एक्स्प्लोर

Aurangabad Unlock : औरंगाबादकरांसाठी महत्वाची बातमी... जिल्ह्यात उद्यापासून कसा असेल अनलॉक.. काय सुरु, काय बंद 

औरंगाबाद ग्रामीणची (Aurangabad Unlock) वर्गवारी नुसार सध्याचे स्थान Level- 3 (पातळी 3) मध्ये आहे तर औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्राचे शासन वर्गवारी नुसार स्थान सध्या Level-1 (पातळी 1) मध्ये आहे.जिल्ह्यात उद्यापासून कसा असेल अनलॉक.. काय सुरु, काय बंद 

औरंगाबाद - जिल्ह्यातील कोविड-19ची परिस्थिती लक्षात घेऊन व प्राप्त वैद्यकीय अहवालाच्या आधारे जिल्हयातील (ग्रामीण) रुग्णांची टक्केवारी 5.46 टक्के (Positivity) असून व्यापलेल्या ऑक्सीजन बेडची टक्केवारी 20.34टक्के असल्याने औरंगाबाद ग्रामीणची वर्गवारी नुसार सध्याचे स्थान Level- 3 (पातळी 3) मध्ये आहे तर औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांची टक्केवारी 2.24 टक्के (Positivity) असून व्यापलेल्या ऑक्सीजन बेडची टक्केवारी 22.19 टक्के असल्याने औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्राचे शासन वर्गवारी नुसार स्थान सध्या Level-1 (पातळी 1) मध्ये आहे. ग्रामीण भागातील रुग्णसंख्या लक्षात घेता संपूर्ण आठवड्यामध्ये सायंकाळी 05 वाजेनंतर नागरिकांच्या संचारावर कडक नियंत्रण असणार आहे. अत्यावश्यक वस्तू व सेवा संबंधी व्यवसाय व दुकाने दररोज सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. ग्रामीण भागातील मॉल, चित्रपट गृहे, नाट्यगृहे पूर्णपणे बंद असणार आहेत. ग्रामीण भाग हा भौगालिकदृष्ट्या मोठा असून लोकसंख्या देखील जास्त असल्याने नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करुन सजगता बाळगावी. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची दर शुक्रवारी बैठक घेण्यात येणार असून जिल्ह्यातील संक्रमण वाढत राहिले तर निर्बंध अधिक कडक करण्यात येणार असून जनतेच्या मुक्त जीवन जगण्यावर मर्यादा येणार असल्याने नागरिकांनी सर्व नियमांचे काटेकोर पालन  करण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे. 

Maharashtra Corona Deaths : महाराष्ट्रात आजपर्यंत कोरोनाचे एक लाख बळी! जगात सात देशांमध्येच लाखाच्या वर मृत्यू

जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालय पूर्णपणे बंद राहणार आहेत. सर्व उदयोग,व्यवसाय व खाजगी आस्थापना, दुकाने व त्यांचे कर्मचाऱ्यांना निगेटीव्ह RTPCR चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक राहिल.(वैधता 15 दिवसांकरिता) निगेटीव्ह RTPCR चाचणी अहवालाशिवाय दुकान/व्यवसाय सुरु करता येणार नाही. जिल्ह्यातील दुकानदारांनी आपल्या कर्मचाऱ्यांची RTPCR चाचणी येत्या 5 ते 7 दिवसांत करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी दर कमी करण्यासाठी अधिकाधिक चाचण्या करण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर आहे.

उद्यापासून राज्यात अनलॉक! तुमचा जिल्हा कोणत्या लेव्हलमध्ये? स्थानिक प्रशासनाच्या नियमावलीनुसार काय सुरू काय बंद?

जिल्हा प्रशासनाने चाचणी करण्यासाठी पुरेसा अवधी दिला असल्याने चाचणी न करुन घेणाऱ्या आस्थापनांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. RTPCR चाचणी करण्यासाठी जिल्ह्यात घाटी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे  अशा दोन ठिकाणी 24 तास लॅब कार्यरत असून चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालयात Mobile Van (क्षमता दररोज 2500 ते 3000 चाचण्या)च्या माध्यमातून तसेच खाजगी लॅबमध्ये देखील RTPCR चाचणी करण्यात येते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची RTPCR चाचणी येत्या 5 ते 7 दिवसांत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत.

Maharashtra Unlock : राज्यात कुठेही सरसकट निर्बंध शिथील केलेले नाहीत, काटेकोर काळजी घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
           

ग्रामीण भागाकरीता आदेश-
 
कोविड-19 संसर्ग साखळी तोडणे (Break the Chain) सुधारित अटी व शर्ती अंमलबजावणीस्तव आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, औरंगाबाद व पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर व मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. व पोलीस अधीक्षक (ग्रामीण) यांच्या संयुक्त स्वाक्षरीने औरंगाबाद शहर वगळून उर्वरीत जिल्हा क्षेत्राकरिता 7 जुन रोजीचे सकाळी 07.00 वाजेपासून पुढील आदेशापर्यंत खालीलप्रमाणे निर्बंध शिथिल (Restriction Relaxation )करुन सुधारित आदेश लागू करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
 
 
सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना
संपूर्ण आठवड्यामध्ये सायंकाळी 05.00 वाजेनंतर नागरिकांच्या संचारावर कडक नियंत्रण असेल.

