Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
Parliament Standing Committee : काँग्रेसने केंद्र सरकारकडे 6 स्थायी समित्यांचे अध्यक्षपद मागितले होते, मात्र चार प्रमुख पॅनलला अध्यक्षपद देण्यात आले आहे.
Parliament Standing Committee : केंद्रातील एनडीए सरकारच्या 2024-25 या वर्षासाठी 24 विभागीय संसदीय स्थायी समित्यांची (Parliament Standing Committee) गुरुवारी रात्री उशिरा स्थापना करण्यात आली. प्रत्येक समितीमध्ये राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सदस्यांचा समावेश असतो. काँग्रेसने केंद्र सरकारकडे 6 स्थायी समित्यांचे अध्यक्षपद मागितले होते, मात्र चार प्रमुख पॅनलला अध्यक्षपद देण्यात आले आहे. त्यात परराष्ट्र, शिक्षण, कृषी आणि ग्रामीण व्यवहार या समित्यांचा समावेश आहे.
राहुल गांधी संरक्षण व्यवहार समितीचे सदस्य
राहुल गांधी यांना संरक्षण व्यवहार समितीचे सदस्य करण्यात आले आहे. सोनिया गांधी यांचे नाव कोणत्याही समितीत नाही. भाजप 11 समित्यांचे अध्यक्षपद भूषवणार आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्याकडे कम्युनिकेशन आणि आयटी समितीची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजप खासदार कंगना रणौत यांनाही या समितीचे सदस्य बनवण्यात आले आहे. तृणमूल आणि द्रमुककडे प्रत्येकी दोन समित्यांचे अध्यक्षपद आहे. जेडीयू, टीडीपी, सपा, शिवसेना (एकनाथ शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित) यांना प्रत्येकी एका समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. प्रत्येक विभागीय संसदीय स्थायी समितीमध्ये 31 सदस्य असतात, त्यापैकी 21 लोकसभेतून आणि 10 राज्यसभेतून निवडले जातात. या सर्व समित्यांचा कार्यकाळ एक वर्षापेक्षा जास्त नाही.
सरकारमध्ये किती विभागीय संसदीय स्थायी समित्या आहेत?
उत्तर : भारत सरकारच्या सर्व मंत्रालये/विभागांशी संबंधित एकूण 24 विभागीय संसदीय स्थायी समित्या आहेत. या समित्या दोन प्रकारच्या असतात. पहिली स्थायी समिती आणि दुसरी तदर्थ समिती. काही विशिष्ट कामांसाठी तदर्थ समित्या स्थापन केल्या जातात. ते काम पूर्ण झाल्यावर समिती विसर्जित केली जाते.
प्रश्न : लोकसभा आणि राज्यसभेत स्वतंत्र समित्या आहेत का?
उत्तर : एकूण 24 संसदीय स्थायी समित्या दोन भागात विभागल्या आहेत. लोकसभेत 16 समित्या आहेत, तर 8 समित्या राज्यसभेत काम करतात.
प्रश्न : या समितीमध्ये किती सदस्य आहेत?
उत्तर : या प्रत्येक समितीमध्ये 31 सदस्य असतात, त्यापैकी 21 लोकसभेतून आणि 10 राज्यसभेतून निवडले जातात. या सर्व समित्यांचा कार्यकाळ एक वर्षांपेक्षा जास्त नसतो.
प्रश्नः समितीचे सदस्य कोण निवडतात?
उत्तर : स्थायी समितीचे सदस्य, ज्यांना खासदारांचे पॅनेल असेही म्हणतात. त्याला सभागृहाच्या अध्यक्षांनी नामनिर्देशित केले आहे. अध्यक्षांच्या सूचनेनुसार ते काम करतात.
प्रश्न : समितीचा कार्यकाळ किती असतो?
उत्तर : संसदेत एकूण 50 संसदीय समित्या आहेत. यामध्ये 3 वित्तीय समित्या, 24 विभागीय समित्या, 10 स्थायी समित्या आणि 3 तदर्थ समित्या यांचा समावेश आहे ज्यांचा कार्यकाळ एक वर्षाचा आहे. 4 तदर्थ समित्या आणि 1 स्थायी समितीचा कार्यकाळ 5 वर्षांचा आहे. त्याचबरोबर इतर 5 स्थायी समित्यांचा कार्यकाळ निश्चित नाही.
प्रश्न : संसदीय समितीचे काम काय असते?
उत्तर : प्रत्येक विभागाची वेगळी समिती असते. या समितीचे मुख्य काम संबंधित प्रकरणातील अनियमिततेची चौकशी करणे, नवीन सूचना देणे आणि नवीन नियम व नियमावलीचा मसुदा तयार करणे हे आहे.
इतर महत्वाच्या बातम्या