Gujarat : गुजरातच्या आणंद, मेहसाणा जिल्हाधिकाऱ्यांना नागरिकत्व देण्याचे अधिकार; पाक-अफगाण अल्पसंख्यांकांना भारतीय नागरिकत्व?
Gujarat : MHA ने अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तानमधील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी प्रांतातील आणंद आणि मेहसाणा येथे राहणाऱ्यांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी अधिसूचित करण्यात आले आहे
Gujarat : गुजरातमध्ये 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गुजरातच्या आणंद, मेहसाणा जिल्हाधिकाऱ्यांना नागरिकत्व देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. गुजरात निवडणुकीपूर्वी नागरिकत्व कायदा 1955 अंतर्गत, (Ministry Of Home Affairs) MHA ने आणंद आणि मेहसाणा येथे राहणाऱ्या अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी अधिसूचित करण्यात आले आहे. निवडणुकीपूर्वी केंद्राचे हे मोठे पाऊल मानले जात आहे. नागरिकत्व कायदा, 1955 अंतर्गत नागरिकत्व देण्यात आले आहे.
आता गुजरात राज्यातील दोन जिल्ह्यांतील पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील अल्पसंख्याक भारतीय मानले जातील. कारण त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे. नागरिकत्व कायदा, 1955 अंतर्गत, MHA ने अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान या प्रांतातील आणंद आणि मेहसाणा येथे राहणाऱ्या नागरिकांना (हिंदू) म्हणून मान्यता दिली जाणार आहे. शीख, बौद्ध, जैन, पारशी यांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी अधिसूचित करण्यात आले आहे. Citizenship Amendment Act (CAA) अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधून आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चनांना भारतीय नागरिकत्व प्रदान करते. परंतु या कायद्याखालील नियम सरकारने अद्याप बनवलेले नाहीत, त्यामुळे आतापर्यंत कोणालाही त्याअंतर्गत नागरिकत्व देता येणार नाही.
आनंद आणि मेहसाणा जिल्ह्यात राहणाऱ्यांना संधी
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, गुजरातमधील आनंद आणि मेहसाणा जिल्ह्यात राहणाऱ्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चनांना भारताचे नागरिक म्हणून नोंदणी करण्याची परवानगी दिली जाईल किंवा त्यांना देशाचे नागरिक असल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल. हे नागरिकत्व कायदा, 1955 आणि नागरिकत्व नियम, 2009 च्या कलम 6 मधील तरतुदींनुसार केले जाईल.
नागरिकत्व देण्याची ही असेल प्रक्रिया
गुजरातमधील 2 जिल्ह्यांमध्ये (आणंद आणि मेहसाणा) राहणाऱ्या अशा लोकांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. त्याची पडताळणी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी करणार आहेत. यानंतर जिल्हाधिकारी अर्जासहअहवाल केंद्र सरकारला पाठवतील. जर जिल्हाधिकारी संपूर्ण प्रक्रियेवर समाधानी असतील तर ते अर्जदाराला भारतीय नागरिकत्व देतील आणि प्रमाणपत्र देखील सुपूर्द करतील. ऑनलाइनसोबतच फिजिकल रजिस्टरही जिल्हाधिकाऱ्यांकडे ठेवण्यात येणार आहे. त्यामध्ये देशाचे नागरिक म्हणून त्या व्यक्तींचा तपशील असेल, त्याची एक प्रत एका आठवड्याच्या आत केंद्र सरकारला पाठवावी लागेल.