एक्स्प्लोर

मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव

पंतप्रधान मोदी आज पालक स्वरुपात होते, नरेंद्र मोदींच्या आजच्या भेटीनं महायुती अधिक मजबुत झालीय. पंतप्रधान मोदींचं बोलणं ऐकुन आज मंत्रमुग्ध झालो, असे चित्रा वाघ यांनी म्हटलं.

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी महायुतीच्या आमदारांशी बैठकीत संवाद साधला. मोदींच्याहस्ते आज ‘आयएनएस सूरत’, ‘आयएनएस निलगिरी’ या युद्धनौकांचे आणि ‘आयएनएस वाघशीर’ या पाणबुडीचे जलावतरण करण्यात आले. त्यानंतर नेवीच्या आंग्रे सभागृहात पंतप्रधानांनी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधत अनुभवाधारीत मार्गदर्शन केलं. यावेळी, कुटुंबासह मतदारसंघात काळजी घेण्याचं आणि जनतेमध्ये मिसळून काम करण्याचा सल्ला मोदींनी दिला. मोदींच्या मार्गदर्शनानंतर काही आमदारांनी आपला अनुभव सांगताना, बहुमोल मार्गदर्शन लाभल्याचे म्हटले. भाजप आमदार चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी मंत्रमुग्ध झाल्याची प्रतिक्रिया दिली. तर, आजचा दिवस अविस्मिरणीय राहिल्याचे आमदार रमेश बोरनारे आणि संजय शिरसाट यांनी म्हटलं. 

पंतप्रधान मोदी आज पालक स्वरुपात होते, नरेंद्र मोदींच्या आजच्या भेटीनं महायुती अधिक मजबुत झालीय. पंतप्रधान मोदींचं बोलणं ऐकुन आज मंत्रमुग्ध झालो, असे चित्रा वाघ यांनी म्हटलं. मोदी बोलत राहावेत आणि आम्ही ऐकत रहावं असं वाटत होतं,  जनसेवेचा वसा घेऊन जनसंपर्क वाढवा हा सल्ला त्यांनी पुढे जातांना घराकडेही लक्ष द्या अशा सूचनाही केल्या. दिनचर्या कशी असावी, आरोग्य कसं राहावं, याबाबत पंतप्रधानांनी मार्गदर्शन केलं.  पीएमओ जनतेपर्यंत पोहोचवण्यासंदर्भातही त्यांनी मार्गदर्शन केल्याचं चित्रा वाघ यांनी मोदींच्या भेटीनंतर सांगितलं. 

आम्ही प्रचंड ऊर्जा घेऊन निघालो - शिरसाट

तर, आजचा दिवस अविस्मिरणीय राहिला, आज मोदींना जवळून पाहता आणि ऐकता आलं. मोदींनी आज जे सांगितले ते खूप महत्वाचं होतं.  आज आम्ही धन्य झालो, जनसेवेसोबत सकाळपासून ते रात्रीपर्यत कसं काम करावं, आरोग्यासोबत कुटुंबियांची कशी काळजी घ्यावी हेही मोदींनी सांगितल्याचं आमदार रमेश बोरनारे यांनी म्हटलं. तर, मोदींनी आम्हाला आमची दिनचर्या विचारली. त्यात कुटुंबाला कधी वेळ देतात ते विचारले,  योग, आरोग्याचे महत्व सांगितले. आजचा अनुभव अविस्मरणीय होता, महायुती भक्कम आहे. जनसंपर्क कसा वाढवावा हे मोदींनी सांगितले, मोदींनी स्वत: कश्या पद्धतीनं संघर्ष केला हेही सांगितले. त्यामुळे, आज प्रचंड ऊर्जा घेऊन आम्ही निघालो आहोत, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी मोदींच्या भेटीनंतर दिली. 

विधानपरिषद आमदारांनी मतदारसंघ दत्तक घ्यावा

राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करताना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या, त्यासाठी दरवर्षी स्वतःचं मेडिकल चेकअप करून घ्या. कुटुंबाला वेळ द्या, घरातील पत्नी, मुलगी, आईकडे विशेष लक्ष द्या, कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊन देऊ नका, असा सल्ला मोदींनी दिल्याचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं. तर, योगा किंवा तत्सम व्यायाम करा, मी स्वतः पहाटे उठून दररोज योगा करतो. मतदारसंघात ज्यांनी तुम्हाला मतदान केले नाही, त्यांच्यासाठी काम करुन त्यांच्यासोबत विरोधकांनाही आपलं करुन घेण्याचा प्रयत्न करा. विधानपरिषदेच्या आमदारांनी एखादा मतदारसंघ दत्तक घेत चांगले काम करावे. अधिकाऱ्यांसोबत कामानिमित्त बोलताना नम्रपणे बोला व काम करून घ्या. बदली, दलालीसारख्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा, अधिकाधिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करा, असा सल्ला मोदींनी आमदारांना दिला. 

हेही वाचा

NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर

Embed widget