एक्स्प्लोर

लाडकी बहीण योजनेसाठी जीवाचं रान करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा सरकारला विसर? अद्याप परताव्यापासून वंचित

राज्यातील सुमारे 2 कोटी 34 लाख लाभार्थी लाडक्या बहिणींचे फॉर्म भरून घेणाऱ्या आणि महाराष्ट्र सरकारची योजना प्रचंड यशस्वी करणाऱ्या अंगणवाडी सेविका प्रती फॉर्म मागे मिळणाऱ्या पन्नास रुपयांपासून वंचित आहे

Ladaki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत डिसेंबर महिन्याचा म्हणजेच योजना सुरू झाली तेव्हापासूनचा सहावा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र राज्यातील सुमारे 2 कोटी 34 लाख लाभार्थी लाडक्या बहिणींचे फॉर्म भरून घेणाऱ्या आणि महाराष्ट्र सरकारची ही योजना प्रचंड यशस्वी करणाऱ्या अंगणवाडी सेविका प्रती फॉर्म मागे मिळणाऱ्या पन्नास रुपयांपासून वंचित आहे. त्यामुळे योजनेतील लाभार्थी बहिणी सरकारला लाडक्या आहेत, मात्र योजना यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सरकारला परक्या आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अद्याप एक दमडीही मिळाली नाही

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात प्रचंड यशस्वीच झाली नाही, तर निवडणुकीच्या मैदानातही महायुतीसाठी गेमचेंजर ठरली आहे. या योजनेतील 2 कोटी 34 लाख लाभार्थींपैकी बहुतांशी महिलांनी महायुतीला भरभरून मतदान केलं, आणि त्यामुळेच महायुती सत्तेत आधीच्या तुलनेत जास्त भक्कमपणे परत आली,   असच राजकीय विश्लेषण केलं जात आहे. आता नवं सरकार सत्तेवर बसल्यानंतर योजनेतर्गत लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळण्यास ही सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसात सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये पोहोचतील.

मात्र, या योजनेसाठी खेडोपाडी, गल्लोगल्ली गरीब महिलांचे फॉर्म भरून घेणाऱ्या, सरकारकडे त्यांची रीतसर नोंद करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मात्र सरकार विसरले असंच चित्र आहे. कारण अवघ्या दोन तीन महिन्यात तब्बल 2 कोटी 34 लाख फॉर्म भरून घेत अगदी कमी वेळेत योजना यशस्वी करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना प्रती फॉर्म मागे सरकार ने पन्नास रुपये देण्याचे मान्य केले होते. मात्र त्या संदर्भात एक दमडीही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळालेली नाही.

योजना यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या झाल्या परक्या?

जून महिन्यात योजना लॉन्च झाली तेव्हा सरकारने मिशन मोडमध्ये काम केलं. त्यामुळे राज्यातील तब्बल एक लाख आठ हजार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ही दिवस रात्र या कामात लागल्या होत्या. त्या काळात आपापली अंगणवाडी आणि त्याच्याशी जोडलेल्या बालकांचे पोषण व आरोग्य सांभाळत एक एक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी शेकडो महिलांचे फॉर्म भरून दाखवले होते. त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या तब्बल 2 कोटी 34 लाख एवढी प्रचंड झाली होती. एवढं चांगलं काम करून दाखवलं म्हणून सरकार लवकरच आपलेही पैसे देईल, अशी अपेक्षा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना होती. मात्र योजनेचा सहावा हप्ता लाभार्थींच्या खात्यात पोहोचत असतानाही योजना यशस्वी करणाऱ्या महिलांना दमडीही मिळालेली नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी होऊन राज्यात महायुतीचा सरकार पुन्हा सत्तेत आलं आहे. नवीन वर्षात तरी सरकार आमची आठवण ठेवेल, अशी अपेक्षा आता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
Manikrao Kokate : कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas FULL Exclusive : महादेव मुंडे ते चेतना कळसे, नव्या हत्यांचा दाखला, धसांनी नवी वात पेटवलीSaif Ali Khan discharged from hospital : चेहऱ्यावर स्मित हास्त ठेवून सैफची घरात एंट्री ExclusiveWalmik Karad CCTV : देशमुखांच्या हत्येआधी विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये भेट, कराड उपस्थित; ऑफिसबाहेरुन Exclusive आढावाSaif Ali Khan Discharged : सैफ अली खानला डिस्चार्ज, Lilavati रुग्णालयातून घरी दाखल, EXCLUSIVE दृश्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
Manikrao Kokate : कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
Maharashtra Politics: शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
Embed widget