(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Board 12th HSC Result 2022 : बारावीच्या निकालाबाबत सर्वकाही; वाचा फक्त एका क्लिकवर
Maharashtra Board 12th HSC Result 2022 Date Time : बारावीचा आज निकाल जाहीर होणार असून दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन रिझल्ट विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या वेबसाईटवरही निकाल पाहण्याची सोय आहे. त्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकला भेट द्या.
HSC Result 2022 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा (HSC Exam Result News) आज म्हणजेच, 8 जून 2022 निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी पालकांची धाकधूक वाढली आहे. आज दुपारी एकनंतर एबीपी माझाच्या वेबसाईटवर संपूर्ण निकाल पाहता येणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत अधिकृत घोषणा केली.
वर्षा गायकवाड यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून ट्विटरवरून घोषणा केली. "महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(12 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार, आज दि. 8 जून, 2022 रोजी दु.1 वा. ऑनलाईन जाहीर होईल." असं त्यांनी सांगितलं.
यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या होत्या. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या. पण यंदा मात्र कोरोना आटोक्यात असल्यानं दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. आता मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतिक्षा होती. अशातच आता बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली असून आज निकाल जाहीर होणार आहे. पण दहावीच्या विद्यार्थ्यांना (SSC Exam Result News) मात्र निकालासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल जाहीर होतात. बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात झाल्यानंतर लगेच शिक्षक पेपर तपासणीला सुरुवात करतात. मात्र यंदा दहावी, बारावीचे सहा ते सात पेपर होऊन सुद्धा अद्याप विनाअनुदानित शिक्षकांनी एकही पेपर तपासायला घेतलेला नव्हता. त्यामुळे शिक्षकांच्या पेपर तपासणीच्या बहिष्कारामुळे दहावी आणि बारावीचे निकाल उशिरा जाहीर होणार का? असा सवालही उपस्थित झाला होता. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक काळजीत होते.
बोर्डाच्या शेवटच्या पेपरच्या 60 दिवसांनंतर निकाल जाहीर केला जातो ही प्रमाणित प्रक्रिया आहे. यावेळी बारावीचा पेपर 15 दिवस उशिरा सुरु झाला. त्यामुळे, आम्ही 10 जूनपर्यंत निकाल जाहीर करु, असं बोर्डानं म्हटलं होतं. त्यानुसार बारावीच्या परीक्षांचा निकाल पुढील आठवड्यात, तर दहावीचा निकाल जून अखेरीस लागणार असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या. अशातच आज बारावीचा निकाल जाहीर होणार असून लवकरच दहावीचाही निकाल जाहीर केला जाईल, असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून 12 वीचा निकालाबाबतच्या तारखांबाबत सोशल मीडियावर विविध दावे केले जात होते. मात्र या दाव्यांना पूर्णविराम देत शिक्षण मंत्र्यांनी निकालासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली.
दहावी, बारावीची परीक्षा देण्याऱ्या विद्यार्थांची संख्या
दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थीनी परीक्षा दिली होती. तर बारावी बोर्डाच्या परीक्षा 4 मार्चपासून सुरु झाल्या आणि 7 एप्रिल रोजी संपल्या होत्या. तर राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.
दरम्यान, महाराष्ट्र बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल कोणत्या दिवशी जाहीर होणार, विद्यार्थी आणि पालकांमध्ये याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अशातच देशातील इतर राज्यांतील दहावी, बारावीचे निकाल मात्र जाहीर करण्यात आले आहेत. अशातच, आज बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे लवकरच दहावीच्या निकालाची तारीखही जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- HSC Result 2022 : ऑल द बेस्ट! आज बारावीचा निकाल; दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन रिझल्ट
- HSC Result 2022 Date : बारावी बोर्डाचा निकाल; यंदा एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI