दैव बलवत्तर... माजी कुलगुरूच्या गाडीने उडवले; दुचाकीवरील पती-पत्नी अन् चिमुकला बचावला, व्हिडिओ व्हायरल
कोल्हापूर अपघातातील कारसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली असून सहा जणांना चिरडणारी ती कार शिवाजी विद्यापीठाच्या माजी प्रभारी कुलगुरूंची आहे.

कोल्हापूर : पुण्यातील पोर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच कोल्हापूरमध्येही (Kolhapur) भीषण अपघाताची घटना घडली आहे. शहरातील सायबर चौकात एका भरधाव वेगाने धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांच मृत्यू झाला आहे. मात्र, नशिब बलवत्तर म्हणून या अपघातात एका दुचाकीवरील कुटुंबच थोडक्यात बचावले. कोल्हापूरमधील या अपघाताचा (Accident) व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, भरधाव कारने दोन-तीन दुचाकी चालकांन उडवल्याचं दिसून येत आहे. त्यामध्ये, एका दुचकीवरील तिघे जोराने उडून पडल्याचं पाहायला मिळत आहे. तर, स्कुटीवरुन ट्रिपल सीट जाणाऱ्या तीन मुलीही थोडक्यात बचावल्याचं व्हिडिओत दिसत आहे. मात्र, या भीषण दुर्घनटेत आत्तापर्यंत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
कोल्हापूर अपघातातील कारसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली असून सहा जणांना चिरडणारी ती कार शिवाजी विद्यापीठाच्या माजी प्रभारी कुलगुरूंची आहे. प्र.कुलगुरू व्ही. एम. चव्हाण हे स्वत:च ती कार चालवत होते. व्ही एम चव्हाण यांची प्रकृती बरी नव्हती, तरीही आजारपणात ते कार चालवत असल्याची माहिती मिळाली. या अपघातात कारचालक चव्हाण यांचाही मृत्यू झाला आहे. 6 जणांना उडवणाऱ्या या कारच्या धडकेतून सुदैवाने एका लहान मुलाच व त्याच्या पालकांचा जीव वाचला आहे. देव तारी, त्याला कोण मारी.. या उक्तीप्रमाणे कोल्हापूरमधील ह्या अपघातात दुचाकीवरील कुटुंब सुदैवाने बचावल्याचं व्हिडिओत दिसून येते. दुचाकीवरुन जात असताना पाठिमागून वेगात आलेल्या कारने उडवल्यानंतर दुचाकीवरील तिघेही खाली पडले. या दुचाकीवर पती-पत्नी आणि लहान मुल होते, सुदैवाने तिघेही भीषण अपघातातून बचावले आहेत.
माजी प्रभारी कुलगुरूंची कार
कोल्हापुरातील सायबर चौकात झालेल्या भीषण अपघातात आत्तापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. याच अपघातातील अन्य तिघे गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका चारचाकी गाडीने चार दुचाकीस्वारांना धडक दिली, त्यामध्ये दोन दुचाकीस्वार आणि ज्या कारने धडक दिली, त्याचे चालक वसंत चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. वसंत चव्हाण हे शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू होते. शिवाजी विद्यापीठकडून ते कारने येत असताना सायबर चौकात हा भीषण अपघात घडला. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हायरल झाला असून अपघाताची भीषणता लक्षात येते.
पोलिसांकडून कुटुंबाची चौकशी
दरम्यान, कारचे चालक वसंत चव्हाण यांच्या नातेवाईकांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. चव्हाण यांना कोणता आजार होता का, त्यांच्य वैद्यकीय तपासण्यांबाबतही पोलीस तपास करत आहेत. अपघातातील जखमींना कोल्हापुरातील खासगी रुग्णालय आणि सीपीआर रुग्णालयामध्ये उपचरासाठी दाखल करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
