Champions Trophy 2025 India vs Pakistan: पहिला सामना हरताच टीकेची तोफ, आता दुबई पोहचताच पाकिस्तानची खेळी, विशेष व्यक्तीला बोलावलं
Champions Trophy 2025 India vs Pakistan: भारतविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ दुबईत कसून सराव करत आहे.

Champions Trophy 2025 India vs Pakistan: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेत (Champions Trophy 2025) पहिला सामना गमावल्यानंतर, पाकिस्तानचा संघ आता 'करो या मरो'च्या परिस्थितीत अडकला आहे. या स्पर्धेतील हायव्होलटेज सामना म्हणजेच भारत आणि पाकिस्तानचा (India vs Pakistan) सामना रविवारी (23 फ्रेब्रुवारी) रंगणार आहे. दुबईच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तानचा सामना दुपारी 2.30 वाजता खेळवण्यात येईल. भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यात पाकिस्तानला काहीही करुन विजय मिळवावा लागेल. जर पाकिस्तान संघाने हा सामना गमावला तर त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचणे जवळजवळ अशक्य होईल.
न्यूझीलंडविरुद्ध पहिला सामन्यात पराभव झाल्यानंतर पाकिस्तानवर टीका करण्यात आली होती. आता भारतविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ दुबईत कसून सराव करत आहे. तसेच पाकिस्तानने एका खास व्यक्तीची मदत देखील घेतली आहे. पाकिस्तानचा माजी सलामीवीर मुदस्सर नझर आता पाकिस्तानला संघाला प्रशिक्षण देईल. पाकिस्तानचा संघ दुबईत दाखल झाल्यानंतर मुदस्सर नझरही संघासोबत दिसले. विशेष प्रशिक्षणासाठी पाकिस्तानने मुदस्सर नझरची मदत घेतल्याचे सांगण्यात येत आहे. भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुदस्सर नजर संपूर्ण पाकिस्तान संघाला प्रशिक्षण देईल.
Practice under lights 🏏
— Pakistan Cricket (@TheRealPCB) February 21, 2025
Gearing up for Game No. 2️⃣#ChampionsTrophy | #PAKvIND | #WeHaveWeWill pic.twitter.com/VM2og8G0jr
मुदस्सर नझरला अचानक विशेष प्रशिक्षणासाठी का बोलावण्यात आले?
पाकिस्तानी संघाने युएईला पोहोचताच मुदस्सर नझरला विशेष प्रशिक्षणासाठी बोलवण्यामागचे कारण समोर आले आहे. मुदस्सर नझरला दुबईमधील खेळपट्टीची चांगली माहिती आहे. मुदस्सर नझर हे यूएई संघाचे प्रशिक्षक राहिले आहेत आणि त्यामुळे त्यांना दुबईतील खेळपट्टीचा अनुभव आहे. मुदस्सर नझरने पाकिस्तानी संघाशी बोलून त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. नेट सेशनपूर्वी देखील मुदस्सर नझरने खेळाडूंशी चर्चा केल्याचं दिसून आले.
पाकिस्तानच्या सराव सत्रात काय काय घडले?
मुदस्सर नझरच्या देखरेखीखाली झालेल्या सराव सत्रात बाबर आझमवर पूर्ण लक्ष ठेवण्यात आले. बाबर आझमने संघातील प्रत्येक गोलंदाजाचे 2-2 षटके खेळले. यादरम्यान, त्याने काही चेंडूंवर मोठे फटके मारले. सराव सत्रात, इतर फलंदाजही मोठे फटके मारण्याचा सराव करताना दिसले परंतु बहुतेक वेळा ते अपयशी ठरले. अशा परिस्थितीत, मुदस्सर नझरच्या विशेष प्रशिक्षणाचा भारताविरुद्ध पाकिस्तानला किती फायदा होईल हे येणारा काळच सांगणार आहे.
पाकिस्तानचा संपूर्ण संघ (Pakistan Team) : बाबर आझम, कामरान गुलाम, सऊद शकील, तैयब ताहिर, फहीम अशरफ, खुशदिल शाह, सलमान अली आगा (उप-कर्णधार), मोहम्मद रिजवान (कर्णधार), उस्मान खान, अबरार अहमद, हारिस रऊफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन शाह आफरीदी, इमाम-उल-हक
भारताचा संपूर्ण संघ (Team India) : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उप-कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवींद्र जड़ेजा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह





















