एक्स्प्लोर

Champions Trophy 2025 : भारताविरुद्ध पाकिस्तानचा खास प्लॅन, विराटला आऊटसाईड ऑफ स्टम्प, रोहित-शुभमानला बाऊन्सर्स

Champions Trophy 2025 Pakistan vs India : भारताविरूद्धचा सामना पाकसाठी करो वा मरो असा आहे. त्यामुळे या सामन्यासाठी पाकिस्तानने विशेष तयारी केली आहे. दुसरीकडे रोहित शर्माची टीम इंडिया आपल्या दुसऱ्या विजयासाठी सज्ज आहे.

Champions Trophy 2025 Pakistan vs India : भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीतील महामुकाबला रविवारी 23 फेब्रुवारीला दुबईत खेळवला जात आहे. या स्पर्धेत पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्धचा सामना गमावला आहे. त्यामुळे भारताविरूद्धचा सामना पाकसाठी करो वा मरो असा आहे. त्यामुळे या सामन्यासाठी पाकिस्तानने विशेष तयारी केली आहे. दुसरीकडे रोहित शर्माची टीम इंडिया आपल्या दुसऱ्या विजयासाठी सज्ज आहे. भारताने बांगलादेशविरुद्ध 6 विकेट्सने सामना जिंकून विजयी सलामी दिली आहे. 

दरम्यान,या हायव्होल्टेज सामन्यासाठी पाकिस्तानी संघाने  दुबईत विशेष तयारी केली आहे. कारण भारताविरूद्धचा सामना गमावल्यास, पाकिस्तानचं आव्हान जवळपास संपुष्टात येणार आहे. भारताविरूद्धचा सामना जिंकून या स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी पाकिस्तानने तयारी केली आहे. 

पाकिस्तानी संघाने शुक्रवारी दुबईच्या मैदानात सरावाचं विशेष सत्र आयोजित केलं होतं. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा 60 धावांनी पराभव झाला होता. त्यामुळे त्या सामन्यात झालेल्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न पाकने केला. 

तीन तासांचं विशेष सराव सत्र

पाक संघाने तब्बल 3 तास विशेष प्रॅक्टिस सेशन आयोजित केलं होतं. कर्णधार मोहम्मद रिझवान वगळता सर्व खेळाडू यामध्ये सहभागी होते. महत्त्वाचं म्हणजे बाबर आझमने विविध गोलंदाजांच्या शैलीनुसार फलंदाजीचा सराव केला. बाबर आझमने 90 चेंडूत 64 धावा केल्या होत्या. संथ फलंदाजीमुळे बाबर आझमवर टीका झाली होती. 

तिकडे पाकिस्तानचे गोलंदाज शाहीनशाह आफ्रिदी आणि हारिस रौफ यांच्यावर भारताविरुद्ध प्रमुख जबाबदारी असेल.  या दोघांनी 7-7 षटकं सलग टाकून सराव केला. यानंतर पाकचे कोच आकिब जावेद आणि कर्णधार रिझवान यांनी सर्व टीमशी दीर्घ चर्चा करुन, भारताला घेरण्याचा प्लॅन रचला. 

विराट-रोहित आणि गिलसाठी खास प्लॅन? 

पाकिस्तानी संघाने किंग विराट कोहली, हिटमॅन रोहित शर्मा आणि प्रिन्स शुभमान गिलसाठी खास रणनीती आखली आहे.  विराट कोहलीला गेल्या काही दिवसात मोठी खेळी करता आलेली नाही. ऑफस्टम्पच्या बाजूने जाणाऱ्या चेंडूवर विराट कोहली सातत्याने बाद होत आहे. त्यामुळे तीच लाईन पकडून गोलंदाजी करण्याचा प्लॅन पाकचा आहे.

दुसरीकडे हिटमॅन रोहित शर्मा आणि शुभमान गिल यांना उसळते चेंडू अर्थात बाऊन्सर्स मारुन घेरायचं, अशी रणनीती पाकिस्तानी गोलंदाजांची आहे.  

भारताचा पहिल्या सामन्यात विजय

दरम्यान, भारताने चॅम्पियन्स चषकाची सुरुवात विजयाने केली. बांगलादेशविरुद्ध 20 फेब्रुवारीला झालेल्या पहिल्या सामन्यात भारतााने 6 विकेट्स राखून विजय मिळवला होता. भारताने प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशला 228 धावांत गुंडाळलं होतं. भारताकडून मोहम्मद शामीने 10 षटकात 53 धावा देत  5 विकेट्स घेतल्या होत्या. दुसरीकडे उपकर्णधार शुभमान गिलने झुंझार शतक ठोकून टीम इंडियाला सोपा विजय मिळवून दिला होता. 

पाकिस्तानी संघ (Pakistan Team) : बाबर आझम, कामरान गुलाम, सऊद शकील, तैयब ताहिर, फहीम अशरफ, खुशदिल शाह, सलमान अली आगा (उप-कर्णधार), मोहम्मद रिजवान (कर्णधार), उस्मान खान, अबरार अहमद, हारिस रऊफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन शाह आफरीदी, इमाम-उल-हक
 
भारतीय संघ (Team India) :  रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उप-कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवींद्र जड़ेजा,  कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह 

संबंधित बातम्या  

IND VS PAK सामन्याआधी पाकिस्तान संघाची मोठी घोषणा! अचानक संघात केला बदल, धाकड खेळाडूची एन्ट्री

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला

व्हिडीओ

Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report
IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
Crime News: नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
Amol Mitkari on Ajit Pawar CM: मोठी बातमी : पृथ्वीबाबांचं वक्तव्य गंभीर, द्विवर्षपूर्तीपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होणार? मिटकरींच्या दाव्याने खळबळ
Maharashtra CM: पृथ्वीबाबांचं वक्तव्य गंभीर, द्विवर्षपूर्तीपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होणार? मिटकरींच्या दाव्याने खळबळ
IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
Embed widget