एक्स्प्लोर

NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन

माहूर तालुक्यातील आसोली येथील प्रथमेश पुरी हा 18 वर्षीय विद्यार्थी नांदेडमध्ये नीट परीक्षेची तयारी करतोय. शहरातील श्रीनगर भागातील एका हॉस्टेल मध्ये तो राहतो

नांदेड - नांदेडमध्ये NEET (NEET) परीक्षेची तयारी करणाऱ्या एका 18 वर्षीय विद्यार्थाला पोलीस कर्मचाऱ्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हॉस्टेलमधील रुममध्ये नेऊन तोंडात रुमालाचा बोळा कोंबून काठीने मारहाण करण्यात आली. नांदेड शहरातील श्रीनगर भागातील एका हॉस्टेलमधील ही घटना आहे. याप्रकरणी, एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर आता संबंधित पोलीस शिपायाचं निलंबन करण्यात आलं आहे. पोलिसांनी (Police) मारहाण केल्याच्या घटनेचा व्हिडिओ समोर येताच या घटनेची दखल घेत भाग्यनगरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस कर्मचारी आकाश सावंतसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याशिवाय पोलीस कर्मचारी आकाश सावंत त्याला सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे.  

माहूर तालुक्यातील आसोली येथील प्रथमेश पुरी हा 18 वर्षीय विद्यार्थी नांदेडमध्ये नीट परीक्षेची तयारी करतोय. शहरातील श्रीनगर भागातील एका हॉस्टेल मध्ये तो राहतो. 5 जानेवारी रोजी पोलीस कर्मचारी आकाश सावंत तिथे आला, त्याच्या सोबत क्षितिज कांबळे आणि श्रावण हे अन्य दोन तरुण आले. मोटारसायकल आणि सोन्याची चेन चोरी केली का? असं विचारून तिघांनी प्रथमेशला बाहेर नेले. त्यानंतर, अशोक नगर, गोकुळनगर, आसना नदी परिसरात नेऊन त्याला बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी पुन्हा पोलीस कर्मचारी आकाश सावंत हॉस्टेलवर आला, पुन्हा प्रथमेशच्या तोंडात रुमालाचा बोळा कोंबून त्याला काठीने जबर मारहाण केली. घाबरलेल्या मुलाने काही दिवस हा घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र, त्याच्या वडिलांना हा प्रकार कळाल्यानंतर त्यांनी थेट भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यावरून पोलिसांनी आरोपी पोलिसांवर गुन्हा दाखल केला.

पोलीस कर्मचारी सावंतसह त्याचा मित्र क्षितिज कांबळे यांनी काठी घेऊन प्रथमेशला मारहाण केली, त्या मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. याशिवाय दुसऱ्या व्हिडिओत पोलीस कर्मचारी आकाश सावंत हा वर्दीवर आहे. त्यामध्ये, मीच मारहाण केली असं तो बोलताना दिसून येतो. त्यामुळे, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, अशा पद्धतीने काही युवक विद्यार्थ्यांना दमदाटी करून पैसे वसुली करतात का, किंवा खंडणी घेतात का? या दृष्टीने देखील तपास सुरू असून अशा तक्रारी असल्यास पोलिसांना कळविण्याचं आवाहन पोलीस अधीक्षकांनी केलं आहे. दरम्यान, खासगी कोचिंग क्लासेस, आणि हॉटेल चालकांची बैठक घेऊन याबाबत त्यांची विचार न करण्यात आली. या भागात तक्रार पेढी देखील लावण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले. 

हेही वाचा

पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
SIR Mumbai Crime: घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
TET Exam Paper Leak: 8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर
8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर
पुण्यात दरोडा टाकण्याची तयारी, आंतरराज्यीय दरोडेखोरांचे टोळीला बेड्या; अहिल्यानगरमधून बोलेरो चोरुन ओतुरला आले
पुण्यात दरोडा टाकण्याची तयारी, आंतरराज्यीय दरोडेखोरांचे टोळीला बेड्या; अहिल्यानगरमधून बोलेरो चोरुन ओतुरला आले

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SIR Mumbai Crime: घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
TET Exam Paper Leak: 8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर
8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर
Pune ATS Raid: पाकिस्तानी गँगस्टर भट्टीच्या संपर्कातील संशयितांवर ATSची कारवाई; पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात धाडसत्र, 45 जणांना उचललं
पाकिस्तानी गँगस्टर भट्टीच्या संपर्कातील संशयितांवर ATSची कारवाई; पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात धाडसत्र, 45 जणांना उचललं
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पुण्यात दरोडा टाकण्याची तयारी, आंतरराज्यीय दरोडेखोरांचे टोळीला बेड्या; अहिल्यानगरमधून बोलेरो चोरुन ओतुरला आले
पुण्यात दरोडा टाकण्याची तयारी, आंतरराज्यीय दरोडेखोरांचे टोळीला बेड्या; अहिल्यानगरमधून बोलेरो चोरुन ओतुरला आले
NCP Pune Mahangarpalika: मोठी बातमी: पुणे महानगरपालिकेत अजितदादांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार? उपमहापौरपदाची मागणी, संजय काकडे सुनेत्रा पवारांना भेटणार
पुणे महानगरपालिकेत अजितदादांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार? उपमहापौरपदाची मागणी, संजय काकडे सुनेत्रा पवारांना भेटणार
Pune Water Cut: वारीनंतर पुन्हा पाणीकपात; १५ जुलैपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा, भविष्यात पाण्याची टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय
वारीनंतर पुन्हा पाणीकपात; १५ जुलैपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा, भविष्यात पाण्याची टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय
Embed widget