K Annamalai : कडाक्याच्या थंडीत भाजप नेता अर्धनग्न, शरीरावर सपासप चाबकाचे फटके मारुन घेतले! तोपर्यंत चप्पल न घालण्याचा निर्धार
तामिळनाडूतील अण्णा विद्यापीठातील विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाच्या प्रकरणाने जोर पकडला आहे. अण्णामलाई यांनी आरोप केला की आरोपी सत्ताधारी पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचा पदाधिकारी आहे.
चेन्नई : तामिळनाडूतील अण्णा विद्यापीठातील विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाच्या प्रकरणाने जोर पकडला आहे. या घटनेने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि अण्णाद्रमुकने गुरुवारी या मुद्द्यावरून निदर्शने केली. भाजपने आरोप केला की आरोपी द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) चे पदाधिकारी आहेत, तर सत्ताधारी पक्ष डीएमकेने हे आरोप फेटाळले आहेत.
जोपर्यंत द्रमुक सरकार सत्तेवर आहे तोपर्यंत चप्पल घालणार नाही
भाजप तामिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्ष डीएमके नेत्यांसोबत आरोपींची छायाचित्रे दाखवत अण्णामलाई यांनी आरोप केला की आरोपी सत्ताधारी पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचा पदाधिकारी आहे. आरोपी पक्षाशी संबंधित असल्याने आणि पोलिसांनी त्यावर कारवाई न केल्याने हा गुन्हा केल्याचा दावा त्यांनी केला. निषेध अधिक प्रभावी करण्यासाठी अण्णामलाई यांनी शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानाबाहेर सहा वेळा फटके मारण्याची घोषणा केली. जोपर्यंत द्रमुक सरकार सत्तेवर आहे तोपर्यंत आपण चप्पल घालणार नाही आणि अनवाणीच राहणार असल्याचेही ते म्हणाले. यानंतर भाजपचे तामिळनाडू अध्यक्ष के. अन्नामलाई यांनी आज कोईम्बतूर येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर स्वत:ला चाबकाने मारून घेत पोलिस आणि राज्य सरकारच्या उदासीनतेचा निषेध केला.
VIDEO | BJP Tamil Nadu president K Annamalai (@annamalai_k) whips himself outside his residence in Coimbatore to condemn the police, and the state government for their 'apathy' in handling the case of sexual assault of a student of Anna University.#TamilNaduNews
— Press Trust of India (@PTI_News) December 27, 2024
(Full video… pic.twitter.com/v3G3DD3nn9
AIADMK नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले
या प्रकरणी आंदोलन करणाऱ्या अण्णाद्रमुकच्या वरिष्ठ नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यपाल तामिळसाई सुंदरराजन यांनीही पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला असून, लैंगिक गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून सरकार आणि पोलिस निष्क्रिय आहेत. त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार असून सरकारने अशा प्रकरणांवर कठोर कारवाई करायला हवी, यावर सुंदरराजन यांनी भर दिला.
तामिळनाडूमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी
हा मुद्दा कायदा आणि सुव्यवस्थेचाच नव्हे तर राजकीयदृष्ट्याही संवेदनशील बनला आहे. भाजपने द्रमुक सरकारच्या विरोधात मोठ्या आंदोलनाचा आधार घेतला आहे. तर द्रमुकने भाजपचे आरोप खोटे ठरवत विरोधक राजकीय फायद्यासाठी हे आरोप करत असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणावरून तामिळनाडूमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या