एक्स्प्लोर
लग्नात नवरदेवाला गुटखा खाताना पकडलं, वधूने लग्न मोडलं
![लग्नात नवरदेवाला गुटखा खाताना पकडलं, वधूने लग्न मोडलं Bride Calls Off Marriage As She Founds Groom Chewing Tobacco Latest Update लग्नात नवरदेवाला गुटखा खाताना पकडलं, वधूने लग्न मोडलं](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/01153209/marriage-580x3951.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
प्रातिनिधिक फोटो
लखनऊ : गुटखा खाण्याची सवय उत्तर प्रदेशातील एका तरुणाच्या चांगलीच अंगलट आली आहे. लग्नातील विधी सुरु असताना वधूने नवरदेव गुटखा खात असल्याचं पाहिलं आणि तिने तडक लग्न मोडलं.
उत्तर प्रदेशातील बल्लिया जिल्ह्यातल्या मुरारपट्टी गावात हा प्रकार घडला. मंडपात प्रवेश करतानाच वधूने आपल्या होणाऱ्या पतीला गुटखा खाताना रंगेहाथ पकडलं. त्यानंतर तिने तातडीने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. वधूच्या धाडसी निर्णयामुळे वऱ्हाडीही अवाक झाले.
नवरीला पाहून मूड ऑफ, नवरदेवाने मंडपातच फटकावलं
सुरुवातीला वधूचे मित्रमंडळ आणि नातेवाईकांनी तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणाच्या विनंतीला मान न देता वधू आपल्या निर्णयावर ठाम राहिली. त्यामुळे वरपक्षाने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिस अधिकारी विजय सिंह तरुणीला काही प्रश्न विचारले. त्यावेळी गुटख्याचं व्यसन असलेल्या कुठल्याही व्यक्तीशी लग्न करण्यात तरुणीला रस नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)