एक्स्प्लोर

Atal Setu Mumbai : अटल सेतूवरील वाहतूक सुसाट! सात महिन्यांत तब्बल 50 लाख वाहनांनी केला प्रवास

Atal Setu Mumbai: मुंबईतील वाहतुकीसाठी अतिशय महत्वकांशी ठरलेला अटल सेतूबाबत एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे. अटल सेतूने मुंबईतील दळणवळण सुलभ केलंच आहे. शिवाय मुंबईकरांनीही या सेतुला अधिक पसंती दिलीय.

Atal Setu Mumbai : मुंबईतील वाहतुकीसाठी अतिशय महत्वकांशी ठरलेला  'अटल सेतू' (Atal Setu) बाबत एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे. अटल सेतूने मुंबईतील दळणवळण सुलभ केलंच आहे. शिवाय मुंबईकरांनीही या सेतुला अधिक पसंती दिली आहे. कारण अवघ्या सात महिन्यांच्या कालावधीत या सेतूवरून 5 लाख 4 हजार 350 वाहनांनी प्रवास केलाय.  12 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते या अटल सेतूचे लोकार्पण करण्यात आले आणि 13 जानेवारी रोजी हा सेतू वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

हा सेतू भारतातील सर्वाधिक लांबीचा आहे आणि पाण्यावरील सर्वाधिक लांबीचा सेतू म्हणून ओळखला जातो. अटल सेतूच्या लोकार्पणाने मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत एक नवा आयाम जोडला गेल्याच दावा करण्यात आला होता. या सेतूचा वापर सर्व प्रकारच्या वाहनांकडून केला जातो. अशातच गेल्या 13 जानेवारी 2024 ते 25 ऑगस्ट 2024 या सात महिन्यांच्या कालावधीत या सेतूवरून 5 लाख 4 हजार 350 वाहनांनी प्रवास केलाय.

परिणामी,  या अटल सेतूमुळे दक्षिण मुंबई ते पनवेल, पुणे आणि नवी मुंबई दरम्यानच्या प्रवासाच्या वेळात किमान अर्ध्या तासाची बचत होत आहे. बेस्ट, एनएमएमटी बसेस, तसेच एमएसआरटीसीच्या शिवनेरी बस आणि इतर खासगी, व्यावसायिक वाहनेही अटल सेतूचा नियमित वापर करत असल्याचे दिसून आले आहे. हा सेतू दक्षिण मुंबईला नवी मुंबई, पनवेल, आणि पुणे या शहरांशी अधिक वेगाने जोडतो. त्यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होतो आणि वाहतुकीची सुसूत्रता वाढत असल्याचे बोलले जात आहे.

वरळी-शिवडी उन्नत मार्गाचे काम सुमारे 75% पूर्ण

दरम्यान, वरळी-शिवडी उन्नत मार्गाचे काम सुमारे 75% पूर्ण झाले असून, हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर वरळी सी-फेसवरून अटल सेतूवर 5 ते 10 मिनिटांत पोहोचता येईल. शिवाय, चिरले इंटरचेंजपासून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गादरम्यान उन्नत मार्गाचे कामही हाती घेण्यात आले आहे. या सर्व प्रकल्पांच्या पूर्ततेनंतर, दक्षिण मुंबई आणि मुंबईच्या पश्चिम उपनगरे ते नवी मुंबई, पनवेल, पुणे आणि मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई, नवी मुंबई विमानतळांमधील वाहतूक अधिक सुलभ

अटल सेतूच्या उद्घाटनामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या विमानतळांदरम्यानचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे. हा सेतू दक्षिण मुंबईला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यामधील प्रवासासाठी लागणारा वेळ लक्षणीय कमी होणार आहे. या नव्या सेतूमुळे दक्षिण मुंबईतील प्रवाशांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी आता पूर्वीपेक्षा कमी वेळ लागणार आहे. अटल सेतूचा वापर केल्याने मुंबईच्या दोन्ही विमानतळांमधील वाहतूक सुलभ होईल आणि प्रवाशांच्या वेळेची बचत होईल. यामुळे विमानतळांमधील कनेक्टिव्हिटी सुधारली जाईल. याचा फायदा केवळ व्यावसायिक प्रवाशांना नव्हे, तर सर्वसामान्य प्रवाशांनाही होईल.

अटल सेतूमुळे  मुंबईच्या वाहतुकीत मोठा बदल-  एकनाथ शिंदे

अटल सेतूमुळे सुलभ झालेल्या प्रवासाबद्दल प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "अटल सेतूच्या माध्यमातून मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतुकीत एक मोठा बदल घडला आहे आणि लाखो लोकांनी याचा उपयोग केला आहे. केवळ सात महिन्यांच्या कालावधीत अटल सेतूवरून तब्बल ५० लाख वाहने धावली, यावरून या पुलाचे महत्त्व आणि उपयुक्तता दिसून येते. या सेतूमुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि जलद प्रवासाची सुविधा मिळत आहे. या प्रकल्पामुळे मुंबईच्या वाढत्या वाहतुकीवरही प्रभावी तोडगा म्हणून याचा उपयोग होत आहे आणि लाखो नागरिकांना याचा लाभ होत आहे."

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Tatkare : सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
Prakash Abitkar on K P Patil : केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Manifesto : उद्धव ठाकरेंकडून वचननामा जाहीर, महाराष्ट्राला वचन काय?Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरीMahim Aaditya Thackeray Sabha : माहीममध्ये तूर्तास उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची प्रचारसभा नाहीDevendra Fadnavis Vs Eknath Shinde : शिवरायांचं मंदिरावरुन नवा वाद, ठाकरेे Vs फडणवीसांमध्ये जुंपली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Tatkare : सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
Prakash Abitkar on K P Patil : केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
Satara Vidhan Sabha 2024 : बाबांच्या प्रचारासाठी छत्रपतींची लेक भाजी मंडईत येते तेव्हा....
PHOTOS : छत्रपतींच्या प्रचारासाठी राजकन्या भाजी मंडईत
Eknath Shinde: आम्ही राज ठाकरेंच्या मनसेला ऑफर दिली होती, पण.... एकनाथ शिंदेंचा नवा गौप्यस्फोट
आम्ही राज ठाकरेंच्या मनसेला ऑफर दिली होती, पण.... एकनाथ शिंदेंचा नवा गौप्यस्फोट
Bhaskar Jadhav : रामटेक विधानसभेत मविआत बिघाडी, भास्कर जाधव काँग्रेसवर कडाडले, राजेंद्र मुळकांवर कारवाईची मागणी
रामटेक विधानसभेत मविआत बिघाडी, भास्कर जाधव काँग्रेसवर कडाडले, राजेंद्र मुळकांवर कारवाईची मागणी
Amit Thackeray: माहीममध्ये ठाकरे बंधू पडद्यामागे एकत्र?; राजकारणात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा
माहीममध्ये ठाकरे बंधू पडद्यामागे एकत्र?; राजकारणात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा
Embed widget