भाजपला 39 ते 44 जागा, दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत केजरीवालांना मोठा धक्का बसण्याची शक्यता, चाणक्यचा सर्व्हे समोर
Delhi Vidhansabha Election Exit Poll :भाजपला 39 ते 44 जागा, दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत केजरीवालांना मोठा धक्का बसण्याची शक्यता, चाणक्यचा सर्व्हे समोर

Delhi Vidhansabha Election Exit Poll : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज (दि.5) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत दिल्लीत 57 टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावलाय. दरम्यान, मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर चाणक्यचा एक्सिट पोल समोर आलाय. या सर्व्हेनुसार, दिल्लीत माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका करण्याची शक्यता आहे. भाजपला 39 ते 44 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे चाणक्यचा सर्व्हे भाजप सत्ता खेचून आणेल असा अंदाज व्यक्त करत आहे.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, दिल्लीत सायंकाळी पाच वाजेपर्यंत 57. 70 टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावलाय. मुस्तफाबाद या विधानसभा मतदारसंघातील लोकांनी सर्वात जास्त मतदानाचा हक्क बजावलाय. आता दिल्लीत मतदानाची वेळ संपली आहे. दरम्यान, 6 पर्यंत मतदान केंद्रावर पोहोचलेल्या लोकांना मतदान करता येऊ शकते. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याची देखील शक्यता आहे.
भाजपला 39 ते 44 जागा मिळण्याची शक्यता, चाणक्यचा सर्व्हे समोर
चाणक्यच्या एक्सिट पोलनुसार, आम आदमी पक्षाला दिल्लीत 25 ते 28 जागांवर समाधान मानावे लागू शकते, तर दिल्लीत यावेळी भाजप मोठी मुसंडी मारेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. भारतीय जनता पक्षाला दिल्लीत 39 ते 44 जागा मिळण्याचा अंदाज चाणक्यने व्यक्त केलाय. त्यामुळे भाजप दिल्लीत पहिल्यांदाच बहुमताचा आकडा मिळवेल, असे बोलले जात आहे. शिवाय, काँग्रेस सुद्धा दिल्लीत 2 ते 3 जागा मिळवू शकते.
जवळपास सर्वच एक्सिट पोलमध्ये आपला मोठा धक्का
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता एक्सिट पोल हाती येऊ लागले आहेत. या एक्सिटपोलमधून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला तगडा धक्का बसण्याची शक्यता आहे. चाणक्य शिवाय, मॅट्रिझ आणि पोल डायरीने देखील भाजपला बहुमत मिळेल, असा अंदाज व्यक्त केलाय. त्यामुळे 8 तारखेला दिल्ली विधानसभेच्या निकालावर सर्वांच्या नजरा असणार आहेत.
First Time Voters of West Delhi!#dilldilsevotekaregi #votewestdelhistyle#delhidecides @ECISVEEP @CeodelhiOffice @SinghKinny pic.twitter.com/3XL715lvtX
— DM/DEO West Delhi (@DMwestDelhi) February 5, 2025
#DilliDilSeVoteKaregi ♥️
— Election Commission of India (@ECISVEEP) February 5, 2025
Transgender voters cast their vote and make use of their rights! #DelhiDecides#DelhiElection2025 #DelhiAssemblyElection2025 #Delhi pic.twitter.com/6rRu4Iq9Hp
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
