एक्स्प्लोर

Cranberry Juice For Weight Loss : तुम्हाला वजन कमी करायचं आहे? मग Cranberry Juice प्यायल्यामुळे होऊ शकतो फायदा

वजन कमी करणं (Weight Loss) वाटतं तितकं सोप नाही. हे वाढलेलं वजन कमी करण्याच्या रेसमध्ये आपल्या आजूबाजूला असंख्य लोक आहेत. वजन कमी करण्यासाठी चांगल्या चांगल्या लोकांना घाम फुटतो.

Cranberry Juice For Weight Loss : खरे तर आपलं वाढलेलं वजन कमी करण इतकं सोपं नाही. यासाठी अनेक पथ्य पाळावी लागतात आणि नियमितपणे वर्कआऊट करावं लागतं. तसेच आपल्या खाण्यावरही नियंत्रण हवं. हल्ली अनेकांच्या जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे आणि बैठे कामामुळे लठ्ठपणा आणि वजन वाढत आहे. परंतु वजन कमी करणं (Weight Loss) वाटतं तितकं सोप नाही. हे वाढलेलं वजन कमी करण्याच्या रेसमध्ये आपल्या आजूबाजूला असंख्य लोक आहेत. वजन कमी करताना चांगल्या-चांगल्या लोकांना घाम फुटतो. या प्रवासात मनासारखा रिझल्ट मिळेलच, याची काही खात्री नसते. कुणाला सडपातळ शरीरयष्टी हवीय, तर कुणाला फक्त पोटाची चरबी कमी करायची आहे. अनेक लोक तर त्यांच्या समोर आवडीची डिश येऊनही ती खाणं टाळतात आणि जिममध्ये अनेक तास वर्कआऊट करून घाम गाळताना दिसून येतात. पण तुमचं वजन कमी करण्यासाठी सोपी ट्रिक कळली तर तुमचा हा प्रवास आणखीन सोपा होऊ होऊ शकतो. यासाठी तुमच्या नियमित आहारात क्रॅनबेरी ज्यूसचा (Cranberry Juice) समावेश करू शकता. यामुळे तुमचा वजन कमी करण्यासाठी कसा फायदा होऊ शकतो. हे सविस्तरपणे जाणून घेऊया...

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे क्रॅनबेरी ज्यूस

क्रॅनबेरी ज्यूसपासून भरपूर फायबर मिळतात. फायबरचं सेवन केल्यामुळे तुमचं पोट भरल्यासारखं वाटू शकतं आणि लवकर भूक लागत नाही. तुम्हाला अतिरिक्त जेवण, जंक फूड किंवा फूड क्रेविंगसारख्या वाईट सवयीपासून दूर राहावं लागेल. यामुळे तुमच्या शरीरातील चरबी आणि वजन कमी करण्यासाठी मदत मिळू शकते. क्रॅनबेरी ज्यूसमध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. यामुळे शरीरातील बायो अॅक्टिव्ह कंपाऊंसारखं कार्य करतं आणि  तुमच्या शरीरातून विषारी घटक बाहेर टाकले जातात. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

क्रॅनबेरी ज्यूसपासून  मिळणारे पोषक तत्व

युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चर यांच्या म्हणण्यानुसार,  क्रॅनबेरीच्या फळांमध्ये 87 टक्के पाणी आढळून येतं. एक 100 ग्रॅम कॅनबेरीपासून 46 ग्रॅम कॅलरीज, प्रोटीन 0.2 ग्रॅम, फॅट 0.1 ग्रॅम आणि फायबर 4.6 ग्रॅम आणि विटामिन सी, विटामिन के-1  यासारखे पोषण तत्व मिळतात. या सर्व पोषण तत्वांमुळे क्रॅनबेरी ज्यूसपासून अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. तुमच्या नियमित आहारात क्रॅनबेरी ज्यूसचा समावेश केला तर वजन कमी करण्यासोबत इतर अनेक फायदे मिळू शकतात.

घरी तयार करा क्रॅनबेरी ज्यूस 

तुम्हाला क्रॅनबेरी ज्यूस कोणत्याही ज्यूस सेंटरवर मिळू शकतं. पण आरोग्याच्या दृष्टीनं बाहेरील ज्यूस पिणे चांगलं नसतं. कारण ज्यूस जास्त काळ टिकावं, त्यामध्ये रसायनाचा वापर केला जातो. त्यामुळे शक्य असेल तर तुमच्या घरीचं क्रॅनबेरी ज्यूस तयार करा. हे ज्यूस बनवण्यासाठी 200 ते 300 ग्रॅम क्रॅनबेरी फळं आणि एक ते दोन आवळे घ्या. तसेच चवीनुसार मीठ आणि एक छोटा चमचा जीरा पावडरचा वापर करा. पण हे ज्यूस तयार करताना क्रॅनबेरी आणि आवळ्यातील बिया बाजूला काढा. यानंतर एका मिक्सरमध्ये पिसून घ्या आणि यामध्ये गरजेनुसार पाण्याचा वापर करा. ज्यूस तयार केल्यानंतर ते एक चाळणीतून गाळून घ्या. यामध्ये चवीनुसार मीठ आणि जीरा पावडर टाका. यानंतर एखाद्या ग्लासमध्ये क्रॅनबेरी ज्यूससोबत बर्फाचा गोळा टाकून थंड ज्यूस पिण्याचा आनंद घ्या. यामुळे अनेक फायदे मिळू शकतात.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election 2026: मोठी बातमी: शिंदे गटाचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, मुंबईच्या राजकारणात उलथापालथ होणार?
मोठी बातमी: शिंदे गटाचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, मुंबईच्या राजकारणात उलथापालथ होणार?
Virat Kohli : कोहली असता तर त्याच्या बापानेही एक रन काढून....स्टीव्ह स्मिथने बाबर आझमची अब्रू वेशीवर टांगली, पाकिस्तानी खेळाडू संतापला
कोहली असता तर त्याच्या बापानेही एक रन काढून....स्टीव्ह स्मिथने बाबर आझमची अब्रू वेशीवर टांगली, पाकिस्तानी खेळाडू संतापला
पाच टर्म नगरसेवक, माजी महापौराला अस्मान दाखवत थेट एकनाथ शिंदेंच्या दारात धगधगती मशाल पेटवणारा ठाकरेंचा मावळा मातोश्रीवर पोहोचला; उद्धव ठाकरे काय म्हणाले?
पाच टर्म नगरसेवक, माजी महापौराला अस्मान दाखवत थेट एकनाथ शिंदेंच्या दारात धगधगती मशाल पेटवणारा ठाकरेंचा मावळा मातोश्रीवर पोहोचला; उद्धव ठाकरे काय म्हणाले?
मोठी बातमी! शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरींना अटक; तब्येत बिघडल्याने रुग्णालयात हलवलं
मोठी बातमी! शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरींना अटक; तब्येत बिघडल्याने रुग्णालयात हलवलं

