एक्स्प्लोर

Manmohan Singh Death: जे कोणाला जमलं नाही, ते मनमोहन सिंगांनी करुन दाखवलं, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर 9 टक्क्यांवर नेला

Manmohan Singh Indian economy: भारतीय अर्थव्यवस्था जागतिक उदारीकरणासाठी खुली करण्यात आल्याने देशातील मध्यमवर्गाला प्रचंड फायदा झाला होता. डॉ. मनमोहन सिंग यांच्या धोरणामुळे भारताचा फायदा

Manmohan Singh Death: देशाचे माजी पंतप्रधान, दूरदृष्टी असलेला संयमी नेता आणि जागतिक पातळीवरील ख्यातनाम अर्थतज्ज्ञ अशी ओळख असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांनी गुरुवारी रात्री दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. ते 92 वर्षांचे होते. डॉ. मनमोहन सिंग यांनी 2004 ते 2014 या काळात देशाचे पंतप्रधानपद भुषविले होते. मनमोहन सिंग यांचा हा कार्यकाळ अनेक चढउतारांनी भरलेला होता. देशात आर्थिक उदारीकरणाचे धोरण राबवून भारतीय अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्यात डॉ. मनमोहन सिंग यांचे महत्त्वाचे योगदान होते.  

मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान असतानाची काही वर्षे ही भारतीय अर्थव्यवस्थेचा सुवर्णकाळ होती. 2004 ते 2007 या काळात भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदराने प्रचंड गती पकडली होती. या काळात मनमोहन सिंग यांच्या सरकारने राबवलेल्या आर्थिक धोरणांमुळे 2007 साली भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर 8 ते 9 टक्क्यांवर जाऊन पोहोचला होता. त्यामुळे भारताने जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचा बहुमान मिळवला होता.  

मनमोहन सिंगांच्या काळातील VAT व्यवस्था 

मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान असताना 2005 साली भारतात व्हॅल्यू अॅडेड टॅक्स (VAT) ही करप्रणाली सुरु केली होती.  विक्री करासाठी असलेल्या जुनाट करप्रणालीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसत असल्याचे लक्षात आल्यानंतर मनमोहन सिंग यांनी हा निर्णय घेतला होता. त्यामुळे जुनाट करप्रणालीचा अंत होऊन व्हॅल्यू अॅडेड टॅक्स (VAT) ही करप्रणाली अंमलात आली होती. मनमोहन सिंग यांनी उद्योगांवरील बोजा कमी करण्यासाठी सर्व्हिस टॅक्सची प्रणालीही सुरु केली. याशिवाय, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना अर्थात मनरेगा ही योजनादेखील मनमोहन सिंग यांच्या काळात सुरु झाली होती. या योजनेअंतर्गत 100 दिवसांचा रोजगार आणि किमान 100 रुपये दिवसाची मजुरी निश्चित करण्यात आली होती. ग्रामीण भागातील तळागाळातील जनतेला मनरेगा योजनेचा मोठा फायदा झाला होता.

शिक्षणाचा अधिकार 

डॉ. मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळातच ‘राईट टू एज्युकेशन’ अर्थात शिक्षणाचा अधिकाराचा कायदा (Right To Education) हा एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेला. याअंतर्गत 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार निश्चित करण्यात आला.

आणखी वाचा

Ind vs Aus 4th Test : अखंड भारत शोकसागरात! मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने हातावर बांधली काळी पट्टी, मोठे कारण आले समोर

अर्थव्यवस्थेचा 'सरदार' हरपला! माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

महत्त्वाच्या बातम्या

Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Rahul Gandhi: 1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL : 6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO
6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
Embed widget