Beed: वाळू तस्करांची साटे - लोटे, निलंबनाच्या कारवाईनंतर गेवराईत पोलीस कर्मचारी 3 दिवसांपासून बेपत्ता, ठाणे प्रमुखाचाही बदली अर्ज
वाळूचे ट्रॅक्टर पकडून कारवाई न करता सोडून दिलाचा ठपका ठेवत बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना नवनीत काँवत यांनी निलंबित केले होते .

Beed: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येनंतर नवे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी संपूर्ण प्रकरणाची सूत्रे हाती घेत अवैध वाळू उपसा करणाऱ्या विरोधात काही दिवसांपूर्वी मोठी कारवाई केली होती . अवैध वाळू उपसा केल्याच्या प्रकरणात आरोपींची साटे - लोटे करणाऱ्या बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केल्यानंतर आता त्यातील पोलीस हवालदार अशोक हंबर्डे गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे .तर दुसरीकडे गेवराई ठाण्याचे पीआय (PI) प्रवीण कुमार बांगर यांनी आपल्या बदलीचा अर्ज नवनीत कॉवत यांना दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे .
दरम्यान, बेपत्ता निलंबित पोलीस कर्मचारी अशोक हंबर्डे यांना एक दिवस आधीच SP नवनीत कॉवत यांनी चांगल्या कामासाठी रिवार्ड दिले होते .त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचे निलंबन झाले .ज्या कारवाईसाठी हे निलंबन झाले त्यातील वस्तुस्थिती आणि एसपींना दिलेला अहवाल यात फरक असल्याचे सांगण्यात येत आहे .
निलंबित पोलीस कर्मचारी 3 दिवसांपासून बेपत्ता, फोनही बंद
वाळूचे ट्रॅक्टर पकडून कारवाई न करता सोडून दिलाचा ठपका ठेवत बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना नवनीत काँवत यांनी निलंबित केले होते .मात्र यातील एक कर्मचारी अशोक हंबर्डे हे 3 दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे .अशोक हंबर्डे यांचा फोनही बंद असल्याने कुटुंबीय हवालदिल झाले आहेत .
गेवराई ठाण्याचे PI प्रवीणकुमार बांगरांचा बदली अर्ज
एकीकडे अवैध वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाईचा आदेश असतानाही वाळूसह गाडी ताब्यात न घेता फक्त वाहन ठाण्यात आणून ठेवले आणि गुन्हा दाखल करण्यास देखील विलंब केल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षकांनी गेवराईतील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते .अवैध वाळू उपसा केल्याच्या प्रकरणातील आरोपींची साठे लोटे असण्याचा आरोप त्यांच्यावर होता .दरम्यान दुसरीकडे,गेवराई ठाण्याचे पीआय प्रवीण कुमार बांगर यांनी आपली नियंत्रण कक्षात बदली करावी अशा प्रकारचा अर्ज SP कॉवत यांना दिला आहे .गेवराई ठाण्यातील पोलीस कर्मचारी अशोक हंबर्डे आणि सहाय्यक फौजदार बलराम सुतार यांच्यावर वाळूच्या पकडलेल्या ट्रॅक्टरवरून कारवाईत दिरंगाई केल्याचा ठपका ठेवला गेला होता .शुक्रवारी हॅप्पी न्यू या दोघांना निलंबित केले होते .
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
