Gold Investment: सोन्याच्या गुंतवणुकीसाठी कोणते आहेत उत्तम पर्याय?, कसा आहे डिजिटल गुंतवणुकीचा पर्याय
Gold Investment: गुंतवणुकीचे सध्या अनेक पर्याय उपलब्ध आहेत ज्यामधून अनेक फायदे देखील मिळतात. असाच पर्याय सोन्याच्या गुंतवणूकीमध्ये देखील आहे. ज्यामधून तुम्हाला फायदा मिळण्याची शक्यता असते.
Gold Investment: भविष्यासाठी गुंतवणुकीचा (Investment) पर्याय हल्ली सगळेचजण निवडतात. त्यातीलच एक म्हणजे सोन्याची गुंतवणूक. सोने गुंतवणुकीदारांसाठी सध्या उपलब्ध असलेला एक उत्तम पर्याय म्हणजे गोल्ड ईटीएफ. हा एक एक्स्चेंज ट्रेडेड फंड आहे. यामुळे तुम्हाला देशांतर्गत प्रत्यक्ष किंमती जाणून घेण्यास मदत होते. ज्या गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्याची इच्छा आहे, पण ती गुंतवणूक साठवून ठेवण्याचा त्रास होऊ द्यायचा नाही अशांसाठी गोल्ड ईटीएफ हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो. यामुळे तुम्हाला डिजिटल स्वरुपात सोन्यातील गुंतवणुकीचे अनेक लाभ मिळण्यास मदत होऊ शकते.
तसेच या गुंतवणुकीमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा हफ्ता भरण्याची गरज नसते, त्यामुळे गुंतवणूकदारांना या गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. त्याचप्रमाणे तुम्ही अगदी 1 ग्रॅम सोन्याची ईटीएफ खरेदी करुन देखील गुंतवणूक करु शकता. त्यांनंतर तुम्ही तुमच्या गरजेनुसार ईटीएफमध्ये अधिक गुंतवणूक करु शकता. इटीएफचे मुख्य काम हे गुंतवणूकीदारांना सोन्याचे योग्य दर सांगणे हेच आहे, असं तज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याच्या इतर मार्गांच्या तुलनेत ईटीएफचा मार्ग हा नेहमीच फायदेशीर असल्याचं देखील म्हटलं जातं. त्यामुळे गुंतवणूकदार या गुंतवणूकीबाबत निश्चिंत राहू शकतात असं देखील म्हटलं जातं. योग्य गोल्ड ईटीएफ निवडताना गोल्ड ईटीएफमधील खर्चाचे प्रमाण किती आहे हे बघावे, कारण हे प्रमाण जेवढे कमी असेल तेवढे गुंतवणूक ठरण्याची शक्यता असते.
गोल्ड ईटीएफमधून मिळणारा मोबदला हा लघुकालीन किंवा दीर्घकालीन लाभाच्या स्वरुपात असतो. दीर्घकालीन लाभावर 20 टक्के दराने कर आकारला जातो तर गुंतवणूकदाराच्या उत्पन्नात जमा होणाऱ्या लघुकालीन लाभांवर कररचनेनुसार कर आकारला जातो.तुमच्या मालमत्तेच्या किंमतीनुसार,ट्रेडिंगच्या उपक्रमांची किंमत ठरवली जाते. त्यामुळे तुम्हाला ट्रेडिंगच्या आकारमानानुसार ईटीएफ निवडण्याची गरज असते.हे ट्रेडिंग करताना काही जणांना फारशा चढउतारांचा सामना करावा लागत नाही, तर काही जणांना दर तासाला किंमतीतील चढ किंवा उतारांचा सामना काही वेळेस करावा लागतो.
तसेच ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याची नियमावली वाचण्याचा सल्ला देखील गुंतवणूकदारांना देण्यात येतो. काही वेळेस गुंतवणूकीमध्ये अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते त्यामुळे तुमच्या व्यवहारातले शुल्क देखील वाढू शकते. ज्यांना डिजीटल माध्यमातून गुंतवणूक करायची असते त्यांच्यासाठी ईटीएफ गुंतवणूकीचा पर्याय उत्तम ठरु शकतो.