First Car of Famous Celebrities : कुणाकडे Maruti 800, Fiat Padmini तर कुणाकडे आईने गिफ्ट दिलेली कार; आपल्या लाडक्या सेलिब्रिटींची पहिली कार कोणती होती?
तुम्हाला माहित आहे का तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींच्या मालकीची पहिली कार कोणती होती? नाही तर! तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही सेलिब्रिटींबद्दल आणि त्यांच्या पहिल्या कारबद्दल सांगणार आहोत.
First Car of Famous Celebrities : देशात क्रिकेट आणि बॉलीवूडमध्ये (Celebrity First car) असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांना ओळखीची गरज नाही. तसेच अशा सेलिब्रिटींचे देश-विदेशात कोट्यवधी फॉलोअर्स आणि चाहते आहेत. या सर्व चाहत्यांना आपल्या आवडत्या सेलिब्रेटीच्या (Auto News) प्रत्येक गोष्टीशी जुळवून घ्यायचं आहे. ज्यात त्यांच्या घरापासून, जीवनशैलीपासून ते त्यांच्या गाड्यांपर्यंत.. अशा वेळी जवळपास प्रत्येक सेलिब्रिटी स्टारडम मिळताच महागड्या आणि लक्झरी वाहनांमध्ये फिरतो. पण तुम्हाला माहित आहे का तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींच्या मालकीची पहिली कार कोणती होती? नाही तर! तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही सेलिब्रिटींबद्दल आणि त्यांच्या पहिल्या कारबद्दल सांगणार आहोत.
शाहरुख खानची पहिली कार
बॉलीवूडमध्ये बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानने स्वत:च्या बळावर या इंडस्ट्रीत स्वत:ला प्रस्थापित केलं. आज त्यांच्याकडे लक्झरी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मात्र, भारतातील सर्वात मोठा फिल्म स्टार म्हणून त्यांची पहिली कार मारुती ओमनी होती, जी त्यांच्या आईने त्यांना भेट म्हणून दिली होती.
अमिताभ बच्चन यांची पहिली कार
बॉलिवूडचे शहेनशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्याकडे मोठ्या प्रमाणात कार कलेक्शन आहे, पण त्यांची पहिली कार सेकंड हँड फियाट 1100 होती, ज्यात 1089 सीसी-1221 सीसी इंजिन मिळाले होते.
अक्षय कुमारची पहिली कार
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार लक्झरी कारचा शौकीन म्हणून ओळखला जातो, परंतु त्याची पहिली कार फियाट पद्मिनी होती. ज्याची निर्मिती 1964 ते 2001 दरम्यान झाली होती.
सलमान खानची पहिली कार
बॉलीवूडमध्ये भाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानकडे अनेक आलिशान आणि लक्झरी कार आहेत. पण त्यांची पहिली कार सेकंड हँड ट्रायम्फ हेराल्ड होती, जी ऋषी कपूर यांच्या एका चित्रपटात वापरण्यात आली होती, त्यानंतर सलमान खान यांनी ही कार घेतली.
सचिन तेंडुलकरची पहिली कार
सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हटले जाते. मास्टर ब्लास्टर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सचिनकडे 360 मोडेना फेरारीसारखी सुपरकारही आहे. पण त्यांची पहिली कार मारुती 800 होती.
सारा अली खानची पहिली कार
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानची पहिली कार पांढऱ्या रंगाची होंडा सीआर-व्ही होती, मात्र आता सारा नव्या जीप कंपासमधून प्रवास करते.
इतर महत्वाची बातमी-
Tesla Car in India : भारतात दिसली जगातील पहिली Tesla Cross Breed कार; फोटो सोशल मीडियावर व्हायरल