एक्स्प्लोर
Richest Women in India : ‘या’ आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला, श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानावर कोण?
Billionaire Women in India 2024 : फोर्ब्सने भारतातील सर्वाधिक श्रीमंत महिलांची यादी जाहिर केली आहे. या अब्जाधीश महिल्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर कोण आहे, ते जाणून घ्या.
Top 10 Richest Women in India 2024
1/9

महिला सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने मेहनत करताना आणि यश मिळवताना दिसत आहे. फोर्ब्सने भारतातील सर्वात श्रीमंत टॉप 10 महिलांची यादी जाहीर केली आहे. भारतातील या अब्जाधीश महिलांबद्दल जाणून घ्या.
2/9

सावित्री जिंदल (Savitri Jindal) : भारतातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदल या आहेत. 73 वर्षीय सावित्री जिंदल भारतातील श्रीमंत महिलांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. त्या ओपी जिंदल ग्रुप अँड इनहेरिटेडच्या मानद अध्यक्ष आहेत. त्यांचे पती ओपी जिंदल यांचं 2005 मध्ये निधन झालं, त्यानंतर यांनी कंपनीची सर्व जबाबदारी सांभाळली. सावित्री जिंदल यांची संपत्ती 39.5 अब्ज डॉलर आहे.
3/9

रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) : दिवंगत शेअर बाजार गुंतवणूकदार आणि 'बिग बुल' म्हणून प्रसिद्ध राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला श्रीमंत महिलांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. फोर्ब्सनुसार रेखा झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती 8.7 अब्ज डॉलर आहे. रेखा झुनझुनवाला टायटन कंपनी सोबतच इतर अनेक कंपन्यांमध्ये मोठ्या शेअर होल्डर आहेत. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये टायटन, स्टार हेल्थ आणि अलाईड इन्शुरन्स आणि मेट्रो ब्रँड्स सारख्या स्टॉकचा समावेश आहे.
4/9

विनोद राय गुप्ता (Vinod Rai Gupta) : भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर विनोद राय गुप्ता (Vinod Rai Gupta) या आहेत. या हॅवेल्स इंडिया (Havells India) च्या व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) आहेत. फोर्ब्सनुसार, विनोद राय गुप्ता यांची संपत्ती 6 अब्ज डॉलर आहे. Havells India कंपनी बटणे, फ्रीज, फॅन अशा विविध इलेक्ट्रॉनिक्स संबंधित वस्तू बनवते.
5/9

रेणुका जगतियानी (Renuka Jagtiani) : यानंतर चौथ्या क्रमांकावर रेणुका जगतियानी या आहेत. त्या लँडमार्क ग्रुपच्या (Lankmark Group) सीईओ आहेत. ही कंपनी एक जागतिक ग्राहक समूह (Consumer Group) आहे. लँडमार्क ग्रुप जगभरात हॉस्पिटॅलिटी आणि रिटेल क्षेत्रात आहे. रेणुका जगतियानी यांची एकूण संपत्ती 4.8 अब्ज डॉलर्स आहे.
6/9

अनु आगा (Anu Aga) : फोर्ब्समध्ये देशातील पाचव्या क्रमांकाची श्रीमंत महिला अनु आगा या असून त्यांची एकूण संपत्ती 4 अब्ज डॉलर आहे. अनु आगा यांनी 1980 च्या दशकात त्यांच्या पतीसोबत अभियांत्रिकी कंपनी थरमॅक्समध्ये काम करण्यास सुरुवात केली. 1996 मध्ये पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी कंपनीची जबाबदारी घेतली. 2004 मध्ये त्यांनी पद सोडला, यानंतर त्यांची मुलगी मेहर पुदुमजी यांना पदभार स्वीकारला.
7/9

स्मिता कृष्णा (Smita Krishna) : या देशातील सर्वात श्रीमंत महिला स्मिता कृष्णा आहे. त्यांच्याकडे 4 अब्ज डॉलर्सची संपत्तीही आहे. गोदरेज कुटुंबातील सदस्य स्मिता कृष्णा-गोदरेज यांच्याकडे कुटुंबाच्या संपत्तीमध्ये 20 टक्के मोठा हिस्सा आहे.
8/9

फाल्गुनी नायर-राधा वेंबू : सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत Nykaa च्या कार्यकारी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आणि CEO फाल्गुनी नायर यांचं नाव आहे. फाल्गुनी नायर यांच्याकडे 3.5 अब्ज डॉलर्सच्या संपत्ती असून त्या देशातील सातव्या सर्वात श्रीमंत महिला उद्योगपती आहेत. फाल्गुनी नायरची कंपनी Nykaa ही सौंदर्य उत्पादने बनवणारी आघाडीची कंपनी आहे. Nykaa कंपनीचा अर्धा हिस्सा फाल्गुनी नायरकडे आहे. यानंतर राधा वेंबू या देशाच्या श्रीमंत महिलांमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. राधा वेंबू हे सॉफ्टवेअर क्षेत्रातील एक मोठं असून त्यांची एकूण संपत्ती 3.3 अब्ज डॉलर्स आहे. त्याच्या कंपनीचे नाव झोहो कॉर्पोरेशन आहे.
9/9

किरण मुझुमदार शॉ-लीना तिवारी भारतातील टॉप-10 श्रीमंत महिलांमध्ये किरण मुझुमदार शॉ यांचं नाव नवव्या क्रमांकावर आहे. किरण मुझुमदार शॉ हे फार्मा क्षेत्रातील दिग्गज बायोकॉनच्या अध्यक्षा आहेत.फोर्ब्सनुसार त्यांची एकूण संपत्ती 3.3 अब्ज डॉलर्स आहे. कोरोनाच्या काळात त्यांच्या कंपनीच्या कमाईत मोठी वाढ नोंदवण्यात आली. लीना तिवारी या देशातील दहाव्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला आहेत. त्यांची संपत्ती 3.1 अब्ज डॉलर्स आहे. लीना तिवारी USV फार्मा चालवतात.
Published at : 21 Dec 2024 10:44 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















