Rahul Gandhi on Budget : पण या सरकारची वैचारिक दिवाळखोरी झालीय; राहुल गांधींचा अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल
Rahul Gandhi on Budget : जागतिक अनिश्चिततेच्या काळात, आपल्या आर्थिक संकटाचे निराकरण करण्यासाठी एक आदर्श बदल आवश्यक होता, पण हे सरकार विचारांचे दिवाळखोर असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.

Rahul Gandhi on Budget : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत वार्षिक सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात पगारदारांना मोठी सूट देण्यात आली असून 12 लाख उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे. तसेच शेतीपासून संरक्षणापर्यंत सर्व गोष्टींसाठी तरतूद करण्यात आली आहे. भाजपच्या नेत्यांनी हा अर्थसंकल्प शेतकरी, मध्यमवर्गीय आणि गरिबांचा अर्थसंकल्प असल्याचे म्हटले आहे, तर विरोधकांनी राजकीय म्हटले आहे.
A band-aid for bullet wounds!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 1, 2025
Amid global uncertainty, solving our economic crisis demanded a paradigm shift.
But this government is bankrupt of ideas.
बंदुकीच्या गोळीत जखमी झालेल्यांना मलमपट्टी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, त्यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. जागतिक अनिश्चिततेच्या काळात, आपल्या आर्थिक संकटाचे निराकरण करण्यासाठी एक आदर्श बदल आवश्यक होता, पण या सरकारची वैचारिक दिवाळखोरी झाल्याचा घणाघात केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, बंदुकीच्या गोळ्यांच्या जखमांवर मलमपट्टी करण्यात आली आहे. जागतिक अनिश्चिततेच्या काळात, आपल्या आर्थिक संकटाचे निराकरण करण्यासाठी एक आदर्श बदल आवश्यक होता, पण हे सरकार विचारांचे दिवाळखोर आहे.
2.किन्तु वर्तमान भाजपा सरकार का भी बजट, कांग्रेस की ही तरह, राजनीतिक स्वार्थ का अधिक व जन एवं देशहित का कम लगता है। अगर ऐसा नहीं है तो इस सरकार में भी लोगों का जीवन लगातार तंग, बदहाल व दुखी क्यों? ’विकसित भारत’ का सपना बहुजनों के हित का भी होना जरूरी।
— Mayawati (@Mayawati) February 1, 2025
दुसरीकडे, बसपा सुप्रीमो मायावती यांनी अर्थसंकल्पाचे वर्णन राष्ट्रीय हिताचे कमी आणि राजकीय हिताचे जास्त असे केले आहे. सपा प्रमुख आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सरकारने अर्थसंकल्पाच्या आकडेवारीसह कुंभमेळ्यात मृत्यूमुखी पडलेल्यांचे आकडे द्यावेत, अशी मागणी केली. मात्र, पंतप्रधान मोदींनी याला सर्वसामान्यांसाठी खिसा भरणारा अर्थसंकल्प म्हटले आहे. या अर्थसंकल्पामुळे केवळ खासगी क्षेत्राला चालना मिळणार नाही तर देशात मोठे बदल पाहायला मिळतील, असे त्यांनी म्हटले आहे.
सरकार बजट के आँकड़े के साथ महाकुंभ में जान गँवानेवाले श्रद्धालुओं के आँकड़े दे। pic.twitter.com/H5gJi1CG4E
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) February 1, 2025
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत म्हटले आहे की, एमएसएमई क्षेत्रासाठी क्रेडिट गॅरंटी कव्हर दुप्पट केल्याबद्दल आणि ₹ 1.5 लाख कोटी जोडल्याबद्दल अभिनंदन. यामुळे स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन मिळेल आणि उत्पादन केंद्रांना चालना मिळेल. पादत्राणे, चामडे आणि खेळणी उत्पादन उद्योगांवर अर्थसंकल्पात लक्ष केंद्रित केल्याने तळागाळातील नोकऱ्यांना चालना मिळेल, ज्यामुळे पंतप्रधान मोदींचे विकसित भारताचे स्वप्न पुढे जाईल.
बजट-2025 विकसित और हर क्षेत्र में श्रेष्ठ भारत के निर्माण की दिशा में मोदी सरकार की दूरदर्शिता का ब्लूप्रिंट है।
— Amit Shah (@AmitShah) February 1, 2025
किसान, गरीब, मध्यम वर्ग, महिला और बच्चों की शिक्षा, पोषण व स्वास्थ्य से लेकर Start Up, Innovation और Investment तक, हर क्षेत्र को समाहित करता यह बजट मोदी जी के…
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
