Sanjay Raut on Bhaiyyaji Joshi : हे तर औरंगजेबापेक्षा भयंकर कृत्य; घाटकोपरची भाषा गुजराती म्हणणाऱ्या आरएसएसच्या भय्याजी जोशींवर संजय राऊतांचा घणाघाती प्रहार
विद्याविहारमधील एका कार्यक्रमात बोलताना भैय्याजी जोशी यांनी उधळळेल्या मुक्ताफळांनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घणाघाती प्रहार केला आहे.

Sanjay Raut on Bhaiyyaji Joshi : मायबोली मराठी आणि मराठी माणसाची रक्त सांडून मिळवलेल्या मुंबईसह महाराष्ट्रात मुस्कटदाबी होत असताना आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मुक्ताफळे उधळत आगीत तेल ओतण्याचा पुन्हा प्रयत्न केला आहे. मुंबई येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही. इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. घाटकोपरमधील भाषा गुजराती असल्याचे अत्यंत वादग्रस्त वक्तव्य भैय्याजी जोशी यांनी केलं आहे. मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. इथं अनेक भाषा बोलल्या जातात”, असंही त्यांनी म्हटलं आहे. विद्याविहारमधील एका कार्यक्रमात बोलताना भैय्याजी जोशी यांनी उधळळेल्या मुक्ताफळांनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घणाघाती प्रहार केला आहे.
हे औरंगजेबापेक्षा भयंकर कृत्य
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात दोन विषय अस्वस्थ करणारे आहेत. भाजप नेते स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी जे भाजपची ध्येय धोरण ठरवतात ते काल मु़बईत जाहीर केलं. मु़ंबईची भाषा मराठी नसल्याचे ते म्हणाले. मीडियाने हा विषय कसा दुर्लक्ष केला? राज्याच्या मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ कसे सहन करता? अशी विचारणा केली. ते म्हणाले की, घाटकोपरची भाषा ही मराठी नाही. त्यांना कोलकाता, यूपी, बेंगळूर पाठवा, इथं बोलू शकतात का? अशी विचारणा त्यांनी केली. महाराष्ट्राच्या राजधानीत येऊन ते सांगत आहेत या भागाची भाषा मराठी नाही. जर आमची भाषा राष्ट्रभाषा आहे तर हा गुन्हा राजद्रोहात बसतो, अशा शब्दात राऊत यांनी सुनावले.
भैयाजी जोशींचा धिक्कार करावा लागेल
संजय राऊत यांनी सांगितले की, इतके हुतात्मे यासाठी शहीद झाले. जय जय महाराष्ट्र राज्यगीत जाहीर केले. भाजप नेते असे बोलून मराठीचा मराठी माणसाचा अपमान करत नाही का? तसं नसेल तर फडणवीस तर जाहीर करावं. कुठे आहेत बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारसदार? त्यांच्यात हिंमत असेल तर बोलून दाखवा. हे औरंगजेबापेक्षा भयंकर कृत्य आहे. मराठी तुमची भाषा नाही हे त्यापेक्षा भयंकर आहे, असल्याचे ते म्हणाले. इथं ते बोलतात कारण लाचार आणि मिंधे इथे सरकार आहे. भैयाजी जोशींचा धिक्कार करावा लागेल नाही, तर तुम्ही खऱ्या आईचं दुध पिलं नसेल. दोन मिंदे उपमुख्यमंत्र्यांनी सांगावं मुंबईची भाषा मराठी नाही, असे आव्हानही त्यांनी दिली. भैयाजीचं कालचं वक्तव्य ऐकूण आमचं रक्त खवळलं आहे. कोरटकर सोलापूरकरप्रमाणे भाजप भैयाजी यांना सोडणार आहे. हे कौरव आहेत.
मुंबईत येणाऱ्या व्यक्तीने मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही
भैय्याजी जोशी म्हणाले की, मुंबईची कुठलीही एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत. वेगवेगळ्या भागात वेगवेगळी भाषा असते. जशी घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला गिरगावात हिंदी बोलणारे कमी सापडतील. तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक दिसतील. मुंबईत येणाऱ्या व्यक्तीने मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
