Vijay Wadettiwar : दहा-दहा बायका करा, पण कोणाचा खून करु नका; धनंजय मुंडेंवर टीका करताना विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य; चित्रा वाघ यांच्यावरही सडकून टीका
Vijay Wadettiwar on Dhananjay Munde, Mumbai : दहा-दहा बायका करा, पण कोणाचा खून करु नका, असं वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी धनंजय मुंडेंवर टीका करताना केलंय.
Vijay Wadettiwar on Dhananjay Munde, Mumbai : "महाविकास आणि महायुतीमध्ये फरक आहे. हे महाराष्ट्र विकून खातील, तरी त्यांच्यावर कारवाई होणार नाही. महाराष्ट्रात खुलेआम महिलांचं शोषण होईल. खून करतील तरी कारवाई करणार नाहीत. चौकशी करतील. चित्रा ताई म्हणाल्या, मंत्री करु नये, तरी संजय राठोडांना मंत्री केलं गेलं. पूजा चव्हाणवरुन आरोप झाल्यानंतर आम्ही जरा सुद्धा वेळ घालवला नाही, लगेच काढून टाकलं. इकडे पाहा. प्रेम करणारी असूदेत..प्रेम करुन मारहाण करतात, सोडूनही देतात. तुमची परवानगी असेल तर 10-10 बायका करा, पण कोणाचा खून तरी करु नका", असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. यावेळी त्यांनी भाजप आमदार चित्रा वाघ यांच्यावरही सडकून टीका केलीये. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
विजय वडेट्टीवार म्हणाले, संतोष देशमुख यांचं कुटूंब अजूनही रडतंय. महिलांच्या शोषनाच्याही अनेक घटना घडल्या आहेत. सरकारने या संदर्भात सीबीआय चौकशी केली पाहिजे. आकाच्या वर बाका आहे ते हे सर्व वाचवतोय. स्पेशल टीम लावली नाही. तुम्ही आरोपी शोधत नाही. मालमत्ता जप्त करत आहेत त्या खंडणी गोळा करुन जमा केल्या आहे. प्राजक्ता माळींबाबत बोलणार नाही. मात्र फिल्म इंडस्ट्रीतून यावर कोणी बोलत नाही.
थरमल पॉवरमध्ये खंडणी दिल्याशिवाय कोणीही काम करु शकत नाही. याची सीबीआय चौकशी करा. कोणी कुठेही लपलं तर पोलिस शोधून आणतात. पहिलं आरोपीला अटक करा. अंजली दमानिया म्हणतात त्यात तथ्य असू शकतं. अक्षय शिंदेला मारला कारण मुख्य आरोपीपर्यंत पोहचू नये. तसं यातही तथ्य असू शकतं. तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिपदापासून दूर ठेवलं पाहिजे,असंही वडेट्टीवार म्हणाले.
पुढे बोलताना वडेट्टीवार म्हणाले, मुंडे म्हणतात वाल्मिकी कराड सबंध आहेत. मुंडे म्हणतात चौकशी करा. कुणाचे कुणाशी सबंध आहेत. वाल्मिक कराडला शोधून आणा. नार्को टेस्ट करा. खुनाच्या गुन्ह्यात दिसेल. मुलींचे शोषण झाले आहे. शोधले पाहिजे. इतके भयानक आहे ते..या दोन मोबाईलची कॉल रेकॉर्ड व्हिडिओ तपासले तर त्यातून झालेले मोठ्या माणसाशी झालेला संवाद बघितला तर मुख्य आरोपीपर्यंत पोहचायला वेळ लागणार नाही. एवढं मोठं मोर्चा झाल्यावर सरकार खडबून जागा होईल असं वाटल होतं पण अजूनही कारवाई नाही. आघाडी आणि युती सरकारमधील फरक आहे. हे महाराष्ट्र विकून काढतील तरी कारवाई होणार नाही.चित्रा वाघ बोलल्या होत्या पूजा चव्हाण मृत्यू झालं आम्ही संजय राठोड कारवाई केली होती. आता कारवाई करत नाहीत. आता परवानगी असेल तर दहा बायका करा कुणाचा खून करू नका.
Vijay Wadettiwar PC LIVE | Mumbai | Maharashtra Politics | ABP Majha LIVE
इतर महत्त्वाच्या बातम्या