एक्स्प्लोर

राज्य सरकारचे अपयश झाकण्यासाठी शेट्टींकडून दिशाभूल, केंद्राने दूध पावडर आयात केलेलीच नाही : डॉ. बोंडे

दूध पावडरच्या आयातीबद्दल जाणीवपूर्वक संभ्रम पसरविण्यात येत आहे. दूध उत्पादकांनी यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही डॉ. बोंडे यांनी केले आहे.

मुंबई : दूध उत्पादकांना रास्त भाव देण्यात महाआघाडी सरकारला आलेले अपयश झाकण्यासाठी काही मंडळी केंद्र सरकारने दूध पावडर आयात केली असल्याची खोटी माहिती पसरवत आहेत, असा आरोप भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष व माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे. दूध पावडरच्या आयातीबद्दल जाणीवपूर्वक संभ्रम पसरविण्यात येत आहे. दूध उत्पादकांनी यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही डॉ. बोंडे यांनी केले आहे.

प्रसिद्धी पत्रकात डॉ. बोंडे यांनी म्हटले आहे की , अडचणीत सापडलेल्या दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अलीकडेच भारतीय जनता पार्टीने राज्यभरात आंदोलन केले. महाआघाडी सरकारला समर्थन देणारे राजू शेट्टी यांनीही 21 ऑगस्टला दूध भावाकरिता आंदोलन केले. शेट्टी यांनी केंद्र सरकारने दूध पावडर आयात केल्याने दूध उत्पादकांना भाव वाढवून मिळत नसल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात केंद्र सरकारने दूध पावडर आयात केलीच नसल्याची माहिती मिळाली आहे. वाणिज्य मंत्रालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार 23 जून रोजी केंद्र सरकारच्या अर्थ विभागाद्वारे सूचनेमध्ये गॅट करारान्वये भारताला आयात करावयाच्या वस्तूंबद्दल माहिती दिलेली आहे. जागतिक व्यापार संघटनेची ही बंधने मनमोहन सिंह यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात मान्य केलेली आहेत.

गॅट कराराप्रमाणे भारत सरकारला 2014-2015 ते 2019-2020 या कार्यकाळात 5 लाख मेट्रिक टन मका, 10 हजार मेट्रिक टन दूध व मलाई पावडर रुपात, सूर्यफुल तेल दिड लाख मेट्रिक टन, रिफाइन्ड सरकी, मोहरी तेल दीड लाख मेट्रिक टन घेणे आवश्यक आहे. या संदर्भातील सूचना काढल्यानंतर मका, दूध आयात करण्यात आले, अशी अफवा उठविण्यात आली. नाफेड व अन्य एका संस्थेला 5 लाख मेट्रिक टन मका आयात परवाना देण्यात आला होता. या परवान्याची मुदत फेब्रुवारी 2021 पर्यंत असली तरी अद्याप पर्यंत या संस्थांनी मका आयात केलेला नाही. या संस्थांनी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार भारतामधूनच शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्याचे नियोजन व कारवाई केली आहे. मका खरेदीला 31 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

गॅट करारा नुसार 10 हजार मेट्रिक टन दूध पावडर आयात करण्याचे बंधनकारक असले तरी कोणत्याही आयातदाराचे इच्छापत्र दिलेले नाही व कोणालाही आयातीचा परवाना देण्यात आलेला नाही. त्यामुळे दूध पावडर आयात करण्यात आली हा दावा संपूर्णत: निराधार व फसवा आहे. या प्रमाणेच मोहरी ,सरकी व सूर्यफूल तेलाच्या आयातीसाठी आयातदार संस्थेकडून मागणी करण्यात आलेली नाही तसेच या तेलाच्या आयातीचा कोणालाही परवाना दिला गेलेला नाही.

Milk Rates | वाढीव दूध दर आणि अनुदानासाठी राज्यभर आंदोलन,दूध दराचा नेमका प्रश्न काय आहे? स्पेशल रिपोर्ट

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Satara NEET exam death News: नीट परीक्षेचा निकाल आला, नैराश्यात गेली अन् उंदरांना मारण्याच्या विषारी वड्या खाल्ल्या; अचानक तीव्र पोटदुखी सुरू झाली, शेवटी...
नीट परीक्षेचा निकाल आला, नैराश्यात गेली अन् उंदरांना मारण्याच्या विषारी वड्या खाल्ल्या; अचानक तीव्र पोटदुखी सुरू झाली, शेवटी...
Jayakwadi Dam Water Storage: मराठवाड्याला मोठा दिलासा! अवघ्या 27 दिवसांत जायकवाडीत 25 टीएमसी पाण्याची भर; पाणीसाठा कुठवर? 
मराठवाड्याला मोठा दिलासा! अवघ्या 27 दिवसांत जायकवाडीत 25 टीएमसी पाण्याची भर; पाणीसाठा कुठवर? 
CJI Suryakant on Delhi Police Lathicharge: आधी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता दिल्ली पोलिसांनाही हिशेब चुकता करावा लागणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून महत्त्वाचा आदेश
आधी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता दिल्ली पोलिसांनाही हिशेब चुकता करावा लागणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून महत्त्वाचा आदेश

व्हिडीओ

Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा गळा आवळला, कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट, कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले
म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा गळा आवळला, कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट, कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले
NCP Merger Talking: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
Yugendra Pawar on Ajit Pawar Death: आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे...; अजित पवार विमान दुर्घटनेच्या चौकशीवर युगेंद्र पवार स्पष्ट बोलले, काय-काय म्हणाले?
आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे...; अजित पवार विमान दुर्घटनेच्या चौकशीवर युगेंद्र पवार स्पष्ट बोलले, काय-काय म्हणाले?
Chitrakoot Crime News: सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
Vishwas Nangare Patil: आधीच काही इनपुट मिळालेले; हॉटेल ताजचा नकाशा डोक्यात होता , २६/११ च्या रात्री नेमकं काय घडलं? विश्वास नांगरे पाटलांनी काय सांगितलं?
आधीच काही इनपुट मिळालेले; हॉटेल ताजचा नकाशा डोक्यात होता , २६/११ च्या रात्री नेमकं काय घडलं? विश्वास नांगरे पाटलांनी काय सांगितलं?
Usha Mangeshkar on Asha Bhosle: आशाताईंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर, धाकट्या भगिनी उषा मंगेशकर म्हणाल्या, 'आम्ही कधीही तिच्या फोटोला हार घातला नाही...'
आशाताईंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर, धाकट्या भगिनी उषा मंगेशकर म्हणाल्या, 'आम्ही कधीही तिच्या फोटोला हार घातला नाही...'
Ulhasnagar Crime News: घराशेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याची केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
घराशेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याची केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Embed widget