांमधील निवडणुका ओबीसी आरक्षणासह करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू होता. सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षणाबाबत निकाल दिला, त्यावेळी या संदर्भातली निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे आता तिथे ओबीसी आरक्षण लागू करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. राज्य निवडणूक आयोगानं 14 जुलै रोजी या 92 नगरपरिषदांच्या निवडणुका स्थगित केल्याची घोषणा केली होती. 

या 17 जिल्ह्यात निवडणुका होणार 

पुणे (Pune), सातारा (satara) सांगली (Sangli), सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे (Dhule), नंदुरबार, जळगाव (jalgaon), अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड (Beed), उस्मानाबाद, लातूर (Latur), अमरावती आणि बुलढाणा या 17 जिल्ह्यातील 92  नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार होत्या.

महत्त्वाच्या बातम्या:

OBC Reservation: ओबीसींना 52 टक्के आरक्षण द्या; वंचित बहुजन आघाडीची आंदोलनाची हाक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: मंत्री धनंजय मुंडे यांची सत्र न्यायालयात धाव; कोर्टाच्या अंतरिम आदेशाला आव्हान देणार,नेमकं प्रकरण काय?
मंत्री धनंजय मुंडे यांची सत्र न्यायालयात धाव; कोर्टाच्या अंतरिम आदेशाला आव्हान देणार,नेमकं प्रकरण काय?
Sangli News : कर्जाचा डोंगर, उसनवारीचा पैसा फेडण्याचे टेन्शन, विम्याच्या पैशावर वळली नजर; बायकोने मुलाच्या मदतीने थेट नवऱ्याला संपवलं, पहिल्यांदा रचला अपघाताचा बनाव!
कर्जाचा डोंगर, उसनवारीचा पैसा फेडण्याचे टेन्शन, विम्याच्या पैशावर वळली नजर; बायकोने मुलाच्या मदतीने थेट नवऱ्याला संपवलं, पहिल्यांदा रचला अपघाताचा बनाव!
Video: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत करुणा शर्मांची अंदर की बात; राष्ट्रवादीत गेल्यानेच माझ्या पतीचं वाटोळं झालं
Video: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत करुणा शर्मांची अंदर की बात; राष्ट्रवादीत गेल्यानेच माझ्या पतीचं वाटोळं झालं
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात ट्विस्ट, आता शिंदेसेनेच्या महिला पोलीस अधीक्षकांच्या भेटीला, नेमकी मागणी काय?
रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात ट्विस्ट, आता शिंदेसेनेच्या महिला पोलीस अधीक्षकांच्या भेटीला, नेमकी मागणी काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : कोकाटेंच्या शिक्षेवरुन दावनेंचा सवाल, गदारोळ होताच फडणवीस उठले अन्...Vidhan Parishad Rada : विधान परिषद सुरु होताच पहिल्याच मिनिटात राडा, पाहा UNCUT VIDEOKaruna Sharma: Dhananjay Munde यांच्या प्रेशरमुळे अजितदादा राजीनामा जाहीर करत नाही : करुणा शर्माVidhanbhavan Nana Patole PC | राज्यात लाडक्या बहिणी असुरक्षित, नाना पटोलेंची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: मंत्री धनंजय मुंडे यांची सत्र न्यायालयात धाव; कोर्टाच्या अंतरिम आदेशाला आव्हान देणार,नेमकं प्रकरण काय?
मंत्री धनंजय मुंडे यांची सत्र न्यायालयात धाव; कोर्टाच्या अंतरिम आदेशाला आव्हान देणार,नेमकं प्रकरण काय?
Sangli News : कर्जाचा डोंगर, उसनवारीचा पैसा फेडण्याचे टेन्शन, विम्याच्या पैशावर वळली नजर; बायकोने मुलाच्या मदतीने थेट नवऱ्याला संपवलं, पहिल्यांदा रचला अपघाताचा बनाव!
कर्जाचा डोंगर, उसनवारीचा पैसा फेडण्याचे टेन्शन, विम्याच्या पैशावर वळली नजर; बायकोने मुलाच्या मदतीने थेट नवऱ्याला संपवलं, पहिल्यांदा रचला अपघाताचा बनाव!
Video: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत करुणा शर्मांची अंदर की बात; राष्ट्रवादीत गेल्यानेच माझ्या पतीचं वाटोळं झालं
Video: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत करुणा शर्मांची अंदर की बात; राष्ट्रवादीत गेल्यानेच माझ्या पतीचं वाटोळं झालं
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात ट्विस्ट, आता शिंदेसेनेच्या महिला पोलीस अधीक्षकांच्या भेटीला, नेमकी मागणी काय?
रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात ट्विस्ट, आता शिंदेसेनेच्या महिला पोलीस अधीक्षकांच्या भेटीला, नेमकी मागणी काय?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार का? नार्वेकरांच्या दालनात फडणवीस-अजितदादांसोबत बंद दाराआड चर्चा
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार का? नार्वेकरांच्या दालनात फडणवीस-अजितदादांसोबत बंद दाराआड चर्चा
इंद्रजीत सावंत यु-ट्यूबमधून चुकीची माहिती पसरवतात; करनी सेनेचा आरोप, पोलिसात तक्रार
इंद्रजीत सावंत यु-ट्यूबमधून चुकीची माहिती पसरवतात; करनी सेनेचा आरोप, पोलिसात तक्रार
Abu Azmi: औरंगजेब उत्तम प्रशासक, त्याच्या काळात भारताचा जीडीपी 24 टक्के अन् बॉर्डर अफगाणिस्तानापर्यंत पसरली होती: अबू आझमी
औरंगजेब उत्तम प्रशासक, त्याच्या काळात भारताचा जीडीपी 24 टक्के अन् बॉर्डर अफगाणिस्तानापर्यंत पसरली होती: अबू आझमी
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात चार जण ताब्यात, एक अल्पवयीन; पोलीस अधीक्षकांनी स्टार्ट टू एन्ड सगळंच सांगितलं!
रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात चार जण ताब्यात, एक अल्पवयीन; पोलीस अधीक्षकांनी स्टार्ट टू एन्ड सगळंच सांगितलं!
Embed widget