Santosh Deshmukh Case Evidence : देशमुख हत्याप्रकरणातील EXCLUSIVE पुरावा;हत्येचे धक्कादायक फोटो समोर
Santosh Deshmukh Case Evidence : देशमुख हत्याप्रकरणातील EXCLUSIVE पुरावा;हत्येचे धक्कादायक फोटो समोर
९ डिसेंबर २०२४ रोजी सरपंच संतोष देशमुख हत्येचे पुरावे एबीपी माझाच्या हाती... रागाच्या भरात मारेकऱ्यांनी हालहाल करुन, संतोष देशमुखांची केली हत्या..
धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, १५ मिनिटं खलबतं, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचा वाढता दबाव
देशमुख हत्येप्रकरणातला सर्वात मोठा पुरावा 'माझा'वर
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं महाराष्ट्र हादरला... नुसता हादरला नाही , तर या हत्येच्या घटनेनं महाराष्ट्राचं समाजकारण, राजकारण ढवळून निघालं. या प्रकरणी आरोपपत्र देखील दाखल झालंय. आणि आता आरोपींच्या क्रौर्याचा सर्वात मोठा पुरावा एबीपी माझाच्या हाती लागलाय. संतोष देशमुखांची हत्या करतानाचे आरोपींचे फोटो एबीपी माझाच्या हाती लागले आहेत.. माणसाच्या रुपातला हैवान कॅमेऱ्यानं कैद केला आहे.. हे फोटो पाहून हा आपलाच महाराष्ट्र आहे ना असा प्रश्न प्रत्येकाला पडल्याशिवाय राहणार नाही...























