मोठी बातमी! कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा, 2 वर्षाच्या शिक्षेला स्थगिती, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Agriculture Minister Manikrao Kokate) यांच्यां विरोधात दाखल केलेली याचिका सत्र न्यायालयाने फेटाळली आहे.

Agriculture Minister Manikrao Kokate : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Agriculture Minister Manikrao Kokate) यांच्यां विरोधात दाखल केलेली याचिका सत्र न्यायालयाने फेटाळली आहे. उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. त्याबाबत सुनावणी होण्यासाठी 15 दिवस कामकाज तहकूब करुन वेळ देण्यासाठी नाशिकच्या सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र दाखल केलेल्या याचिकेवर रीट याचिका क्रमांक आणि अर्जदाराची स्वाक्षरी नसल्यानं अंजली राठोड यांची हस्तक्षेप याचिका फेटाळली आहे. थोड्याच वेळात माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगितीवर निकाल येण्याची शक्यता आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Agriculture Minister Manikrao Kokate) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खालच्या कोर्टाने दिलेल्या 2 वर्षाच्या शिक्षेला जिल्हा सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे. शिक्षेला स्थगिती दिल्याने कोकाटे यांची आमदारकी शाबूत राहणार आहे. कमी उत्पन्न दाखवून सरकारच्या 10 टक्के कोट्यातून घर घेतल्याने कनिष्ठ न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूना यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती.
नेमकं प्रकरण काय?
नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी 30 वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. स्वत:सह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या होत्या. यानंतर तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने सदनिका वाटपाची चौकशी केली होती. गुरुवारी (दि. 20) या प्रकरणात नाशिक न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती. दोन वर्षांच्या शिक्षेविरोधात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. यानंतर शिक्षेला स्थगिती मिळावी या अर्जावर सरकार पक्ष आणि बचाव पक्षांकडून युक्तिवाद करण्यात आला होता. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देऊ नये या मागणीसाठी अंजली दिघोळे यांनी याआधी हस्तक्षेप अर्ज दाखल होता. यानंतर शरद शिंदे यांनी देखील हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. या प्रकरणी आज म्हणजे 5 मार्च रोजी सुनावणी पार पडली. यामध्ये माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या 2 वर्षाच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळं त्यांची आमदारकी वाचली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार का? नार्वेकरांच्या दालनात फडणवीस-अजितदादांसोबत बंद दाराआड चर्चा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
