(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Abhishek Ghosalkar Firing Live Update : ठाकरे गटाचे अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी गुन्हा दाखल, दोघं पोलिसांच्या ताब्यात, तपास गुन्हे शाखेकडे
Abhishek Ghosalkar Death Live Update : शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र अभिषेक घोसाळकर यांच्यावर दहिसरमध्ये गोळीबार करण्यात आला होता.
LIVE
Background
Abhishek Ghosalkar Death Live Update : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर (Abhishek Ghosalkar) झालेल्या गोळीबारात (Dahisar Firing Incident) त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. दहिसरमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होता. घोसाळकरांच्या दिशेने पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, त्यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आता त्यांचा मृत्यू झाला आहे. तर गोळीबार केलेल्या व्यक्तीने स्वतःलाही गोळी मारुन संपवलं.
Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर प्रकरणात अमरिंदर मिश्रावर गुन्हा दाखल
Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर यांच्या प्रकरणात अमरिंदर मिश्रावर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या शस्त्राने अभिषेक यांच्यावर गोळी झाडण्यात आली ते शस्र त्यांचं होतं. त्यामुळे शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवाला त्यांच्या धाकट्या भावाने अग्नी दिला
Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवाला त्यांचा धाकटा भावाने अग्नी दिला आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिसने नोरोन्हा याने गुरुवारी (दि.9) गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर मॉरिसने स्वत:वरही फेसबुक लाईव्ह करत गोळ्या झाडून घेतल्या. त्यानंतर दोघांचाही मृत्यू झाला होता.
Abhishek Ghosalkar Firing Case : "सत्ताधारीच गुन्हेगार झालेत, न्याय कोणाला मागायचा?" बाळासाहेब थोरातांची संतप्त प्रतिक्रिया
Balasaheb Thorat On Abhishek Ghosalkar Firing Case : काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरलंय. राज्य सरकारचा गुन्हेगारांवरचा धाक संपल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर सत्ताधारीच गुन्हेगार झाले आहे. त्यामुळे न्याय कोणाला मागायचा? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. मुंबईतील गोळीबार आणि राहुरी येथील वकील दाम्पत्य हत्येवरून राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली आहे का? अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. भाजपचा (BJP) आमदार गोळीबार करतो आणि मुख्यमंत्र्यांवर आरोप करतो, याचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे, असा समाचार बाळासाहेब थोरात यांनी घेतला आहे.
Abhishek Ghosalkar Firing Case : मॉरिसने आत्महत्या केली नाही, त्याचीही हत्याच, ठाकरे गटाच्या आमदाराचा खळबळजनक दावा
Nitin Deshmukh On Abhishek Ghosalkar Firing Case : ठाकरे गटाचे अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी आमदार नितीन देशमुख यांनी खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणाले, घोसाळकर यांची हत्या केल्यानंतर हत्या करणाऱ्या मॉरीसचीही कुणीतरी हत्या केली असावी असं मला वाटतं. यात कुणीतरी तिसऱ्या माणसाचाही हात असावा अशी दाट शंका आहे.
Abhishek Ghosalkar Firing Case : मॉरिसने आत्महत्या केली नाही, त्याचीही हत्याच, ठाकरे गटाच्या आमदाराचा खळबळजनक दावा
Nitin Deshmukh On Abhishek Ghosalkar Firing Case : ठाकरे गटाचे अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी आमदार नितीन देशमुख यांनी खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणाले, घोसाळकर यांची हत्या केल्यानंतर हत्या करणाऱ्या मॉरीसचीही कुणीतरी हत्या केली असावी असं मला वाटतं. यात कुणीतरी तिसऱ्या माणसाचाही हात असावा अशी दाट शंका आहे.