Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षांची सीआयडीकडून चौकशी
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे यांची सीआयडीकडून चौकशी करण्यात आलीये.
Santosh Deshmukh Murder Case : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे यांची सीआडीकडून बीडमध्ये चौकशी करण्यात आलीये. संध्या सोनवणे यांची दुपारपासून सुरु असलेली चौकशी आता संपली आहे. बीड शहर पोलिस ठाण्यात CID कडून चौकशी करण्यात आली. सोनवणे यांच्यासह अन्य काही लोकांची चौकशी असल्याने वेळ लागल्याची सोनवणे यांनी माहिती दिलीये. दरम्यान, चौकशी झाल्यानंतर संध्या सोनवणे माध्यमांशी संवाद साधलाय. दरम्यान, राजकारणात असल्याने सर्वांशी संबंध येतात, पण वरिष्ठांवर होत असलेल्या आरोपांबाबत भाष्य करणार नाही, असं संध्या सोनवणे यांनी म्हटलंय.
वरिष्ठ नेत्यांवर जी आरोप होत आहेत, त्याविषयी मी काहीही बोलणार नाही : संध्या सोनवणे
संध्या सोनवणे म्हणाल्या, जे जे अधिकाऱ्यांनी विचारलं ते विचारलं त्याची मी माहिती दिली. मी पक्षामध्ये काम करत असल्यामुळे मला तपासासाठी बोलवलं. बारा वाजता मी आले होते. जेव्हा जेव्हा प्रशासन बोलवेल त्यावेळेस मी चौकशीला हजर राहणार आहे. राजकारणात असल्यामुळे सर्वांचे संबंध येतात. वरिष्ठ नेत्यांवर जी आरोप होत आहेत त्याविषयी मी काहीही बोलणार नाही. पहिल्यांदाच अशा पद्धतीने चौकशीला मी सामोरे गेले.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्षांची चौकशी
संध्या सोनावणे यांची दुपारपासून सुरु असलेली चौकशी आता संपली
बीड शहर पोलिस ठाण्यात CID कडून सुरु होती चोकशी
सोनावणे यांच्यासह अन्य काही लोकांची चौकशी असल्याने वेळ लागल्याची सोनावणे यांची माहिती
जे जे अधिकाऱ्यांनी विचारलं ते विचारलं त्याची मी माहिती दिली
मी पक्षामध्ये काम करत असल्यामुळे मला तपासासाठी बोलवलं
बारा वाजता मी आले होते
जेव्हा जेव्हा प्रशासन बोलवेल त्यावेळेस मी चौकशीला हजर राहणार
राजकारणात असल्यामुळे सर्वांचे संबंध येतात
वरिष्ठ नेत्यांवर जी आरोप होत आहेत त्याविषयी मी काहीही बोलणार नाही
पहिल्यांदाच अशा पद्धतीने चौकशीला मी सामोरे गेले.
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेगhttps://t.co/s1q57NpOjm
— ABP माझा (@abpmajhatv) December 29, 2024
इतर महत्त्वाच्या बातम्या