2023 सालचा 233 कोटींचा पिक विमा अद्यापही शेतकऱ्यांना मिळाला नाही, रविकांत तुपकर आक्रमक, जिल्हा कृषी कार्यालयातच ठिय्या आंदोलन
Ravikant Tupkar : बुलढाणा जिल्ह्यातील 1 लाख 26 हजार शेतकऱ्यांना सन 2023 चा पिक विमा अद्यापही मिळालेला नाही. या पीक विम्याची रक्कम 233 कोटी रुपये आहे.
Ravikant Tupkar : बुलढाणा जिल्ह्यातील 1 लाख 26 हजार शेतकऱ्यांना सन 2023 चा पिक विमा अद्यापही मिळालेला नाही. या पीक विम्याची रक्कम 233 कोटी रुपये आहे. अद्यापही सरकारने पिक विमा कंपनीला दिली नसल्याने दोन वर्षांपूर्वीचा विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. या विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा अन्यथा आठवडाभरानंतर उग्र आंदोलन करु असा इशारा आज शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. आज शेकडो शेतकऱ्यांसह जिल्हा कृषी कार्यालयात तीन तास ठिय्या आंदोलन केलं.
पिक विम्याच्या मुद्यावरुन शेतकरी नेते आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांचे 2023 सालचे पिकविम्याचे 233 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही. ही रक्कम लवकरात लवकर मिळावी अशी मागणी तुपकरांनी केली आहे. या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी आज जिल्हा कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले आहे.
शेतकर्यांच्या मनात या पीकविमा कंपन्यांविरोधात प्रचंड संतापाची लाट
अनेक गावांत शेतकऱ्यांना अवघे 100, 200, 500 रूपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांना अद्यापही काही मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकर्यांच्या मनात या पीकविमा कंपन्यांविरोधात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. परिणामी, प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आता पीडित शेतकर्यांकडून जोर धरू लागली आहे. पिक विमा न मिळाल्यामुळं शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटना देखील आक्रम होताना दिसत आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर हे या मुद्यावर आक्रमक होताना दिसत आहे. वेळोवेली त्यांनी ही मागणी लावून धरल्याचं पाहायला मिळालं होते. आता पुन्हा एकदा त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच सरकारला इशारा देखील दिला आहे.
नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. तसेच पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. नाविन्यपूर्ण आणि सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान आणि सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे. कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे, ज्यामुळे उत्पादनातील जोखमींपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास आणि स्पर्धात्मकतेत वाढीचा हेतू साध्य होण्यास मदत होईल, ही या योजनेची उद्दिष्ट्ये आहेत.
महत्वाच्या बातम्या: