Success Story : चहावाल्याच्या मुलीचे PSI होण्याचे स्वप्न पूर्ण! MPSC परीक्षेत गोंदिया जिल्ह्यातून उत्तीर्ण झालेली एकमेव तरुणी
मनात जिद्द आणि चिकाटी असेल तरच तुम्ही स्पर्धा परीक्षा पास करू शकता (Gondia News) असे प्रीतीचे म्हणणे आहे
Success Story : गोंदिया शहरातील एका चहा विक्रेत्याच्या मुलीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा उत्तीर्ण करीत पोलिश उपनिरीक्षक होण्याचा मान पटकाविला असून प्रीती सुरेश पटले असं या तरुणीचे नाव आहे. प्रीतीने अनेक अडचणींवर मात करत यश संपादन केले आहे, याबाबत संपूर्ण जिल्ह्यातून तिचे कौतुक केले जात आहे.
चहावाल्याच्या मुलीचे PSI होण्याचे स्वप्न पूर्ण!
गोंदिया शहराच्या कुडवा परिसरात राहणारे सुरेश पटले यांचा गोंदिया शहराच्या कुडवा परिसरात चहाचे दुकान आहे, सुरेश यांनी आपल्या दोन मुलींना आणि एका मुलाला उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आत्मनिर्भर केले असून प्रितीने देखील आज वडिलांच्या सहकार्यांने उच्च शिक्षण घेऊन पी एस आय (PSI) पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे , 2017 साली प्रिती स्पर्धा परीक्षेकडे वळली असून 2019 मध्ये घेण्यात आलेल्या एम पी ए सी परीक्षेचा निकाल २५ मार्चला आला असून प्रितीने मुलींच्या ओबीसी प्रवर्गात राज्यात 17 वा क्रमांक मिळविला आहे.
MPSC परीक्षेत गोंदिया जिल्यातून उत्तीर्ण झालेली एकमेव तरुणी
2019 मध्ये घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेत ती गोंदिया जिल्ह्यातून उत्तीर्ण झालेली एकमेव तरुणी आहे. मनात जिद्द आणि चिकाटी असेल तरच तुम्ही स्पर्धा परीक्षा पास करू शकता असे प्रीतीचे म्हणणे आहे. हा काळ प्रीतासठी अत्यंत कठीण असल्याचं तिने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. लॉकडाऊनमुळे वडिलांच्या व्यवसायात अडचणी निर्माण झाल्या. या अडचणीच्या काळात प्रीतीला कुटुंबाची साथ लाभली. पीएसआय परीक्षेमध्ये मिळालेल्या यशानंतर एबीपी माझाशी बोलताना प्रीती म्हणाली की, "मनात जिद्द आणि चिकाटी असेल तरच तुम्ही स्पर्धा परीक्षा पास करू शकता असे प्रीतीचे म्हणणे आहे. मिळालेल यश हे संयमाच्या जोरावर प्राप्त केलंय. इतक्या अडचणींच्या काळात कुटुंबीय सोबत होते तसेच मला मिळालेल्या संधीचे मी नक्कीच सोनं करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन." असं प्रीता म्हणाली.
संबंधित बातम्या :
- MPSC Result : बारामतीच्या शुभम शिंदेची कमाल; मोलमजुरी करणाऱ्याच्या मुलाने घातली PSI पदाला गवसणी
- MPSC: अश्विनी धापसे एमपीएससी परीक्षेत एनटी क प्रवर्गातून राज्यात पहिली
- Beed News : हमालाचा मुलगा बनला PSI! खाकी वर्दीचं स्वप्न उतरलं सत्यात, मिळवले फौजदार पदाचे स्टार