(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हिंगोली पोलिसांची सोशल मीडियावर पेट्रोलिंग; आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या 148 जणांना नोटीसा, तर चौघांना बेड्या
Hingoli Crime News: आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या आतापर्यंत 148 जणांना नोटीसा देण्यात आल्या असून, चार जणांना जेलची हवा खावी लागली आहे.
Hingoli Crime News: छत्रपती संभाजीनगर शहरात झालेल्या दोन गटातील वादानंतर मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील पोलीस सद्या अलर्ट झाले आहे. विशेष म्हणजे, सोशल मिडीयावर आक्षेपार्ह किंवा दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान हिंगोली (Hingoli) पोलिसांकडून देखील सोशल मीडियावर पेट्रोलिंग करण्यात येत आहे. सायबर सेलचे पथक 24 तास सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे. तर आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या आतापर्यंत 148 जणांना नोटीसा देण्यात आल्या असून, चार जणांना जेलची हवा खावी लागली आहे.
गेल्या काही दिवसांत सोशल मीडियाचे प्रमाण वाढले असून, व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामचा वापर अधिक वाढला आहे. मात्र असे असताना काही लोकांकडून सोशल मीडियावर आक्षेपार्ह किंवा दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकण्यात येत आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर हिंगोलीचे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशाने हिंगोली सायबर पोलिसांकडून सोशल मीडियावर 24 तास पेट्रोलिंग करण्यात येत आहे. ज्यात भडक, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या, शांतता भंग करणाऱ्या पोस्टवर लक्ष ठेवण्यात येत आहे. तर आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ फॉरवर्ड करणे, शेअर करणे, लाईक करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येत आहे. तर हिंगोली पोलिसांकडून आतापर्यंत अशा 148 जणांना नोटीसा देण्यात आल्या असून, चार जणांना जेलची हवा खावी लागली आहे. तसेच यापुढे देखील अशाच कारवाया सुरूच राहणार आहे.
अन्यथा तीन वर्षांची जेल...
सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान किंवा फोटो व्हिडिओ टाकणे कायदेशीर गुन्हा आहे. तर सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावतील अशा पोस्ट शेअर केल्यास अथवा लाईक, फॉरवर्ड केल्याचे सिद्ध झाल्यास तीन वर्षापर्यंत शिक्षा व पाच लाखांपर्यंत दंड होऊ शकतो. त्यामुळे सोशल मीडियाच वापर करताना काळजी घेणं गरजेचं आहे.
सायबर पोलीस लक्ष ठेवून....
सोशल मीडियावर अनेकदा काही लोकं दोन समाजात तेढ निर्माण करणारे पोस्ट टाकतात. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आता सायबर पोलीस सोशल मीडियावर पेट्रोलिंग करत लक्ष ठेवून आहे. आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या लोकांची तत्काळ माहिती काढून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. यासाठी सायबर पोलिसांची विशेष पथक नियुक्त करण्यात आले असून, हे पथक 24 तास सोशल मीडियावर लक्ष ठेवून असतात.
इतर महत्वाच्या बातम्या :
Crime : जेवण न देणाऱ्या सासूचा जावयाने घेतला जीव; शेळ्या बांधायचा खुंटा उपटून घातला डोक्यात