एक्स्प्लोर

Milk Price : भारतात दुधाला सरासरी 50 रुपयांचा दर, तर पाकिस्तानसह नेपाळ आणि बांगलादेशमध्ये किती?  वाचा सविस्तर...

Milk Price : आपल्या देशात एक लिटर दुधासाठी जवळपास 50 रुपये मोजावे लागतात. हे आपणा सर्वांना माहितच असेल. पण आपल्या शेजारच्या देशात दुधाला किती रुपयांचा दर आहे हे माहित आहे का?

Milk Price : दूध (Milk) हा सर्वांनाच आवश्यक असणारा घटक आहे. आपल्या दैनंदीन जीवनात सगळीकडे दुधाचा समावेश केला जातो. आपलं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारात दुधाचा समावेश केला जातो. आपल्या देशात एक लिटर दुधासाठी जवळपास 50 रुपये मोजावे लागतात. हे आपणा सर्वांना माहितच असेल. पण आपल्या शेजारच्या किंवा अन्य देशात दुधाला किती रुपयांचा दर (Milk Price) मिळतो हे तुम्हाला माहिता आहे का?  पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि चीनमध्ये सध्या दुधाला किती दर आहे. याची माहिती आपण जाणून घेऊयात...

पाकिस्तान (Pakistan)

आपल्या शेजारचा देश असलेल्या पाकिस्तानमध्ये दुधाची किंमत भारतापेक्षा तिप्पट आहे. एक लिटर दुधासाठी पाकिस्तानमध्ये तब्बल 170 रुपये मोजावे लागतात. 26 ऑक्टोबर 2022 रोजी कराचीच्या आयुक्तांनी यासंदर्भात अधिकृत अधिसूचनाही जारी केली होती. तर गेल्या वर्षी डिसेंबर 2021 मध्ये दुधाचा सरकारी दर 120 रुपये प्रति लिटर ठरवण्यात आला होता. त्यानंतर या आदेशाला दूध विक्रेत्यांनी विरोध केला होता. 200 रुपये लिटरने दूध विकण्याची मागणी करण्यात आली होती. यावरुन सरकारी यंत्रणा आणि स्थानिक विक्रेते यांच्यात जोरदार वादावादी झाली.

बांगलादेश (Bangladesh)

पाकिस्तानात सुरु असलेल्या खराब आर्थिक स्थितीचा आणि मंदीचा परिणाम दुधाच्या किंमतीवर दिसत आहे. तर दुसरीकडे, बांगलादेश या बाबतीत आर्थिकदृष्ट्या संपन्न वाटतो. पाकिस्तानात जिथे दुधाचा दर प्रति लिटर 150 रुपयांच्या वर आहे तिथं बांगलादेशात दुधाची किंमत प्रति लिटर 0.73 डॉलर आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार बांगलादेशात एक लिटर दुधासाठी 60 रुपये मोजावे लागतात. 

नेपाळ (Nepal)

नेपाळचे चलन डॉलरच्या तुलनेत काहीसे कमकुवत आहे. त्याचा परिणाम दुधाच्या दरावर दिसून येत आहे. नेपाळच्या डेअरी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने निर्देश जारी करून काही महिन्यांपूर्वीच दुधाचा दर प्रतिलिटर 85 रुपये निश्चित केला होता. सध्या नेपाळमध्ये प्रति लिटर दुधासाठी 85  ते 90 रुपये मोजावे लागत आहेत.

चीन (China)

चीनची चलन स्थिती इतर देशांच्या तुलनेत मजबूत आहे. चिनी दुधाची किंमत प्रतिलिटर 1.39 डॉलर आहे. भारतीय चलनानुसार, एका भारतीय व्यक्तीला चीनमध्ये दूध खरेदी करण्यासाठी सुमारे 114 रुपये खर्च करावे लागतील. म्हणजेच चीनमध्ये दूध पिणे भारतीयांसाठी खूप महाग आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Success Story : गायीच्या दूध आणि शेणातून बांधला एक कोटीचा बंगला, वर्षाला तब्बल दीड कोटींचा नफा, वाचा प्रकाश इमडेंची यशोगाथा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shirdi : साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
बोधेगाव मंदिरातील सेवेकऱ्याचा मारेकरी कोण? पोलिसांकडून संशियत ताब्यात; गुणरत्न सदावर्तेंचाही संताप
बोधेगाव मंदिरातील सेवेकऱ्याचा मारेकरी कोण? पोलिसांकडून संशियत ताब्यात; गुणरत्न सदावर्तेंचाही संताप
BMC Budget: मुंबईकरांना महापालिकेच्या बजेट मधून काय मिळणार? एका क्लिकवर 8 मुद्दे
BMC Budget: मुंबईकरांना महापालिकेच्या बजेट मधून काय मिळणार? एका क्लिकवर 8 मुद्दे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 04 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सAnjali Damania Full PC : बीडमध्ये दादागिरी आणि जमिनी लाटण्याचं काम, अंजली दमानियांचा मुंडेंवर वारAnjali Damania vs Dhananjay Munde : अंजली दमानियांकडून धनंजय मुंडेंवर आरोपांची सरबत्तीTop 100 | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 04 Feb 2025 ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirdi : साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
बोधेगाव मंदिरातील सेवेकऱ्याचा मारेकरी कोण? पोलिसांकडून संशियत ताब्यात; गुणरत्न सदावर्तेंचाही संताप
बोधेगाव मंदिरातील सेवेकऱ्याचा मारेकरी कोण? पोलिसांकडून संशियत ताब्यात; गुणरत्न सदावर्तेंचाही संताप
BMC Budget: मुंबईकरांना महापालिकेच्या बजेट मधून काय मिळणार? एका क्लिकवर 8 मुद्दे
BMC Budget: मुंबईकरांना महापालिकेच्या बजेट मधून काय मिळणार? एका क्लिकवर 8 मुद्दे
Shirdi Assembly Constituency : राहुल गांधी यांच्या आरोपावर राहाता प्रशासनाचा खुलासा; जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर
राहुल गांधी यांच्या आरोपावर राहाता प्रशासनाचा खुलासा; जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर
अंजली दमानिया, CM फडणवीस अन् एकनाथ शिंदेंना सेफ झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न का करता? सुषमा अंधारेंचा सवाल
अंजली दमानिया, CM फडणवीस अन् एकनाथ शिंदेंना सेफ झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न का करता? सुषमा अंधारेंचा सवाल
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे नियम टीव्हीवर येऊद्या, लोकांना कळू द्या, छगन भुजबळांनी संभ्रम टाळण्यासाठी सरकारला कृती कार्यक्रम दिला
लाडक्या बहीण योजनेतील 'त्या' बहिणींकडून पैसे परत घेण्याचा उपदव्याप नको, छगन भुजबळांचा सरकारला सल्ला
Varsha Bungalow: वर्षा बंगल्यात काळी जादू, रेड्यांची पुरलेली शिंगं; संजय राऊतांचा स्फोटक दावा
वर्षा बंगल्यावर खड्डा खणून बळी दिलेल्या रेड्यांची शिंगं का पुरली? संजय राऊतांचा धक्कादायक दावा
Embed widget