(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aditya-L1 Mission: आतापर्यंत सूर्यावर गेल्या आहेत 22 मोहिमा; तरीही भारताची आदित्य L1 मोहीम का आहे खास? जाणून घ्या
Aditya-L1 Solar Mission: इस्रो आज श्रीहरिकोटा येथून आदित्य L1 लाँच करणार आहे. भारताच्या या मोहिमेआधी इतर देशांच्या 22 मोहिमा झाल्या आहेत.
Aditya L-1: अंतराळातील भारताची ताकद आणखी मजबूत होणार आहे. चांद्रयान-3 च्या यशानंतर इस्रोची सूर्य मोहीम (Sun Mission) सूर्याच्या जवळ जाण्यासाठी सज्ज झाले आहे. ही मोहीम सूर्याजवळ पोहोचून सूर्यप्रकाशावर संशोधन करणार आहे. आदित्य L1 (Aditya L-1) या मोहिमेच्या यशानंतर सूर्यावर आपली मोहीम पाठवणाऱ्या देशांच्या यादीत भारताचं नावही सामील होणार आहे. वास्तविक, आतापर्यंत 22 मोहिमा सूर्यावर गेल्या असून भारताची संख्या 23 वी असणार आहे.
भारताचा नंबर भलेही 23 वा असला तरी बर्याच बाबतीत आदित्य L1 ही प्रगत मोहीम आहे आणि इतर देशांच्या मोहिमांपेक्षा भारताची मोहीम खूप वेगळी आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताचं आदित्य L1 हे मिशन कसं वेगळं आहे आणि त्यात काय विशेष असणार आहे? असा प्रश्न उपस्थित होतो.
आदित्य L-1 ची सुरुवात कशी होणार?
आदित्य L-1 ही सूर्य मोहीम 2 सप्टेंबरला लॉन्च होणार आणि ही सूर्य मोहीम पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर अंतर कापणार आहे. हे यान सूर्याजवळ जाऊन सूर्यापासून निघणाऱ्या किरणांचा अभ्यास करेल आणि सूर्याशी संबंधित अनेक न उलगडलेल्या रहस्यांची उकल करेल. या मिशननंतर सूर्य मोहिमा करणाऱ्या देशांमध्ये भारताचं नाव समाविष्ट होईल. आतापर्यंत, अमेरिकन स्पेस एजन्सी NASA, जर्मन स्पेस एजन्सी DLR, युरोपियन एजन्सी ESA यांच्या नावांचा यशस्वी सूर्य मोहिमांच्या यादीत समावेश आहे. यामध्ये एकट्या नासाने 14 सूर्य मोहिमा लाँच केल्या केल्या आहेत.
आदित्य L-1 का आहे खास?
आदित्य L-1 मोहीम ही भारतासाठी खास आहे कारण ती पूर्णपणे भारतात तयार केली गेली आहे, त्यात 7 पेलर्स देखील बसवले आहेत, त्यापैकी 6 हे पूर्णपणे भारतातच बनवलेले आहेत. यासह भारताने प्रथमच एक अंतराळयान बनवलं आहे, जे सूर्याकडे जाणार आहे. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये अशी एक जागा आहे, जिथे दोघांच्या ऊर्जेचा परिणाम दिसतो आणि सूर्य स्वत:कडे त्या कक्षेत आलेल्या गोष्टी खेचतो. या जागेवर जास्त काळ राहणं फार कठीण आहे.
आदित्य L-1 मध्ये विशेष यंत्रणा तयार करण्यात आली आहे, जेणेकरुन कोणत्याही परिस्थितीत यान सूर्याच्या कक्षात टिकू शकेल. आदित्य L-1 ची रचना खास प्रकारे करण्यात आली आहे, ते सूर्याच्या फार जवळ जाणार नाही, पण लॅग्रेंज बिंदूवर राहील आणि सूर्यावर संशोधन करेल. आदित्य L-1 ही एक प्रकारे स्पेस टेलिस्कोप आहे, जी स्पेसमध्ये खास पद्धतीने काम करेल.
हेही वाचा:
NASA: आदित्य L1 च्या आधी सूर्याजवळ पोहोचलं आहे नासाचं 'हे' यान; सूर्याबाबत केलं विशेष संशोधन