एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 एप्रिल 2020 | रविवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

- नियमांचे पालन केलं तर राज्यातील ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये काही उद्योगधंद्यांना परवानगी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा; आर्थिक संकट निर्माण झाल्याने निर्णय https://bit.ly/3blOkBf
- मुंबईत लॉकडाऊनच्या काळात हॉटस्पॉट वगळता इतर ठिकाणची बंद असलेली बांधकामे आणि पावसाळ्यापूर्वी प्रशासनानं करावयाची कामे अटीशर्तींसह सुरु होणार https://bit.ly/3eAcw4U
- लॉक डाऊनमधे ई-कॉमर्स कंपन्यांना केवळ जीवनावश्यक वस्तूच विकण्याची सूट; केंद्र सरकारचं घुमजाव https://bit.ly/2RNlpOw
- पीएम रिलीफ फंडला मदत म्हणजे भाजपची कोत्या मनाची प्रवृत्ती; देश कोरोना संकटात असताना भाजप राजकारण करण्यात मश्गुल; जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची टीका https://bit.ly/2yphBfF
- राजभवन फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरच्या नियुक्तीवरुन खासदार संजय राऊत यांचा राज्यपालांवर निशाणा https://bit.ly/2xIUD33
- सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांची औरंगाबादमध्ये माहिती, तर राज्यातील 6 जेल आजपासून पूर्ण बंद करणार असल्याचीही माहिती https://bit.ly/3cB2mzf
- केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये 20 टक्के कपात करण्याची योजना ही निव्वळ अफवा; अर्थ मंत्रालयाची माहिती https://bit.ly/2KhrwXj
- बुकिंग सुरु करण्याआधी सरकारच्या निर्णयाची वाट पाहा, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांचा विमान कंपन्यांना सल्ला, एअर इंडियाने बुकींग सुरू केल्याने स्पष्टीकरण https://bit.ly/3eBs9c4
- मराठवाड्यासह अनेक ठिकाणी गारपीट, अवकाळी पावसाने झोडपले; शेतीचे मोठे नुकसान https://bit.ly/2z7WEWU
- जगभरात कोरोनाबाधितांची संख्या 23 लाख 31 हजारांवर, तर मृतांचा आकडा 1 लाख 60 हजारांवर https://bit.ly/3alFbHF
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
बीड
राजकारण
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
