एक्स्प्लोर

Success Story : गायीच्या दूध आणि शेणातून बांधला एक कोटीचा बंगला, वर्षाला तब्बल दीड कोटींचा नफा, वाचा प्रकाश इमडेंची यशोगाथा

Maharashtra Solapur Farmer Success Story : सांगोला तालुक्यातील एका शेतकऱ्याने दूध व्यवसायातून मोठी प्रगती केली आहे. ते दूध आणि शेणातून वर्षाला तब्बल दीड कोटी रुपयांचा उत्पन्न घेत आहेत.

Sangola Farmer Success Story : सांगोला (sangola) तालुक्यातील इमडेवाडीच्या (imdevadi) एका शेतकऱ्यानं अपार कष्टानं एखाद्या कार्पोरेट कंपनीलाही लाजवेल असा उद्योग केला आहे. प्रकाश इमडे (Prakash Imday) असं या शेतकऱ्याचे नाव आहे. ते दूध आणि शेणातून वर्षाला तब्बल दीड कोटी रुपयांचा उत्पन्न घेत आहेत. त्यांनी या उत्पन्नातून टोलेजंग असा एक कोटी रुपयांचा बंगला देखील बांधला आहे. पाहुयात इमडेवाडीच्या प्रकाश  नेमाडेंची यशोगाथा...

Maharashtra Solapur News farmer success story : रोज एक हजार लीटर दूध

प्रकाश इमडेंना वडिलोपार्जित चार एकर कोरडवाहू जमीन आणि एक गाय आणि अपार जिद्द आणि कष्ट करण्याची धडपड एवढं भांडवल आहे. त्या एका गायीपासून सुरु केलेला प्रकाश इमडेंचा दूध व्यवसाय,  आज तब्बल 150 गायींमध्ये रुपांतरीत झाला आहे. प्रकाश इमडे हे रोज एक हजार लिटर दूध डेअरीला देत आहेत. एखाद्या कार्पोरेट कंपनीला लाजवेल असे नियोजन केल्यामुळं या अशिक्षित शेतकऱ्याने अल्पावधीत वेगळं वैभव उभं केलं आहे.

Success Story : गायीच्या दूध आणि शेणातून बांधला एक कोटीचा बंगला, वर्षाला तब्बल दीड कोटींचा नफा, वाचा प्रकाश इमडेंची यशोगाथा

Maharashtra Solapur News : गायीचा फोटो देवघरात 

दूध आणि शेणातून वर्षाकाठी तब्बल दीड कोटीचे उत्पन्न घेणाऱ्या या प्रकाशबापूंशी बोलताना त्यांच्या अफाट अनुभव आणि अद्ययावत तंत्रज्ञानाची सांगड घालून व्यवसाय कसा करावा याचे धडे तरुणांना मिळू शकतात. सांगोला तालुक्यातील इमडेवाडी या गावातील प्रकाश इमडे हे अल्पभूधारक शेतकरी. मात्र, त्यांनी आपल्या एका गायीपासून उभारलेलं वैभव भल्याभल्याना तोंडात बोट घालायला लावते. व्यवसायाला साथ दिलेल्या या गायीचा फोटो आज त्यांच्या देवघरात आहे. तिचं दर्शन घेतल्याशिवाय इमडे कुटुंबीय आपल्या दिवसाची सुरुवात करत नाहीत. या गायींच्या शेणापासून इमडेंनी एक कोटींचा टोलेजंग बंगला आपल्या रानात उभारला आहे. या बंगल्याला नावही 'गोधन निवास' असं दिलं आहे. या घरावर या गायीचा आणि दुधाच्या कँडचा पुतळा आहे. गावात शिरताच तो लक्ष वेधून घेतो. इमडेवाडीत नेहमीच गाड्यांची वर्दळ असते, ती फक्त प्रकाश इमडे यांचा गोठा पाहायला येणाऱ्या लोकांची. 

Success Story : गायीच्या दूध आणि शेणातून बांधला एक कोटीचा बंगला, वर्षाला तब्बल दीड कोटींचा नफा, वाचा प्रकाश इमडेंची यशोगाथा

Maharashtra Solapur News farmer success story : पाहा कसं आहे नियोजन

चार एकर शेतीत प्रकाश नेमाडे यांनी दोन एकरमध्ये मुक्त गोठा आणि आपला बंगला उभारला आहे. उरलेल्या दोन एकरमध्ये त्यांनी गायींसाठी हिरवी वैरण लावलेली आहे. प्रकाशबापू यांनी आपल्या एकमेव गायीवर 1998 साली या व्यवसायाला सुरुवात केली. आपल्याला मोठ्या कंपनीसारखा सचोटीने व्यवसाय करुन मोठं व्हायचं आहे ही जिद्द त्यांनी ठेवली. या एकाच गायीपासून त्यांनी आज जवळपास 150 गायी वाढवल्या आहेत. आपल्या पहिल्या गायीला गाभ राहिल्यावर होणारी एकही पाडी त्यांनी कधीच विकली नाही. त्यामुळं आजही त्यांच्याकडे 150 गायी आहेत. मूळ व्यवसाय सुरु केलेली लक्ष्मी 2006 साली गेल्यावर त्यांनी त्याच गायीच्या वंशावर ही वंशवेल वाढवत नेली आहे. आज त्यांच्या मुक्त गोठ्यात अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने चारा, पाणी, स्वच्छता, आरोग्य याची काळजी घेतली जाते. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रकाशबापूंनी हा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यांच्या गोठ्यात पंजाबमधील गायी जेवढं दूध देतात तेवढंच दूध देणाऱ्या गायी देखील आहेत.

