एक्स्प्लोर
नर्सला पाहून आसाराम बापू म्हणतो, तुम तो खुद मक्खन जैसी हो!

नवी दिल्ली : अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली जेलमध्ये असलेला आसाराम बापू आता पुन्हा एकदा वादात अडकला आहे. आसाराम बापूला मेडिकल चेकअपसाठी जोधपूरहून दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात आणले होते. यावेळी आसारामने एम्समधील एका नर्सच्या गालांची तुलना काश्मीरच्या सफरचंदांशी केली आणि आणखी एक वाद ओढवून घेतला.
मेडिकल चेकअपआधी आसारामला ब्रेकफास्ट करण्यास डॉक्टरांनी सांगितलं. एम्समधील नर्स आसारामसाठी ब्रेड आणि बटर घेऊन आली. नर्सच्या हातात ब्रेड-बटर पाहून आसाराम म्हणाला, "तू लोण्यासारखी असताना, ब्रेडला बटर लावण्याची गरज काय? तू नक्कीच काश्मिरी असशील. तुझे गाल सफरचंदासारखे आहेत." आसारामचं हे उत्तर ऐकून नर्सच्या रागाचा पारा चढला.
त्यानंतर आसाराम डॉक्टरांना म्हणाला, मी आता 80 वर्षांचा आहे. म्हातारपण आलंय. डॉक्टर साहेब, माझ्यवर उपचार करुन पुन्हा तरुण बनवा. आसारामसोबत आलेल्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आसाराम वारंवार व्हिडीओग्राफी करण्यापासून रोखत होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
