MS Dhoni Stumping Phil Salt : MS धोनीची चीते की रफ्तार अन् डोळ्यांची पापणी लवताच फिल सॉल्टचा खेळ खल्लास! कोहली फक्त बघतच राहिला, Video
चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आयपीएल 2025 मध्ये संघाच्या सलग दुसऱ्या सामन्यात स्टंपच्या मागे आश्चर्यचकित कामगिरी केले.

MS Dhoni quickfire stumping Phil Salt CSK vs RCB : चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आयपीएल 2025 मध्ये संघाच्या सलग दुसऱ्या सामन्यात स्टंपच्या मागे आश्चर्यचकित कामगिरी केले. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यातील सामना सुरू आहे. या सामन्यात सीएसकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
GOAT OF STUMPING - MS DHONI 🐐 #CSKvRCB #MSDhonipic.twitter.com/UGRztylYlq
— 𝐀𝐦𝐨𝐥 (@ITzAmol07) March 28, 2025
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर आरसीबीने सीएसकेविरुद्ध तुफानी सुरुवात केली. पाच षटकांच्या समाप्तीपूर्वी सॉल्ट आणि कोहलीने 45 धावा ठोकल्या होत्या. पण, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पहिला धक्का सॉल्टच्या रूपात बसला.
STUMP CAM VIEW OF MS DHONI STUMPING 🔥 #CSKvRCB #MSDhoni pic.twitter.com/zFiDIlVzTK
— ꪻﺃꪀᛕꪊ ꪑꪖꫝﺃ᭙ꪖꪶ (@Kali77899) March 28, 2025
पाचव्या षटकात नूर अहमदच्या चेंडूवर पुढे येऊन मारायचा प्रयत्न करताना सॉल्ट हूकला आणि तेथेच फसला, कारण डोळ्यांची पापणी लवण्याआधी फिल साल्टचा खेळ खल्लास झाला. धोनीने पुन्हा एकदा विजेच्या वेगाने स्टंपिंग केले आणि सॉल्टला चकित केले. 16 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 32 धावा काढल्यानंतर सॉल्ट बाद झाला. सॉल्ट आऊट झाल्यानंतर विराट कोहली फक्त बघतच राहिला. ज्याचा व्हिडिओ आता सोशल माडियावर व्हायरल होत आहे.
Time taken for a bullet to travel = 0.25 seconds
— Hittler (@Testosteron3_) March 28, 2025
MS Dhoni’s stumping = 0.12 seconds pic.twitter.com/iEqFySWKrj
आरसीबीने सामन्याची सुरुवात चांगली केली, पण सॉल्ट आऊट झाल्यानंतर धावगती कमी झाली. पॉवरप्लेमध्ये आरसीबीच्या 56 धावा होत्या पण 9 षटकांत त्यांना फक्त 83 धावाच करता आल्या. मोठी गोष्ट म्हणजे बातमी लिहिण्यापर्यंत विराट कोहलीने 20 चेंडूत फक्त 14 धावा केल्या होत्या.
43-year-old MS Dhoni still doing stumping faster than most people unlock their phones!
— Dinda Academy (@academy_dinda) March 28, 2025
Age is just a number, but Dhoni’s reflexes are still in their Prime.
Legends don’t retire, they just keep setting new records! #CSKvsRCB pic.twitter.com/tq1SwglaoG
हे ही वाचा -





















