Exit Poll Delhi : केजरीवालांचा गड ढासळणार? दिल्लीत भाजपची सरशी? पहिल्या आकडेवारीत आपला झटका, एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी
Delhi Exit Poll Results 2025 : बहुतांश एक्झिट पोलमध्ये दिल्लीची सत्ता भाजपकडे जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काँग्रेसला एक ते दोन जागा मिळण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये विधानसभेची मतदानप्रक्रिया पार पडली असून आता एक्झिट पोलची आकडेवारी (Delhi Exit Poll Results 2025० समोर येत आहे. त्यामध्ये भाजप आणि आप या दोन पक्षांमध्ये जोरदार टक्कर असणार आहे असं चित्र दिसतंय. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपची आपवर काहीशी सरशी असल्याचं दिसून येतंय. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी निवडणूक झाली असून 8 फेब्रुवारी रोजी त्याचा निकाल जाहीर होणार आहे.
MATRIZE EXIT POLL : मॅट्रीजचा दिल्लीतील एक्झिट पोल
भाजप आणि आप यांच्यात चुरशीची लढत असणार आहे. या चुरशीच्या स्पर्धेत भाजप आपपेक्षा काहीशा अधिक जागा घेऊन सत्तेत येण्याची शक्यता या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे.
मतदानाची टक्केवारी कशी?
भाजप - 46% मते,
आप - 44% मते
भाजप - 35-40 जागा,
आप - 32-37 जागा-मॅट्रिझ
CHANAKYA STRATEGIES Exit Poll : चाणक्य स्ट्रॅटेजीजचा एक्झिट पोल
भाजप- 39-44 जागा
आप- 25-28 जागा
काँग्रेसला - 2-3 जागा
पोल डायरीचा एक्झिट पोल
भाजप - 42-50
AAP - 18-25
कांग्रेस - 0-2
मतांची टक्केवारी कशी?
भाजप - 45 %
AAP - 42 %
पीपल्स इनसाइटचा एक्झिट पोल
भाजप - 40-44 जागा
आप - 25-29 जागा
काँग्रेस - 0-1 जागा
P-Marq Exit Poll : पी मार्क एक्झिट पोल
भाजप - 39-49
AAP - 21-31
कांग्रेस - 0-1
WeePreside Exit Poll : वी प्रीसाईड एक्झिट पोल
भाजप - 46-52
AAP - 18-23
कांग्रेस - 0-1
मतांची टक्केवारी कशी?
भाजप - 49.2 %
AAP - 42.8 %
कांग्रेस - 5.1 %
दिल्ली सट्टेबाजारातील धक्कादायक आकडेवारी
दिल्ली सट्टा बाजारच्या मते, दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला 38 ते 40 तर भाजपला 30 ते 32 जागा मिळतील. त्याचवेळी काँग्रेसला एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज आहे.
ही बातमी वाचा :




