अत्यावश्यक वस्तू व सेवा संबंधी व्यवसाय व दुकाने
दररोज सकाळी 07.00 ते सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत

अत्यावश्यक वस्तू व सेवा व्यतीरिक्त इतर सर्व व्यवसाय व दुकाने
सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते 04.00 वाजेपर्यंत

मॉल्स / चित्रपटगृहे / नाटयगृहे
पूर्णपणे बंद

रेस्टॉरंट, हॉटेल्स, खानावळी, शिवभोजन थाळी
सोमवार ते शुक्रवार (Week Days) सकाळी 07.00 ते सायंकाळी 04.00 या वेळेत 50% आसन क्षमतेनुसार Dining
सायं. 4.00 नंतर पार्सल सेवा चालु राहिल व
शनिवार आणि रविवार (Weekend) फक्त पार्सल व होम डिलेवरी सुविधा चालू राहतील.


सार्वजनिक ठिकाणे/क्रीडांगणे,मोकळ्या जागा,उद्याने/
बगिचे, Morning Walk व सायकलींग
दररोज सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 वाजेपर्यंत

खाजगी आस्थापना
सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत शासन आदेश दिनांक 04 जून 2021 च्या निर्देशानुसार वगळण्यात आलेल्या सर्व आस्थापना जसे, खाजगी बँका, विमा, औषध कंपनी, सुक्ष्म वित्त संस्था व गैर-बँकींग वित्त-संस्था इ. कार्यालये नियमीतपणे कार्यालयीन वेळेपर्यंत सुरु राहतील.

कार्यालयीन उपस्थिती
शासकीय/निमशासकीय/खाजगी
इतर कार्यालये क्षमतेच्या 50%
कोरोना विषयक कामे करणा-या आस्थापना, कृषी, बँक मान्सुनपूर्व कामांशी संबंधित यंत्रणा, कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु राहतील.
 
क्रीडा
बाहेर मोकळ्या जोगत (Out Door) सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 व सायंकाळी 06.00 ते रात्री 09.00 या वेळेत.
 
चित्रीकरण (Shooting)
सायंकाळी 4.00 वाजे पर्यंत मुभा
सायंकाळी 05.00 वाजेनंतर कुठेही वावरण्यास मनाई (No Movement Outside Bubble)

स्नेहसंमेलने(Gathering), सामाजिक, सांस्कृतिक, करमणुकीचे कार्यक्रम
सोमवार ते शुक्रवार सभागृह/हॉल आसन क्षमतेच्या 50% उपस्थितीत सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत

विवाह समारंभ
50 लोकांच्या उपस्थितीत

अंत्यविधी
20 लोकांच्या उपस्थितीत

सभा / निवडणुका,
स्थानिक प्राधिकरण व सहकारी संस्था यांचे आमसभा
सभागृह/हॉल आसन  क्षमतेच्या 50%

बांधकाम
फक्त बांधकाम साईटवर निवासी/वास्तव्यास मुभा
बाहेरुन मजूर आणण्याचे बाबतीत सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत

कृषी संबंधीत बाबी
संपूर्ण आठवडाभर सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत

ई-कॉमर्स वस्तु व सेवा
नियमित पूर्ण वेळ : दररोज

जमावबंदी/संचारबंदी
 जमावबंदी (5 पेक्षा जास्त व्यक्तीस एकत्र येण्यास मज्जाव) सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत,
संचारबंदी सायंकाळी 05.00 नंतर (फक्त अत्यावश्यक कामांसाठी मुभा)

जीम/ सलुन/ ब्युटी पार्लर / स्पा/ वेलनेस सेंटर
दररोज सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत क्षमतेच्या 50%
पूर्व- परवानगीसह (Appointment), ए.सी. च्या वापरास मनाई.

सार्वजनिक बस वाहतूक
पूर्ण आसन क्षमतेने परंतु प्रवाशांना उभ्याने प्रवास करण्यास मनाई आहे.

कार्गो वाहतूक सर्व्हीसेस (जास्तीत जास्त तीन व्यक्तींसह)
नियमितपणे पूर्ण वेळ : दररोज.

अंतर जिल्हा प्रवासी वाहतूक (खाजगी कार, टॅक्सी, बस) व ट्र्रेन
नियमीतपणे, जर प्रवासी लेवल 5 मधील भागातून अथवा जिल्हामार्गे प्रवास करीत असल्यास अशा प्रवाशांना ई-पास आवश्यक राहिल.

