एक्स्प्लोर
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात दिल्लीत सोनिया आणि राहुल गांधींना भेटले
लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव झाला होता. काँग्रेसला राज्यात केवळ एका जागी विजय मिळाला होता. राज्यातील या पराभवाची जबाबदारी घेत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला होता.

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज दिल्लीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. दरम्यान, उद्यापासून विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा वाटपाची पहिली चर्चा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान त्याआधी भाजपचे खासदार सुजय विखे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या एकत्र विमान प्रवासाचे फोटो आता व्हायरल झाले होते. शिर्डीहून दिल्लीला विमान प्रवास करतानाचे हे फोटो असल्याची माहिती मिळाली आहे.
लोकसभा निवडणुकीआधी सुजय विखेंनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभेची निवडणूक लढली आणि ते विजयी झाले. दरम्यान निवडणुकीच्या प्रचारात बाळासाहेब थोरातांनी सुजय विखेंसह राधाकृष्ण विखेंवरही निशाणा साधला होता. मात्र, आज दोन्ही नेते एकाच विमानातून प्रवास करताना सोबत दिसल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला नवा विषय रंगला आहे.
नुकतीच महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. तसेच यावेळी एका अध्यक्षासह पाच कार्यकारी अध्यक्षांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. नितीन राऊत, डॉ. बसवराज पाटील, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर आणि मुजफ्फर हुसेन या पाच जणांची कार्यध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव झाला होता. काँग्रेसला राज्यात केवळ एका जागी विजय मिळाला होता. राज्यातील या पराभवाची जबाबदारी घेत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला होता.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसला मोठे धक्के बसत आहेत. अनेक मोठे नेते, आमदार शिवसेना-भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे राज्यात पक्षनेतृत्व बदलाची गरज होती, तशी चर्चाही गेल्या काही दिवसांपासून होती. त्यामुळे राज्यात काँग्रेसने नव्याने पक्ष बांधणी करण्यास सुरुवात केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
