UAE: बुर्ज खलिफावर झळकला भारताचा तिरंगा; दुबईच्या किंगकडून हिंदीतून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा
Indian Flag: दुबईच्या सर्वात उंच इमारतीवर स्वातंत्र्यदिनी भारताचा ध्वज झळकला आहे, दुबईच्या प्रशासकाने देखील हिंदीमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Burj khalifa Indian Flag: भारत आपला 77वा स्वातंत्र्य दिन (Independence Day) साजरा करत असताना दुबईतील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर देखील भारताचा ध्वज (Indian Flag on Burj Khalifa) झळकला. बुर्ज खलिफावर (Burj Khalifa) मंगळवारी (15 ऑगस्ट) संध्याकाळी देशाच्या सन्मानार्थ भारताचा ध्वज प्रदर्शित करण्यात आला अन् गगनचुंबी इमारत तीन रंगांनी उजळून निघाली. यासह दुबईच्या प्रशासकाने देखील स्वातंत्र्य दिनानिमित्ताने हिंदी आणि इंग्रजीतून भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत दिल्या शुभेच्छा
बुर्ज खलिफा (Burj Khalifa) इमारतीचं ट्विटरसह इन्स्टाग्रामवर अधिकृत खातं (Official Account) आहे. पण त्याचं ट्विटर खातं तितकं अॅक्टिव्ह नाही, मात्र इन्स्टाग्रामवर ते बरेच सक्रिय असतात. बुर्ज खलिफाच्या इन्साटाग्राम अकाऊंटवरुन भारताचा तिरंगा प्रदर्शित केल्याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यांच्या या पोस्टला इन्स्टाग्रामवर प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. जवळपास 1 लाख 20 हजार लोकांनी ही व्हिडीओ लाईक केली आहे.
इमारतीवर दाखवण्यात आलेल्या व्हिडिओमधून भारताला शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. इमारतीवर महात्मा गांधींचं चित्र आणि मजकूर स्क्रोल प्रदर्शित झाला, ज्यात लिहिलं होतं “भारतमातेला 77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. भारत आणि UAE मैत्री चिरंजीव. हर घर तिरंगा. जय हिंद.”
बुर्ज खलिफाने इन्स्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमधून देखील भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, ज्यात त्यांनी म्हंटलंय "Burj Khalifa भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाचं स्मरण करत आहे. भारताने त्यांच्या देशाचा समृद्ध इतिहास आणि वैविध्यपूर्ण संस्कृती जपली आहे. भारत असाच प्रगती, एकता आणि समृद्धीने भरलेला राहो. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!"
View this post on Instagram
दुबईच्या शासकाकडून देखील भारताला शुभेच्छा
दरम्यान, दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम (Sheikh Mohammed bin Rashid Al Maktoum) यांनी देखील भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दुबईच्या शासकाने ट्विटरवरुन भारताच्या राष्ट्रभाषेत भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहे.
दुबईच्या शासकांनी आपल्या ट्विटमधून म्हटलंय की, "भारत आपला 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना, मी या महान राष्ट्राच्या नेत्यांचे आणि जनतेचे अभिनंदन करतो. या आनंदाच्या प्रसंगी, संयुक्त अरब अमिराती (UAE) भारतासोबत सामायिक समृद्धी आणि समृद्ध भविष्य निर्माण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करते. ही भागीदारी नवीन उंचीवर नेऊन राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंधांची नवीन क्षितिजे शोधण्यासाठी उघडली जातील. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"
आज जब भारत अपना 77वा स्वतंत्रता दिवस मना रहा है, मैं इस महान राष्ट्र का नेतृत्व करने वालों और इसके लोगों को बधाई देता हूँ। इस खुशी के अवसर पर, संयुक्त अरब अमीरात (UAE) भारत के साथ अपनी साझा समृद्धि और विकासशील भविष्य के निर्माण की प्रतिबद्धता की पुष्टि करता है, अपनी इस साझेदारी…
— HH Sheikh Mohammed (@HHShkMohd) August 15, 2023
पाकिस्तानचाही राष्ट्रध्वज केला होता प्रदर्शित
UAE त्यांच्या मित्र देशांचा राष्ट्रीय ध्वज त्यांच्या प्रजासत्ताक दिनी आणि स्वातंत्र्यदिनी बुर्ज खलिफावर प्रदर्शित करते. सोमवारी (14 ऑगस्ट) उशिरा संध्याकाळी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानचा ध्वज (Pakistan Flag) देखील बुर्ज खलिफावर प्रदर्शित करण्यात आला होता. याचा व्हिडीओ देखील बुर्ज खलिफाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडीओला 82 हजार लाईक्स मिळाले आहेत.
परंतु, पाकिस्तानला त्यांच्या राष्ट्रध्वज 14 ऑगस्टला रात्री 12 च्या ठोक्यावर बुर्ज खलिफावर झळकावा, अशी अपेक्षा होती आणि त्यासाठी दुबईत राहणारे पाकिस्तानी नागरिक त्यावेळी बुर्ज खलिफाबाहेर जमले होते. पण बुर्ज खलिफा संध्याकाळच्या वेळीच मित्र देशाचे स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन साजरा करते. रात्री 12 नंतर पाकिस्तानचा झेंडा बुर्ज खलिफावर न झळकल्याने पाकिस्तानी लोक चांगलेच संतापले होते आणि त्यांनी बुर्ज खलिफाबाहेर भर रात्री ठिय्या मांडला होता, बुर्ज खलिफाचा निषेध नोंदवला होता आणि घोषणाबाजी केली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. मात्र नंतर 14 ऑगस्टच्या संध्याकाळी उशिरा ठरल्याप्रमाणे पाकिस्तानचा झेंडा बुर्ज खलिफावर (Pakistani Flag on Burj Khalifa) प्रदर्शित करण्यात आला आणि त्यानंतर पाकिस्तानी लोकांनी समाधान व्यक्त केलं.
View this post on Instagram
हेही वाचा: