Budhadiya Rajyog 2025 : होळीच्या दुसर्या दिवसापासून जुळून येणार महाशक्तीशाली बुधादित्य राजयोग; 'या' 3 राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु
Budhadiya Rajyog 2025 : होळीच्या नंतरच म्हणजे अगदी दुसऱ्याच दिवशी 15 मार्चपासून सूर्याचा मीन राशीत प्रवेश होणार आहे. या दरम्यान सूर्याची बुध ग्रहाबरोबर युती होणार आहे.

Budhadiya Rajyog 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहांची स्थिती ठराविक वेळेनुसार बदलते. ग्रहांच्या राशी परिवर्तनाने अनेक शुभ योग (Yog) निर्माण होतात. याचाच मानवी जीवनावर परिणाम होतो. आज होळीचा शुभ दिवस आहे. मात्र, होळीच्या नंतरच म्हणजे अगदी दुसऱ्याच दिवशी 15 मार्चपासून सूर्याचा मीन राशीत प्रवेश होणार आहे.
या दरम्यान सूर्याची बुध ग्रहाबरोबर युती होणार आहे. यामुळे एक वर्षासाठी बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. या राजयोगामुळे काही लकी राशींचं भाग्य उजळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
बुधादित्य राजयोगाने कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील. या राशीच्या दुसऱ्या चरणात हा राजयोग जुळून येणार आहे. या काळात तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ पाहायला मिळेल. तसेच, आर्थिक समस्या तुम्हाला भेडसावणार नाहीत. तुमचा बॅंक बॅलेन्स वाढेल. तसेच, उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. या काळात तुमच्या मुलांचं अभ्यासावर लक्ष राहील. मन विचलित होणार नाही. तसेच, नवीन कलांचा देखील ते वापर करतील.
वृषभ रास (Taurus Horoscope)
बुधादित्य राजयोग वृषभ राशीच्या लोकांसाठी फार शुभकारक ठरणार आहे. या राशीच्या अकराव्या चरणात हा योग जुळून येणार आहे. या राशीच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. तसेच, या काळात तुम्हाला लग्नाशी संबंधित एखादी शुभवार्ता मिळेल. तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती झालेली दिसेल. तरुणांना चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. आरोग्य देखील उत्तम राहील. मित्रांच्या सहयोगाने तुम्ही अनेक गोष्टी मिळवू शकाल. त्यामुळे अनेक समस्या सुटतील.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग फार शुभकारक ठरणार आहे. या राशीच्या दहाव्या स्थानात हा योग जुळून येणार आहे. या काळात तुम्हाला करिअरमध्ये चांगलं यश पाहायला मिळेल. तुम्हाला अनपेक्षित फळ मिळेल. तसेच, तणावापासून तुमची मुक्ती होईल. या काळात तुम्हाला चांगली नोकरी देखील लागेल. तसेच, व्यापारी वर्गातील लोकांसाठी अनेक नवीन ऑर्डर्स मिळतील. व्यवसायात चांगली वाढ होईल. हा काळ तुमच्यासाठी फार आनंददायी ठरणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