उत्पादन क्षेत्र (Export Oriented Units) (निर्यात प्रधान उद्योग)
नियमितपणे पूर्ण वेळ : दररोज

उत्पादन क्षेत्र (1. अत्यावश्यक वस्तू व त्याकरिता लागणारा कच्चा माल उत्पादक पॅकेजींग व संपूर्ण साखळीतील सेवा 2. निरंतर प्रक्रिया असलेले उद्योग 3. संरक्षण संबंधित उद्योग 4. डेटा सेंटर/ क्लॉवुड सर्व्हिस प्रोवायडर/ माहिती तंत्रज्ञान सेवा संबंधी, गुंतागुंतीचे पायाभूत सेवा व उद्योग)
नियमितपणे पूर्ण वेळ : दररोज

उत्पादन क्षेत्र (अत्यावश्यक सेवा व निरंतर प्रक्रिया उद्योग, निर्यात प्रधान उद्योग व शासनाच्या आदेश दि. 04 जून 2021 मधील मुद्दा क्र. 23 व 24 मधील बाबी वगळून इतर उत्पादन क्षेत्रातील उद्योग व सेवा)
50% स्टाफचे हालचालीचे परवानगीसह
( With Transport Bubble )
 
उपरोक्त सर्व बाबींसाठी Covid Appropriate Behavior (CAB) अनिवार्य आहे.
1)मास्क वापरणे  2) 2 गज दुरी (6 फुट अंतर) 3)सॅनीटायझर 4)आवश्यकतेनुसार फेसशिल्ड वापरणे आनिवार्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ICC Women's World Cup Final: 'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
लांडगा आला रे आला... पंचायत समिती आवारात 5 जणांवर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी
लांडगा आला रे आला... पंचायत समिती आवारात 5 जणांवर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी
आमदारांच्या पाहणी दौऱ्यात तलाठी महाशय फुल टल्ली; राहुल आवाडेंकडून निलंबनाच्या सूचना
आमदारांच्या पाहणी दौऱ्यात तलाठी महाशय फुल टल्ली; राहुल आवाडेंकडून निलंबनाच्या सूचना
Australia vs India, 2nd T20I: मिस्टर गंभीर भारतीय क्रिकेटमधील नवा ग्रेग चॅपेल, वाट लावून टाकणार! हर्षित राणामुळे 'गुरुजी' विरोधात भडका; नेमकं घडलं तरी काय?
मिस्टर गंभीर भारतीय क्रिकेटमधील नवा ग्रेग चॅपेल, वाट लावून टाकणार! हर्षित राणामुळे 'गुरुजी' विरोधात भडका; नेमकं घडलं तरी काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Phaltan Case: 'तीन Mobile, एक भयानक Triangle, परिस्थिती लोकांसमोर आणण्यासारखी नाही' - Jaykumar Gore
Sanjay Raut's Health: 'प्रकृतीत गंभीर बिघाड', Sanjay Raut दोन महिन्यांच्या ब्रेकवर; PM Modi म्हणाले..
MVA Protest Politics: राज ठाकरेंच्या एन्ट्रीने काँग्रेसमध्ये अस्वस्थता, सत्याच्या मोर्चा'पासून चार हात दूर?
Patil on Party Ownership: 'राष्ट्रवादी पवारांची, शिवसेना ठाकरेंची', चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
Namo Tourism Row: 'एकही नमो सेंटर उभं केलं तर फोडून टाकू', Raj Thackeray यांचा Shinde सरकारला थेट इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ICC Women's World Cup Final: 'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
लांडगा आला रे आला... पंचायत समिती आवारात 5 जणांवर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी
लांडगा आला रे आला... पंचायत समिती आवारात 5 जणांवर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी
आमदारांच्या पाहणी दौऱ्यात तलाठी महाशय फुल टल्ली; राहुल आवाडेंकडून निलंबनाच्या सूचना
आमदारांच्या पाहणी दौऱ्यात तलाठी महाशय फुल टल्ली; राहुल आवाडेंकडून निलंबनाच्या सूचना
Australia vs India, 2nd T20I: मिस्टर गंभीर भारतीय क्रिकेटमधील नवा ग्रेग चॅपेल, वाट लावून टाकणार! हर्षित राणामुळे 'गुरुजी' विरोधात भडका; नेमकं घडलं तरी काय?
मिस्टर गंभीर भारतीय क्रिकेटमधील नवा ग्रेग चॅपेल, वाट लावून टाकणार! हर्षित राणामुळे 'गुरुजी' विरोधात भडका; नेमकं घडलं तरी काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
Ajit Pawar: सारखं माफ, सारखं फुकट, आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही बोललो; कर्जमाफीवरून अजितदादा पुन्हा बोलले!
सारखं माफ, सारखं फुकट, आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही बोललो; कर्जमाफीवरून अजितदादा पुन्हा बोलले!
रोहित आर्यने 23 तारखेला मला संपर्क केला होता; अभिनेत्री रुचिता जाधवने सांगितली 'मन की बात'
रोहित आर्यने 23 तारखेला मला संपर्क केला होता; अभिनेत्री रुचिता जाधवने सांगितली 'मन की बात'
जनतेने तुम्हाला खालून-वरुन पुढून-मागून ओळखलंय, जयकुमार गोरेंचा रामराजेंना टोला, म्हणाले, राजकीय अस्तित्व गमावलेली ही लोक 
जनतेने तुम्हाला खालून-वरुन पुढून-मागून ओळखलंय, जयकुमार गोरेंचा रामराजेंना टोला, म्हणाले, राजकीय अस्तित्व गमावलेली ही लोक 
Embed widget