रोज गायींना चार ते पाच टन हिरवा चार लागतो

सुरुवातीला पाणी नसताना प्रकाशबापूंनी टँकरने पाणी आणून गायींचा सांभाळ केला. पण आता त्यांनी शेतात एक मोठे शेततळे केले असून, त्यांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. जनावरांना लागणारी वैरण बापू टेंडर काढून विकत घेतात. आज त्यांना जवळपास रोज चार ते पाच टन हिरवा चार लागतो. तेवढाच मुरघास ते विकत घेतात. दुभत्या जनावरांना मुरघास आणि दुसऱ्या गायींना हिरवा चार दिला जातो. बापूंच्या गोठ्यात इतक्या गायी असून कधीही साप, नाग, विंचू , बेंडकुळ्या दिसत नाहीत. याचे मजेशीर कारण काय तर, प्रकाशबापूंनी शेतात तीन बदके आणून ठेवली आहेत. ही बदके गोठा आणि शेतात सातत्याने फिरत असतात. या बदकाच्या भीतीने गेल्या आठ ते दहा वर्षात त्यांच्या शेतात कधीही साप, बेडूक आणि विंचवासारखे प्राणी दिसले नसल्याचे ते सांगतात. इमडेंनी उभारलेले हे वैभव पाहण्यासाठी रोज राज्यभरातून दूध व्यावसायिक इथे येऊन भेट देतात. त्यांना प्रकाशबापू सर्व पद्धतीचे मार्गदर्शनही करतात. 

Success Story : गायीच्या दूध आणि शेणातून बांधला एक कोटीचा बंगला, वर्षाला तब्बल दीड कोटींचा नफा, वाचा प्रकाश इमडेंची यशोगाथा

वर्षाला शेणातून 12 लाख रुपयांचे उत्पन्न 

गेल्या 20 वर्षांपासून बापू एक दिवसही कधी गोठा सोडून बाहेर गेले नाहीत. बापूंची पत्नी सिंधुताई, मुलगा विजय, सुनबाई मेघारानी आणि नातू हर्षद हे सर्वच या गोठ्यात राबत असतात. बापूंची सून एकटी 55 गायींच्या धारा काढते.  आता गोठ्यात चार मजूर कामाला असले तरी बापूंचे कुटुंब देखील या गोठ्यात राबत असते. त्यामुळेच वर्षाला दुधाचे लाखोंचे उत्पन्न असूनही शेणातूनही दरवर्षी 12 लाख रुपये मिळतात. आता बापूंनी गायी वाढवण्यापेक्षा कमी गायींपासून जास्त दुधासाठीचे अद्ययावत तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली आहे. पूर्वी 25 लिटर दूध देणाऱ्या गायी 40 लिटरपर्यंत दूध देत आहेत. 

Success Story : गायीच्या दूध आणि शेणातून बांधला एक कोटीचा बंगला, वर्षाला तब्बल दीड कोटींचा नफा, वाचा प्रकाश इमडेंची यशोगाथा

प्रकाश इमडेंनी जिद्दीनं आणि प्रामाणिक कष्ट करुन हा दूध व्यवसाय केला आहे. कमी भांडवलात वर्षाला लाखो रुपयांचे  हमखास उत्पन्न मिळू शकते असा सल्ला प्रकाश बापू इमडे यांनी दिला. त्यामुळेच त्यांच्या गोठ्याला भेट देणारा प्रत्येक तरुण जाताना प्रेरणा घेऊन जातो.

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture News : शेणापासून गोवऱ्या तयार करुन पाडली उत्पन्नात भर, वर्ध्यातील अल्पभूधारक शेतकऱ्याचा उपक्रम

यशोगाथा! दुष्काळी भागात सीताफळाची बाग फुलवली; दीड एकरातून 12 लाखांचे उत्पन्नाची अपेक्षा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Special Report Mahayuti : महायुतीत उमेदवारांचे गूढ, महायुतीचे उमेदवार अजूनही ठरेना!Narendra Modi Full Speech : 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; मराठी म्हणीतून काँग्रेसवर हल्लाNarendra Modi Wardha Speech : तडस - राणांसाठी नरेंद्र मोदींची सभा! वर्ध्यात घोषणांचा पाऊसMadha Lok Sabha : भाजपला माढ्यात मोठा धक्का! मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर एकत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
एमएस धोनी : तो आला, त्याने पाहिले, त्याने फिनिशिंग केली, लखनौच्या गोलंदाजांना चोपलं
एमएस धोनी : तो आला, त्याने पाहिले, त्याने फिनिशिंग केली, लखनौच्या गोलंदाजांना चोपलं
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
Embed widget