Vasant Panchami 2021 : आज वसंत पंचमीचा सण; उपासनेची शुभ वेळ कधी आणि पूजा कशी करावी?
मुलांसाठी शिक्षण सुरू करण्यासाठी किंवा कोणतीही नवीन कला सुरू करण्यासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो. या दिवशी भक्त पिवळे किंवा पांढरे कपडे घालतात आणि विद्या देवीची पूजा करतात.
Vasant Panchami 2021 : उत्तर भारतातील अनेक राज्यात आज वसंत पंचमीचा सण साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी वसंत ऋतूची सुरुवात होते. या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते. लोक पिवळे कपडे घालून आई सरस्वतीची पूजा करतात. काही लोक वसंत पंचमीला श्री पंचमी म्हणूनही संबोधतात. या दिवशी लोक विशेषतः शिक्षणाची देवी सरस्वतीची पूजा करतात. मुलांसाठी शिक्षण सुरू करण्यासाठी किंवा कोणतीही नवीन कला सुरू करण्यासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो. या दिवशी भक्त पिवळे किंवा पांढरे कपडे घालतात आणि विद्या देवीची पूजा करतात.
पूजा कशी करावी
आंघोळ केल्यावर भाविकांनी पूर्वेकडे किंवा उत्तर दिशेने बसावे. तुमच्या समोर पिवळ्या रंगाचे कापड पांघरावे आणि त्यावर माता सरस्वतीची मूर्ती स्थापित करावी. त्यानंतर केशर, हळद, तांदूळ, पिवळ्या रंगाची फुले, पिवळ्य़ा रंगाची मिठाई, साखर, दही, हलवा इत्यादींचा नैवेद्य देवीसमोर ठेवून ध्यान करावे. माता सरस्वतीच्या पायावर श्वेत चंदन लावावे. उजव्या हाताने सरस्वतीच्या पायावर पिवळे आणि पांढरे फुले अर्पण करा आणि 'ओम सरस्वत्यै नमः' जप करा. शिक्षणामध्ये अडथळा निर्माण झाल्यास या दिवशी विशेष पूजा केल्यास त्यापासून मुक्ती मिळू शकते.
काही विशेष योगायोग
यावेळी वसंत पंचमीच्या दिवशी रवि योग आणि अमृतसिद्धी योगाचे विशेष संयोजन होत आहे. दिवसभर रवी योगाच्या उपस्थितीमुळे त्याचे महत्त्व आणखी वाढले आहे. पूजा करण्याचा शुभ मुहूर्त पहाटे 6:59 ते दुपारी 12.35 पर्यंत आहे. या मुहूर्तामध्ये उपासना केल्यास अधिक फायदा होईल.