Shraddha Murder Case: श्रद्धा हत्याकांड प्रकरणी सापडला महत्वाचा पुरावा! 'ऑडिओ' क्लिप लागली पोलिसांच्या हाती, आफताबचे सत्य येणार समोर
Shraddha Murder Case: मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलीस या ऑडिओ क्लिपला मोठा पुरावा मानत आहे.
Shraddha Murder Case : दिल्लीतील मेहरौली येथील श्रद्धा वालकर (Shraddha Walkar Murder Case) हत्याकांड प्रकरणी दिल्ली पोलिसांना (Delhi Police) मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावालाची (Aftab Poonawala) ऑडिओ क्लिप (Audio Clip) दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) हाती लागली आहे. या ऑडिओमध्ये आफताबचा श्रद्धासोबतचा वाद समोर आला आहे. यातील संभाषण ऐकताच आफताब श्रद्धावर अत्याचार करत होता, याचा अंदाज लावता येऊ शकतो.
आफताबच्या आवाजाचा नमुना घेणार
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलीस या ऑडिओ क्लिपला मोठा पुरावा मानत आहे. या प्रकरणाच्या तपासाशी संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या ऑडिओमुळे हत्येच्या तपासात हत्येचा हेतू स्पष्ट होईल, यासोबतच या ऑडिओशी आफताबचा आवाज जुळण्यासाठी दिल्ली पोलीस आफताबच्या आवाजाचा नमुना घेणार आहेत. सीबीआयची सीएफएसएल टीम सोमवारी आफताबच्या आवाजाचा नमुना घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Delhi | Aftab Poonawalla, the prime accused in the Shraddha Walkar murder case, brought to CBI headquarters for the voice sampling test pic.twitter.com/3CzOMpNmCe
— ANI (@ANI) December 26, 2022
पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचा पुरावा
यापूर्वी, दिल्ली पोलिसांनी मेहरौली आणि गुरुग्रामच्या जंगलातून जप्त केलेल्या मानवी अवशेषांचे डीएनए नमुने श्रद्धाचे वडील विकास वालकर यांच्या डीएनएशी जुळले होते. पोलिसांनी मेहरौली आणि गुरुग्रामच्या जंगलातून जबडा, मांडीचे हाड आणि शरीराचे काही अवयव जप्त केले होते. दिल्ली पोलिसांनी जप्त केलेले मानवी अवशेष तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवली होती. आरोपींना शिक्षा होण्यासाठी हा डीएनए अहवाल पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
दिल्ली पोलिसांनी 12 नोव्हेंबरला अटक
मिळालेल्या माहितीनुसार, आफताब पूनावालावर श्रद्धा वालकरच्या हत्येचा आरोप आहे. 12 नोव्हेंबरला दिल्ली पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली श्रद्धा वालकरला दक्षिण दिल्लीतील मेहरौली भागात अटक केली होती. आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केला आणि तिच्या शरीराचे सुमारे 35 तुकडे केले. नंतर ते तुकडे अनेक दिवस घरी फ्रीजमध्ये ठेवले. 18 मे 2022 रोजी संध्याकाळी 27 वर्षीय श्रद्धा वालकरची आफताबने गळा आवळून हत्या केली होती.
इतर बातम्या