Ind vs Pak : 'पाकिस्तान जिंकला पाहिजे...' भारतीय खेळाडूच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर खळबळ, कोण आहे तो क्रिकेटर?
या माजी भारतीय क्रिकेटपटूने अचानक केलेल्या विधानाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

India vs Pakistan Champions Trophy 2025 5th Match : 'मला वाटत पाकिस्तान जिंकला पाहिजे...' हे विधान कोणत्याही पाकिस्तानी क्रिकेटपटूने नाही तर एका माजी भारतीय क्रिकेटपटूने केले आहे. या माजी भारतीय क्रिकेटपटूने अचानक केलेल्या विधानाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा माजी भारतीय क्रिकेटपटू दुसरा तिसरा कोणी नसून अतुल वासन आहे. तो म्हणाला की, 23 फेब्रुवारी रोजी होणारा हाय व्होल्टेज सामना भारताने नाही तर पाकिस्तानने जिंकावा अशी माझी इच्छा आहे. कदाचित त्यांचे हे विधान भारतीय संघाच्या चाहत्यांना सुईसारखे टोचू शकेल, पण त्यांनी त्यामागील कारण दिले आहे.
'पाकिस्तान जिंकला पाहिजे...'
खरं तर, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या पहिल्याच सामन्यात यजमान पाकिस्तानला न्यूझीलंडकडून 60 धावांनी पराभव पत्करावा लागला. आता जर पाकिस्तान संघ भारताकडून हरला तर स्पर्धेच्या गट टप्प्यातून त्यांची बाहेर पडणे निश्चित आहे. अतुल वासन यांनी एएनआयला सांगितले की, मला हा सामना भारताने नाही तर पाकिस्तानने जिंकावा असे वाटते. कारण ते जिंकले तर स्पर्धेत रंगत पाहायला मिळेल. जर तुम्ही पाकिस्तान जिंकू दिले नाही तर स्पर्धेतील ट्विस्टच पाहायला मिळणार नाही. जर पाकिस्तानचा संघ जिंकला मजा येईल. बरोबरीची लढाई व्हायला हवी."
यादरम्यान, अतुल वासन यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळणाऱ्या भारतीय संघाचे विश्लेषण करताना, प्लेइंग इलेव्हनमधील फलंदाजीची खोली देखील अधोरेखित केली. यासोबतच, त्यांनी दुबईमध्ये फिरकी आक्रमणासोबत जाण्याच्या रणनीतीचेही समर्थन केले. ते म्हणाले की, भारताकडे खूप चांगले फलंदाज आहेत, शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली... अक्षर पटेल आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी करतो. तुम्ही 5 फिरकीपटू निवडले आहेत आणि हा संघ दुबईसाठी सर्वोत्तम आहे.
अतुल वासन यांनी 1990 ते 1991 दरम्यान भारतासाठी 4 कसोटी आणि 9 एकदिवसीय सामने खेळले. अतुल वासन म्हणाले, 'जोपर्यंत पाकिस्तान आपले क्रिकेट सुधारत नाही तोपर्यंत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यात उत्साह नाही. भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत एकूण 135 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. भारताने पाकिस्तानविरुद्ध 57 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, पाकिस्तान संघाने 73 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताला पराभूत केले आहे. याशिवाय 5 सामने अनिर्णीत राहिले.
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर.
पाकिस्तान संघ - इमाम उल हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सलमान आघा, तैयब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद, मोहम्मद हसनैन, उस्मान खान, कामरान गुलाम आणि फहीम अश्रफ.





