व्हिडीओ

Sanjay Raut On Mumbai Mayor : नगरसेवकांना लपवावं लागत असेल तर कायदा-व्यवस्था ढासललीय, एकनाथ शिंदेंना टोला
Girish Mahajan Majha Katta : सुधाकर बडगुजर प्रकरण ते नाशिकचं तपोवन, गिरीश महाजन 'माझा कट्टा'वर
PMC Election : पुण्याची 22 वर्षीय सई थोपटे सर्वात तरुण नगरसेवक Exclusive
BMC 22 years Corporator : BMC वॉर्ड नं 151 मधून 22 वर्षांची तरुणी झाली नगरसेवक! कसा होता प्रवास?
Uttar Pradesh Bijnor च्या मंदिरात कुत्र्याची अखंड प्रदक्षिणा,भटका श्वान की दैवी संकेत?Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election 2026: मोठी बातमी: शिंदे गटाचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, मुंबईच्या राजकारणात उलथापालथ होणार?
मोठी बातमी: शिंदे गटाचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, मुंबईच्या राजकारणात उलथापालथ होणार?
Virat Kohli : कोहली असता तर त्याच्या बापानेही एक रन काढून....स्टीव्ह स्मिथने बाबर आझमची अब्रू वेशीवर टांगली, पाकिस्तानी खेळाडू संतापला
कोहली असता तर त्याच्या बापानेही एक रन काढून....स्टीव्ह स्मिथने बाबर आझमची अब्रू वेशीवर टांगली, पाकिस्तानी खेळाडू संतापला
पाच टर्म नगरसेवक, माजी महापौराला अस्मान दाखवत थेट एकनाथ शिंदेंच्या दारात धगधगती मशाल पेटवणारा ठाकरेंचा मावळा मातोश्रीवर पोहोचला; उद्धव ठाकरे काय म्हणाले?
पाच टर्म नगरसेवक, माजी महापौराला अस्मान दाखवत थेट एकनाथ शिंदेंच्या दारात धगधगती मशाल पेटवणारा ठाकरेंचा मावळा मातोश्रीवर पोहोचला; उद्धव ठाकरे काय म्हणाले?
मोठी बातमी! शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरींना अटक; तब्येत बिघडल्याने रुग्णालयात हलवलं
मोठी बातमी! शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरींना अटक; तब्येत बिघडल्याने रुग्णालयात हलवलं
Ind vs Nz 3rd T20 Live Score : 7 चेंडूत न्यूझीलंडला 2 मोठे धक्के! अर्शदीप सिंग अन् हर्षित राणाचा कहर... टीम इंडियाची धमाकेदार सुरुवात, प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर
7 चेंडूत न्यूझीलंडला 2 मोठे धक्के! अर्शदीप सिंग अन् हर्षित राणाचा कहर... टीम इंडियाची धमाकेदार सुरुवात, प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर
Malegaon Election Results 2026: राज्यभरात मुसंडी, पण मालेगावात एमआयएमला 'धोबी पछाड'; इस्लाम पार्टीने ओवैसींची कशी केली कोंडी?
राज्यभरात मुसंडी, पण मालेगावात एमआयएमला 'धोबी पछाड'; इस्लाम पार्टीने ओवैसींची कशी केली कोंडी?
मोठी बातमी! शिंदेंचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, हॉटेलमध्ये का ठेवले? शीतल म्हात्रेंनी सांगितलं राज'कारण'
मोठी बातमी! शिंदेंचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, हॉटेलमध्ये का ठेवले? शीतल म्हात्रेंनी सांगितलं राज'कारण'
तिकडं देवाभाऊ स्वित्झर्लंडमध्ये पोहोचले, इकडं शिंदेंच्या नगरसेवकांच्या फोनाफोनीची सुद्धा चर्चा, संजय राऊतांच्या त्या दोन वाक्यांनी भाईंच्या पोटात गोळा आणला! हाॅटेलमध्ये सुद्धा पोहोचणार
तिकडं देवाभाऊ स्वित्झर्लंडमध्ये पोहोचले, इकडं शिंदेंच्या नगरसेवकांच्या फोनाफोनीची सुद्धा चर्चा, संजय राऊतांच्या त्या दोन वाक्यांनी भाईंच्या पोटात गोळा आणला! हाॅटेलमध्ये सुद्धा पोहोचणार
Embed widget